Bank of Baroda Local Officer Bharti 2026: 2482 लोकल बँक ऑफिसर पदांची मेगा भरती | बेसिक वेतन 48,480 ते ₹85,920 पगार

Bank of Baroda Local Officer Bharti 2026: 2482 लोकल बँक ऑफिसर पदांची मेगा भरती | बेसिक वेतन 48,480 ते ₹85,920: बँक ऑफ बडोदाने या वर्षातील अधिकारी स्तरावरील सर्वात मोठ्या भरतीपैकी एक अधिसूचना जारी केली आहे. ताज्या जाहिरातीनुसार, बँक JMG/S-I श्रेणीमध्ये २,४८२ ‘लोकल बँक ऑफिसर्स’ ची (Local Bank Officers) नियमित तत्त्वावर भरती करत आहे. या भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे तुमची नियुक्ती तुमच्याच राज्यात, तुमच्या घराच्या जवळ आणि तुमच्या भाषेच्या क्षेत्रात केली जाते. यामध्ये गुजरात राज्यासाठी १,१८५ जागा आहेत, त्यानंतर कर्नाटक (४१८ जागा) आणि महाराष्ट्र (२१८ जागा) यांचा क्रमांक लागतो. जर तुम्ही आधीच एखाद्या बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत असाल आणि तुम्हाला सार्वजनिक क्षेत्रातील स्थिर नोकरी हवी असेल, तर ही संधी तुमच्यासाठी आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी १८ ऑगस्ट २०२६ रोजी सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ सप्टेंबर २०२६ आहे. कृपया लक्षात घ्या की, ही नवशिक्यांसाठी (फ्रेशर्ससाठी) असलेली भरती नाही; यासाठी तुमच्याकडे ‘शेड्युल्ड कमर्शियल बँक’मध्ये (Scheduled Commercial Bank) अधिकारी म्हणून किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. या लेखात राज्यनिहाय रिक्त जागांची यादी, पात्रता, वेतनश्रेणी, शुल्क आणि निवड प्रक्रिया यांबाबतची माहिती सोप्या भाषेत दिली आहे. पात्रता आणि निवडीबद्दल संपूर्ण माहितीसाठी खाली वाचा

Bank of Baroda Local Officer Bharti 2026

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : २,४८२ पदे
  • पदाचे नाव : स्थानिक बँक अधिकारी (कनिष्ठ व्यवस्थापन श्रेणी / स्केल-१) पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी असणे अनिवार्य आहे. अनुभव, शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी खाली दिलेली अधिसूचना PDF पहा.

पदांचा तपशील

अ.क्रं पदांचे नाव पद संख्या
1. लोकल बँक ऑफिस 2482
  • भरती विभाग : बँक ऑफ बडोदा, अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • भरती प्रकार : BOB मध्ये कायमस्वरुपी नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (Anywhere in India )

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू 18 ऑगस्ट 2026 पासून
अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2026
लेखी परीक्षा/मुलाखत नंतर कळवण्यात येईल

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा ऑनलाईन परीक्षा
दुसरा टप्पा स्थानिक भाषा चाचणी
तिसरा टप्पा मुलाखत Interview
चौथा टप्पा कागदपत्र पडताळणी
  • मासिक वेतन (Salary) : बेसिक ₹48,480 – ₹85,920/- मिळणार आहे
  • वयोमर्यादा (Age Limit) : 18 ऑगस्ट 2026 रोजी सर्वसाधारण उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे व कमाल 30 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्षे सूट]
अर्ज शुल्क
श्रेणी तपशील
General/OBC/EWS 850/- + GST रुपये
SC/ST/PwBD/ESM/ DESM/Women 175/- + GST रुपये

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील  लिंक
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

Bank of Baroda Local Officer Bharti 2026

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. (Bank of Baroda Local Bank Officer Bharti 2026)
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👉RRB JE Bharti 2026: रेल्वे भरती मंडळाकडून ३,९९३ पदांसाठी महाभरती जाहीर! ₹३५,४०० सुरुवातीचा पगार; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना देखील शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo