: RRB Technician Bharti 2026: रेल्वे भरती मंडळाने ‘तंत्रज्ञ श्रेणी-I (सिग्नल) आणि तंत्रज्ञ श्रेणी-III या पदांवरील रिक्त पदांसाठी एका मोठ्या भरती मोहिमेची घोषणा केली आहे. भारतीय रेल्वेमध्ये स्थिर सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. जवळपास 6,565 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, ही भरती या वर्षातील सर्वात मोठ्या संधींपैकी एक ठरणार आहे. जी (७ वे वेतन आयोग – स्तर २ आणि स्तर 5) मूळ वेतन आणि आकर्षक भत्त्यांसह एक सुरक्षित करिअरचा मार्ग प्रदान करते. पात्रता, वेतन रचना, निवड प्रक्रिया आणि अर्ज करण्याची सविस्तर सर्व माहिती दिली आहे. उमेदवारांना विनंती आहे की, अर्ज करण्यापूर्वी त्यांनी सविस्तर जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचावी.
RRB Technician Bharti 2026
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 6,565 पदे
- पदाचे नाव : तंत्रज्ञ श्रेणी-I (सिग्नल) आणि तंत्रज्ञ श्रेणी-III पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- शैक्षणिक पात्रता : उमदेवारांनी १०वी उत्तीर्ण+ITI/पदवी/डिप्लोमा कोर्स.
पदांचा तपशील
| पद क्रं | पदाचे नाव | पद |
| 1. | तंत्रज्ञ श्रेणी-I | 323 |
| 2. | तंत्रज्ञ श्रेणी-III | 6,242 |
| TOTAL | 6,565 |
- भरती विभाग : भारतीय रेल्वे मंडळा अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : रेल्वे विभागात कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)
महत्त्वाच्या तारखा
| अर्ज सुरू | 30 जून 2026 पासून |
| शेवटची तारीख | 29 जुलै 2026 पर्यंत |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही भारतीय रेल्वे मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | संगणक-आधारित चाचणी (CBT) – I |
| दुसरा टप्पा | संगणक-आधारित चाचणी (CBT) – Il |
| तिसरा टप्पा | कागदपत्रांची पडताळणी |
| चौथा टप्पा | वैद्यकीय तपासणी |
- मासिक वेतन (Salary) : बेसिक 19,000 रुपये म्हणजे 30,000+ पर्यंत अंदाजे इन हॅण्ड वेतन मिळणार आहे.
- वयोमर्यादा (Age Limit) : 1 जुलै 2026 रोजी पात्रता धारक उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे व कमाल वयोमर्यादा 33 वर्षे देण्यात आलेली आहे.
- [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क
| श्रेणी | शुल्क |
| General / EWS / OBC | 500/- रुपये |
| SC/ST/EBC/ महिला /अल्पसंख्याक/माजी सैनिक | 250/- रुपये |
टीप : नियमांनुसार, ऑनलाईन लेखी परीक्षेसाठी हजर झाल्यानंतर शुल्क सामान्यतः (अंशतः/पूर्णपणे) परत केले जाते.
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
RRB Technician Bharti 2026
उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये RRB चा (RRB Technician Bharti 2026) निर्णय अंतिम असेल.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
SSB Constable Bharti 2026: 10वी पाससाठी 827 जागा | Online अर्ज सुरू
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा