Nashik Mahanagarpalika Bharti 2026: नाशिक महानगरपालिकेत तब्बल २०८ जागांसाठी मेगा भरती! पगार ₹७५,००० पर्यंत; अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा

Nashik Mahanagarpalika Bharti 2026: नाशिक महानगरपालिकेमध्ये सरळसेवा पद्धतीने आरोग्य व अभियांत्रिकी विभागात  “मेडिकल ऑफिसर, सर्जन, स्त्रीरोगतज्ञ, अस्थिरोग सर्जन, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ञ, फिजिओथेरपिस्ट, स्टाफ नर्स, एएनएम, मिक्सर (मिश्रक), कुष्ठरोग तंत्रज्ञ, ऑपरेशन थिएटर तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, बायोमेडिकल इंजिनिअर, संगणक ऑपरेटर” या पदासाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीमध्ये जवळपास 208 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून, पात्र उमेदवारांनी जाहिरातीत पदापुढे नमूद केलेली शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० पर्यंत आहे. मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी, नियोजित तारखेसह आणि वेळेसह, नाशिक महानगरपालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात वाचावी!

Nashik Mahanagarpalika Bharti 2026

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : 208 पदे
  • पदाचे नाव : मेडिकल ऑफिसर, सर्जन, स्त्रीरोगतज्ञ, अस्थिरोग सर्जन, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ञ, फिजिओथेरपिस्ट, स्टाफ नर्स, एएनएम, मिक्सर (मिश्रक), कुष्ठरोग तंत्रज्ञ, ऑपरेशन थिएटर तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, बायोमेडिकल इंजिनिअर, संगणक ऑपरेटर पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी pdf पहा

पदांचा तपशील

पद क्रं पदाचे नाव  पद संख्या
1. वैद्यकीय अधिकारी 15
2. सर्जन 02
3. स्त्रीरोगतज्ञ 05
4. अस्थिरोगतज्ञ 02
5. बालरोगतज्ञ 05
6. रेडिओलॉजिस्ट 01
7. भूलतज्ञ 02
8. त्वचारोगतज्ञ 02
9. मनोचिकित्सक 02
10. फिजिओथेरपिस्ट 02
11. ANM 57
12. स्टाफ नर्स 79
13. मिश्रक 15
14. कुष्ठरोग तंत्रज्ञ 04
15. ऑपरेशन थिएटर तंत्रज्ञ 02
16. ईसीजी तंत्रज्ञ 02
17. बायोमेडिकल इंजिनिअर 01
18. कॉम्प्युटर ऑपरेटर 10
एकूण  208
  • भरती विभाग : नाशिक महानगरपालिके अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.
  • नोकरीचा प्रकार : करार तत्वावरती नोकरी असणार आहे.
  • नोकरीचे ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू 25 नोव्हेंबर 2026
शेवटची तारीख 2 डिसेंबर 2026

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही नाशिक महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा मिरीट लिस्ट
दुसरा टप्पा मुलाखत
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
  • मासिक वेतन (Salary) : 23,485 ते 75,000/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : २५ नोव्हेंबर 2026 रोजी
  • “पदानुसार कमाल वयोमर्यादा ४३ व ६० वर्षे राहील”
  • [मागासवर्गीय/खेळाडू – 05 वर्षे सूट, दिव्यांग/माजी सैनिक/भूकंपग्रस्त/प्रकल्पग्रस्त – 7 वर्ष सूट]
  • अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही
महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील  लिंक 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात PDF येथे क्लिक करा
अर्ज  नमुना येथे क्लिक करा

