RRB JE Bharti 2026: रेल्वे भरती मंडळाकडून ३,९९३ पदांसाठी महाभरती जाहीर! ₹३५,४०० सुरुवातीचा पगार; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

  RRB JE Bharti 2026: रेल्वे भरती मंडळांनी (RRBs)’CEN क्र. 04/2026′ अंतर्गत ‘ज्युनिअर इंजिनिअर’ आणि ‘डेपो मटेरियल सुपरिटेंडंट’ या ३,९९३ पदांसाठी सविस्तर अधिसूचना जारी केली आहे. भारतीय रेल्वेमध्ये स्थिर आणि सुरुवातीचा ₹३५,४०० पगाराची सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १४ ऑगस्ट २०२६ रोजी सुरू होईल आणि १३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजता संपेल या दरम्यान अर्ज सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, भरती साठी पात्रता, परीक्षेचा नमुना, अभ्यासक्रम आणि अर्ज प्रक्रिया समजून घेण्यासाठी मूळ जाहिरात PDF स्वरूप देण्यात आलेली आहे ती वाचा.

RRB JE Bharti 2026

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : ३,९९३ पदे
  • पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (सर्व शाखा), डेपो साहित्य अधीक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील अभियांत्रिकीमधील तीन वर्षांचा डिप्लोमा (पदविका), किंवा त्याच मूळ शाखांमधील कोणत्याही उप-शाखेचे संयोजन; ‘डेपो मटेरियल सुपरिटेंडंट’ पदासाठी कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकीमधील तीन वर्षांचा डिप्लोमा; डिप्लोमाऐवजी त्याच शाखेतील B.E. किंवा B.Tech पदवी देखील स्वीकारली जाते; केवळ सिव्हिल (स्थापत्य) आणि तत्सम पदांसाठी सिव्हिल इंजिनिअरिंगमधील तीन वर्षांची B.Sc. पदवी देखील स्वीकारली जाते. मूळ जाहिरात पहा

पदांचा तपशील

अ क्रं. प्रवर्ग  पदे 
1. UR 1,699
2. SC 624
3. ST 363
4. OBC-NCL 913
5. EWS 394
6. Ex-Servicemen (horizontal) 387
7. PwBD (horizontal) 193
TOTAL  3,993
  • भरती विभाग : भारतीय रेल्वे भरती मंडळा अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : रेल्वे विभागात कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू 14 ऑगस्ट 2026 रोजी
अंतिम तारीख 13 सप्टेंबर 2026 पर्यंत
अर्ज शुल्क 15 सप्टेंबर 2026 पर्यंत

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही भारतीय रेल्वे भरती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा लेखी परिक्षा (CBT-1)
दुसरा टप्पा लेखी परिक्षा (CBT-2)
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
चौथा टप्पा मेडिकल चाचणी
  • मासिक वेतन (Salary) : सुरवातीला ₹३५,४०० रुपये वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 01 ऑगस्ट 2026 रोजी पात्रता धारक उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे व कमाल वयोमर्यादा 33 वर्षे देण्यात आलेली आहे.
  • [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD -10 वर्षे सूट ]
अर्ज शुल्क
श्रेणी शुल्क
General/OBC-NCL/EWS 500/- रुपये
SC, ST, माजी सैनिक, PwBD, महिला, तृतीयपंथी, अल्पसंख्याक, EBC 250/- रुपये

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात PDF येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

RRB JE Bharti 2026

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये RRB चा (RRB JE Bharti 2026) निर्णय अंतिम असेल.
  6. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  7. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  8. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  9. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇

💁‍♂️Punjab National Bank LBO Bharti 2026: पंजाब नेशनल बँक अंतर्गत 545 ‘स्थानिक बँक अधिकारी’ पदांसाठी जाहिरात 2026

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo