Bombay High Court Bharti 2025:सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत स्वीय सहाय्य रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र पदवीधर उमेदवारांसाठी ही एक मोठी सुवर्ण संधी आहे. मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत स्वीय सहाय्यक (Personal Assistant) या पदासाठी भरती प्रसिद्ध झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये नोकरी मिळणे हे अनेक उमेदवारांचे स्वप्न असते आणि तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही एक मुंबई उच्च न्यायालयाने सुवर्णसंधी दिलेली आहे. या संधीचा फायदा करून घ्या !(Bombay High Court Bharti 2025) न्यायालयाच्या आस्थापनेवरील न्यायाधीश, मुंबई येथील प्रिन्सिपल सीट यांच्या वैयक्तिक सहाय्यक पदासाठी ही जाहिरात प्रक्रिया राबविण्यात येत आहे, त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रस्तुत भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी मुंबई उच्च न्यायालय bombayhighcourt.nic.in या अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी यशस्वीरित्या अर्ज करण्यासाठी आणि तयारी करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा हा मार्गदर्शक आणि व्यापक आढावा हा खालील लेखात सविस्तर दिलेला आहे. (कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आलेले आहे ती वाचावी.)
Bombay High Court Bharti 2025
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | वैयक्तिक सहाय्यक (Personal Assistant) | 036 |
- अर्ज स्विकारण्याची पद्धत:- पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या:- 036
- पदाचे नाव:- न्यायाधीशांचे वैयक्तिक स्वीय सहाय्यक (Personal Assistant)
- शैक्षणिक पात्रता:- कोणत्याही शाखेतील विद्यापीठ पदवी असणे आवश्यक. (पदाच्या पात्रतेनुसार शैक्षणिक पात्रता मागवण्यात आलेली आहे मुळ जाहिरात pdf स्वरूपात दिलेली आहे ती पहावी)
महत्त्वाच्या तारखा:-
1) ऑनलाइन अर्ज सुरू:- 14 ऑगस्ट 2025 पासून सुरुवात
2) अर्जाची शेवटची तारीख:- 01 सप्टेंबर 2025 पर्यंत
3) शुल्क भरण्याची शेवटची तारीख:- 01 सप्टेंबर 2025 सायंकाळी 5:00 पर्यंत
4) पूर्व परीक्षेची तारीख:- मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावरती कळविण्यात येईल
- भरती विभाग:- मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- निवड कालावधी:- तात्पुरत्या स्वरूपात निवड केली जाणार आहेत.
- नोकरीचे ठिकाण:- मुंबई उच्च न्यायालय (महाराष्ट्र)
(अत्यंत महत्त्वाचे:- सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
- वयोमर्यादा (Age Limit):- 14 ऑगस्ट 2025 रोजी
21 वर्ष ते 38 वर्ष दरम्यान असावे. [SC/ST व इतर मागासवर्गीय वयात – 05 वर्षे सूट] - अर्ज शुल्क (Fee):- उमेदवाराला फक्त ‘SBI’ द्वारे ऑनलाइन पेमेंट गेटवे सुविधेद्वारे 1000 रुपये परीक्षा शुल्क आकारले जाईल.
- मासिक वेतन (Salary ):- दरमहा 67,700 रुपये ते 20,8700 रुपये.
(टीप:- उमेदवारांची नियुक्ती ही उमेदवारांच्या चारित्र्याबाबत वैद्यकीय तपासणी आणि पोलिस पडताळणीच्या मंजुरीच्या अधीन आहे.)
Bombay High Court Bharti 2025
निवड प्रक्रिया (Selection Process):-
उमेदवारांच्या परीक्षा आणि मुलाखतीतील व टायपिंग कौशल्यरच्या कामगिरीच्या आधारावर,वरील पदासाठी उमेदवारांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी गुणवत्तेच्या क्रमाने तयार केली जाईल.
परीक्षेत खालील तीन भाग असतील
- भाग-I (लघुलेखन चाचणी- ४० गुण)
लघुलेखनाची गती आणि अचूकता निश्चित करण्यासाठी ५ मिनिटांत श्रुतलेखन करण्यासाठी आणि ३५ मिनिटांत त्याचे ट्रान्सक्रिप्शन करण्यासाठी एकूण ६०० शब्द असलेले इंग्रजीतील दोन परिच्छेदांचे श्रुतलेखन. - भाग-II (टायपिंग टेस्ट – ४० गुण)
इंग्रजी टायपिंगमध्ये वेग आणि अचूकता तपासण्यासाठी १० मिनिटांत ५०० शब्दांचा इंग्रजीतील उतारा. - भाग-III (टायपिंग टेस्ट – २० गुण)
(अधिक माहितीसाठी दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.)
आवश्यक कागदपत्रेः
1. उमेदवारांचा जन्मतारखेचा पुरावा प्रमाणपत्र (शाळा सोडल्याचा दाखला, जन्म सक्षम प्राधिकरणाने दिलेले प्रमाणपत्र किंवा बोर्डाने दिलेले प्रमाणपत्र SSC इ.).
2. शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक आणि उत्तीर्ण प्रमाणपत्रे, जसे की, SSC/HSC/ पदवी, कायदा पदवी आणि पदव्युत्तर पदवी आवश्यक आहेत.
3. उमेदवारांचे इंग्रजी लघुलेखनात 120 श . प्रति.मि. किंवा त्याहून अधिक गती आणि इंग्रजी टायपिंगमध्ये 50 श.प्रति.मि. किंवा वरील गतीसाठी संगणक टायपिंग बेसिक कोर्स (GCC-TBC) किंवा ITI मध्ये प्रमाणपत्र आवश्यक आहे.
4. अनुभव प्रमाणपत्र, जर असेल तर, ज्यामध्ये नाव, स्वाक्षरी, जारी केल्याची तारीख आणि कार्यालय/संस्थेचा शिक्का असेल अनिवार्य आहे.
5. उमेदवारांचे जात प्रमाणपत्र जेथे लागू असेल तेथे.
6. अधिक माहिती साठी pdf जाहिरात वाचा
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचनाः-
- सदर भरतीसाठी उमेदवारांनी सादर केलेला अपूर्ण/चुकीची माहिती असलेला अर्ज नाकारला जाईल.
- जर उमेदवाराने सादर केलेला कोणताही तपशील खोटा किंवा चुकीचा असल्याचे आढळून आले, तर निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर, उमेदवार निवड प्रक्रियेत सहभागी होऊ दिला जाणार नाही आणि नियुक्ती झाल्यास, तो बाद केला जाऊ शकतो.
- कोणत्याही उमेदवाराने पाहण्यात अयशस्वी झाल्यास उच्च न्यायालयात त्याची कोणतीही तक्रार स्वीकारली जाणार नाही किंवा ऐकली जाणार नाही.
- संपूर्ण निवड प्रक्रियेदरम्यान कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही उमेदवाराने उपस्थित केलेल्या कोणत्याही मुद्द्यावर निवड समितीचा Bombay High Court Bharti 2025 निर्णय अंतिम असेल आणि तो उमेदवारावर बंधनकारक असेल.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ईमेल आयडी अनिवार्य आहे. त्याच बरोबर अर्ज करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर वाचावी
हि जाहिरात पण पहा 👇
BSF जाहिरात प्रसिद्ध 2025 :10 वी 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्ण संधी : BSF Recruitment 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/ मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा
1 thought on “मुंबई उच्च न्यायालय भरती जाहिरात प्रसिद्ध 2025 | Bombay High Court Bharti 2025 ”