Nashik Mahanagarpalika Bharti 2026

अर्ज पाठवण्याचा पत्ता : सार्वजनिक आरोग्य विभाग, ३ रा मजला, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक. ​कार्यालयीन सुट्टी व सार्वजनिक सुट्टी वगळून सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. संबंधित पदासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता, व्यावसायिक पात्रता व आवश्यक तांत्रिक प्रशिक्षण धारण करणे उमेदवारासाठी बंधनकारक राहील.
  2. वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ, स्टाफ नर्स व इतर संबंधित पदांसाठी आवश्यकतेनुसार संबंधित वैद्यकीय परिषद, नर्सिंग परिषद अथवा सक्षम प्राधिकरणाकडील वैध नोंदणी प्रमाणपत्र असणे अनिवार्य राहील.
  3. उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक अर्हता, नोंदणी, अतिरिक्त अर्हता, प्रशिक्षण व अनुभवासंबंधीची सर्व वैध प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक राहील.
  4. अनु.क्र. १ ते १० या पदांकरिता उमेदवारांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त नसावे, तसेच अनु.क्र. ११ ते १८ या उमेदवारांसाठी वय ४३ पेक्षा जास्त नसावे.
  5. बालरोगतज्ज्ञ (Pediatrician) पदासाठी नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU) मधील प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. त्याबाबतचे कामाचे स्वरूप, अनुभवाचा कालावधी व संबंधित संस्थेची माहिती अनुभव प्रमाणपत्राद्वारे स्पष्ट होणे आवश्यक राहील.
  6. वैद्यकीय अधिकारी व स्टाफ नर्स या पदांसाठी ICU प्रशिक्षण अथवा ICU मधील प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. तथापि, संबंधित पदासाठी विहित केलेली मूलभूत शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता पूर्ण करणे अनिवार्य राहील.
  7. अनुभवाचा दावा करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने संबंधित संस्थेने सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत निर्गमित केलेले वैध अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. अनुभव प्रमाणपत्रामध्ये संस्थेचे नाव व पत्ता, पदनाम, सेवाकालावधी, कामाचे स्वरूप, संबंधित विभागाचे नाव तसेच प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्याचे नाव, पदनाम, स्वाक्षरी व संस्थेचा शिक्का असणे आवश्यक राहील.
  8. ICU, NICU व शस्त्रक्रियागृहातील अनुभवाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विभागातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव दर्शविणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. आवश्यकतेनुसार संबंधित विभागाची उपलब्धता, रुग्णालयाची खाटक्षमता व उमेदवाराच्या कर्तव्यांची पडताळणी करण्यात येईल.
  9. उमेदवाराने सादर केलेल्या अनुभव प्रमाणपत्रांसह सर्व शैक्षणिक, व्यावसायिक व इतर आवश्यक कागदपत्रांची मूळ कागदपत्रांशी पडताळणी करण्यात येईल. आवश्यकतेनुसार संबंधित संस्थेकडून प्रमाणपत्रांच्या सत्यतेची खातरजमा करण्यात येईल.
  10. खोटी, बनावट, दिशाभूल करणारी अथवा अपूर्ण माहिती असलेली कागदपत्रे सादर केल्याचे आढळल्यास संबंधित उमेदवाराची उमेदवारी/निवड रद्द करण्याबाबत तसेच नियमानुसार पुढील कार्यवाही करण्याबाबत सक्षम अधिकारी निर्णय घेतील.
  11. वैध व पडताळणीयोग्य कागदपत्रांंद्वारे सिद्ध न होणारा अनुभव ग्राह्य धरण्यात येणार नाही.
  12. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती नाशिक महानगरपालिकेच्या अधिपत्याखालील कोणत्याही रुग्णालयात, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात, आरोग्यवर्धिनी केंद्रात अथवा अन्य आरोग्य संस्थेत प्रशासकीय व रुग्णसेवेच्या आवश्यकतेनुसार करण्यात येऊ शकते.
  13. सदर नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपाची व मानधन तत्त्वावरील असेल. नियुक्तीचा प्रारंभिक कालावधी ६ महिन्यांचा राहील. सदर नियुक्तीमुळे उमेदवारास महानगरपालिकेच्या नियमित सेवेत समाविष्ट होण्याचा अथवा कायमस्वरूपी नियुक्तीचा कोणताही हक्क प्राप्त होणार नाही.
  14. अर्जामध्ये दिलेली माहिती व सादर केलेली सर्व कागदपत्रे सत्य व अचूक असणे आवश्यक राहील.
  15. पात्रता, अनुभव, अतिरिक्त अर्हता, नोंदणी व इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच अंतिम निवड करण्यात येईल.

हि जाहिरात पण पहा 👇

💁‍♂️WCL Nagpur Bharti 2026: वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड भरती २०२६: Clerk व DEO च्या ५१४ जागांसाठी संधी; वाचा संपूर्ण माहिती

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo