IBPS RRB Bharti 2026: तब्बल १३,७४५ पदांसाठी मेगा भरती; पदवीधरांसाठी सुवर्णसंधी, लगेच करा असा अर्ज!

IBPS RRB Bharti 2026: ‘इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन’ने (IBPS) CRP RRBs XV ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील २८ प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये (RRBs) एकूण १३,७४५ पदे (९ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शुद्धिपत्रकानुसार सुधारित) भरली जाणार आहेत. ‘ऑफिस असिस्टंट’ आणि ‘ऑफिसर स्केल-I’ या पदांसाठी कोणत्याही विषयातील पदवी आणि स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे; त्यामुळे नुकतेच पदवीधर झालेल्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी चालून आली आहे. विशेष म्हणजे कोणत्याही (specialist degree) गरज नाही, यासाठी ऑनलाइन नोंदणी १ सप्टेंबर २०२६ ते २१ सप्टेंबर २०२६ या कालावधीत करता येईल. पात्रता, निकष सर्व माहिती या लेखात दिली आहे. उमेदवारांनी कृपया अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आलेले आहे ती वाचावी!

IBPS RRB Bharti 2026

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : १३,७४५ पदे
  • पदाचे नाव : कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), अधिकारी श्रेणी-१, श्रेणी-२, श्रेणी-३ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा त्यास समकक्ष पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पदांचा तपशील

पदाचे नाव  प्रवर्ग नुसार जागा  पद संख्या
Office Assistant (Multipurpose) UR 3,470 / SC 1,258 / ST 774 / OBC 1,914 / EWS 806 8222
Officer Scale-I (Assistant Manager) UR 1,752 / SC 627 / ST 318 / OBC 1,139 / EWS 420 4256
Officer Scale-II General Banking Officer UR 292 / SC 96 / ST 44 / OBC 171 / EWS 63 666
Officer Scale-II IT Officer UR 79 / SC 24 / ST 13 / OBC 48 / EWS 18 182
Officer Scale-II Chartered Accountant UR 39 / SC 14 / ST 6 / OBC 17 / EWS 5 81
Officer Scale-II Law Officer UR 28 / SC 3 / ST 2 / OBC 10 / EWS 3 46
Officer Scale-II Treasury Manager UR 15 / SC 0 / ST 0 / OBC 2 / EWS 1 18
Officer Scale-II Marketing Officer UR 9 / SC 1 / ST 2 / OBC 3 / EWS 1 16
Officer Scale-II Agricultural Officer UR 19 / SC 5 / ST 3 / OBC 8 / EWS 3 38
Officer Scale-III (Senior Manager) UR 105 / SC 29 / ST 14 / OBC 55 / EWS 17 220
  • भरती विभाग : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : बँकिंग क्षेत्रात कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरु 1 सप्टेंबर 2026
शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2026
पूर्व परीक्षा नोव्हेंबर/डिसेंबर 2026
मुख्य परीक्षा जानेवारी/फेब्रुवारी 2026

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा पूर्व परीक्षा
दुसरा टप्पा मुख्य परीक्षा
तिसरा टप्पा मुलाखत (Scale-I, II, III)
  • बेसिक वेतन (Salary) : रुपये 24050/- ते 64,480 रुपये पर्यंत बेसिक वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 1 सप्टेंबर 2026 रोजी खुल्या प्रवर्गासाठी किमान वय 18 वर्ष व कमाल 28 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, दिव्यांग – 10 वर्षे सूट]
अर्ज शुल्क
श्रेणी तपशील
SC/ST/PwBD/ESM/DESM ₹175 रुपये
General/EWS/OBC/all others ₹850 रुपये

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात PDF येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

IBPS RRB Bharti 2026

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. भरती चे अर्ज हे केवळ ऑनलाईन पद्धतीने करायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये IBPS चा (IBPS RRB Bharti 2026) निर्णय अंतिम असेल.
  6. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  7. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  8. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  9. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

ही जाहिरात पण पहा 👉 Indian Post GDS Recruitment 2026: BPM, ABPM आणि डाक सेवक पदांसाठी २३,७५७ जागा; १० वी उत्तीर्ण

“ही माहिती तुमच्या मित्र-नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा.”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo