SBI Clerk Bharti 2026: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) लिपिकीय संवर्गातील ज्युनियर असोसिएट्स’ (कस्टमर सपोर्ट आणि सेल्स) साठी मोठी भरती मोहीम जाहीर केली आहे. अर्ज करण्यापूर्वी हे जाणून घ्या , कारण ही भरती मोहीम केवळ SC, ST आणि OBC प्रवर्गातील ‘बॅकलॉग’ (प्रलंबित) जागांसाठी आहे. तुम्ही पदवी उत्तीर्ण असाल या भरती साठी पात्र आहात भारतातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत काम करण्याची ही एक उत्तम संधी आहे. एकूण 1538 रिक्त जागांसाठी आणि सुरुवातीचा मूळ पगार (Basic Pay) ₹२६,७३० आहे आणि मुंबईसारख्या मेट्रो शहरात मिळणारे एकूण सुरुवातीचे वेतन (Emoluments) दरमहा सुमारे ₹४६,००० इतके असते. अर्ज करण्याची साठी अंतिम तारीख 27 ऑगस्ट 2026 पर्यंत खुली आहे. पात्रता आणि निवडीबद्दल संपूर्ण माहितीसाठी खाली वाचा.
SBI Clerk Bharti 2026
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 1538 पदे
- पदाचे नाव : कनिष्ठ सहयोगी (ग्राहक सेवा आणि विक्री) — लिपिकीय संवर्ग पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- शैक्षणिक पात्रता : उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेली समकक्ष पात्रता असणे आवश्यक
पदांचा तपशील
| अ. क्रं. | श्रेणी | पद संख्या |
| 1. | SC | 207 |
| 2. | ST | 1219 |
| 3. | OBC | 112 |
| एकूण | 1538 |
- भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया, अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- भरती प्रकार : SBI मध्ये कायमस्वरुपी नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
- नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)
महत्त्वाच्या तारखा
| अर्ज सुरू | 7 ऑगस्ट 2026 पासू |
| शेवटची तारीख | 27 ऑगस्ट 2026 पर्यंत |
| पूर्व परीक्षा | सप्टेंबर 2026 |
| मुख्य परीक्षा | ऑक्टोबर/नोव्हेंबर |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसाणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | पूर्व परीक्षा |
| दुसरा टप्पा | मुख्य परीक्षा |
| तिसरा टप्पा | स्थनिक भाषा चाचणी |
| चौथा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- मासिक वेतन (Salary) : बेसिक ₹26730/- पासून मिळणार आहे.
- वयोमर्यादा (Age Limit) : 1 एप्रिल 2026 रोजी सर्वसाधारण उमेदवाराचे किमान वय 20 वर्षे व कमाल 28 वर्षे असणे आवश्यक आहे.
- [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD(SC/ST) – 15 वर्षे सूट, PwBD(OBC) – 13 वर्षे ]
अर्ज शुल्क
| श्रेणी | तपशील |
| SC, ST, PwBD /XS/DXS | अर्ज शुल्क नाही |
| OBC | 750/- रुपये |
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
SBI Clerk Bharti 2026
उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये SBI चा (SBI Clerk Bharti 2026) निर्णय अंतिम असेल.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👉 Bank of Baroda Recruitment 2026: 206 स्पेशालिस्ट ऑफिसर पदांची मेगा भरती | बेसिक वेतन 48,480 ते ₹1,20,940 पगार
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना देखील शेअर करा