Indian Post GDS Recruitment 2026: संचार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या टपाल विभागाने अधिकृतपणे इंडियन पोस्ट GDS भरती 2026 करिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक मोठी संधी आहे, यामध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने 23,757 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत, ज्यामध्ये शाखा पोस्टमास्टर (BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) आणि डाक सेवक या पदांचा समावेश आहे. भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणतीही लेखी परीक्षा नाही. अर्ज नोंदणी प्रक्रिया 31 ऑगस्ट 2026 ते 21 सप्टेंबर 2026 पर्यंत देण्यात आली आहे. सविस्तर माहिती खालील लेखात दिले आहे.
Indian Post GDS Recruitment 2026
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 23,757 पदे
- पदाचे नाव : शाखा पोस्टमास्टर (BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) आणि डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- शैक्षणिक पात्रता : उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षणमंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
पदांचा तपशील
| अ क्रं | प्रवर्ग | पदे |
| 1. | UR (Unreserved) | 10640 |
| 2. | OBC | 4,433 |
| 3. | SC | 3,082 |
| 4. | ST | 2,773 |
| 5. | EWS | 2,160 |
| 6. | PwBD-A | 192 |
| 7. | PwBD-B | 227 |
| 8. | PwBD-C | 178 |
| 9. | PwBD-DE | 072 |
| एकूण | 23,757 |
- भरती विभाग : संचार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या टपाल विभागा अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- भरती प्रकार : टपाल विभागामध्ये कायमस्वरुपी नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
- नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)
महत्त्वाच्या तारखा
| अर्ज सुरू | 31 ऑगस्ट 2026 पासून |
| अंतिम तारीख | 21 सप्टेंबर 2026 पर्यंत |
| अर्ज दुरुस्ती | 23 ते 24 सप्टेंबर 2026 |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि टपाल विभागाच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | दहावी टक्केवारी |
| दुसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- मासिक वेतन (Salary) : बेसिक 10,000/- ते 29,380/- मिळणार आहे.
- वयोमर्यादा (Age Limit) : 21 ऑगस्ट 2026 रोजी सर्वसाधारण उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे व कमाल 40 वर्षे असणे आवश्यक आहे.
- [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्षे सूट]
अर्ज शुल्क
| श्रेणी | शुल्क |
| General/OBC/EWS | 100/- रुपये |
| SC/ST/ PwBD/ Female/Transwomen | अर्ज शुल्क नाही |
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
Indian Post GDS Recruitment 2026
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये GDS चा (Indian Post GDS Recruitment 2026) निर्णय अंतिम असेल.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
ही जाहिरातही पहा 👇
Bank of Baroda Local Officer Bharti 2026: 2482 लोकल बँक ऑफिसर पदांची मेगा भरती | बेसिक वेतन 48,480 ते ₹85,920 पगार
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना देखील शेअर करा