PCMC NHM Bharti 2026: NHM अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज सुरू | अंतिम तारीख 6 मे

PCMC NHM Bharti 2026: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ ऍण्ड फैमिली वेलफेअर सोसायटीमध्ये कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून. इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे, या भरतीमध्ये “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक, असे विविध पदे भरण्यात येणार असून पात्रताधारक उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. या भरतीचे अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 6 मे 2026 पर्यंत सादर करण्यास उमेदवारांना आवाहन केले आहे. या जाहिरातीचे सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी  मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!

PCMC NHM Bharti 2026

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : 81 पदे
  • पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मुळ जाहिरात PDF स्वरूपातील पहा

पदांचा तपशील

पद क्रं. पदाचे नाव  पद संख्या
1. वैद्यकीय अधिकारी 35
2. स्टाफ नर्स 18
3. बहुउद्देशीय आरोग्य सेवा 28
एकूण 81
  • भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती
  • नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड (महाराष्ट्र)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू 27 एप्रिल 2026 पासून
अंतिम तारीख 6 मे 2026 पर्यंत
निकाल नंतर कळविण्यात येईल

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा गुणांक पद्धत
दुसरा टप्पा मुलाखत (Interview)
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
  • वयोमर्यादा (Age Limit) : खुल्या गटातील उमेवारांसाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षे व राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी कमाल 43 वर्षे देण्यात आलेली आहे.
  • मासिक वेतन : दरमहा 18,000 ते 60,000 रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
  • अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही

अर्ज पाठवण्याचा पत्ता : पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक-जावक कक्ष पिंपरी चिंचवड.

महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा
अर्ज नमुना येथे क्लिक करा

PCMC NHM Bharti 2026

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील दिलेल्या पत्त्यावरती दिनांक 6 मे 2026 च्या आत आलेले अर्ज ग्राह्य धरले जातील.
  2. ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी व मोबाईल नंबर वैध राहणे आवश्यक राहील.
  4. वरिल पदे ही कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधन तत्वानुसार भरण्यात येणार असून सदरील नियुक्ती आदेश हे निर्गमित केलेल्या तारखेपासुन ते 11 महिने 29 दिवस पर्यंतच्या कालावधीकरिता भरण्यात येणार आहेत. पुढील पुनर्नियुक्ती आपल्या कामगिरी मुल्यांकनावर आधरित असेल.
  5. अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचा सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचुक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहतील याची दक्षता घ्यावी.
  6. वरील नमुद पदे ही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत. सदर पदावर शासकीय सेवेप्रमाणे असलेले नियम अटी व शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही तसेच यापदासाठी शासनाचे सेवानियम लागू नाहीत.
  7. अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुध्द् कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
  8. अर्जाचा नमुना हा जाहिराती सोबत प्रसिध्द करण्यात आलेला असून, सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास उमेदवारांचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.
  9. उमेदवारांचा अर्ज अपुर्ण व अर्धवट भरलेला असल्याने नाकारला गेल्यास सर्वस्वी जबाबदारी हीउमेदवारांची राहील याबाबत उमेदवारांना तक्रार करता येणार नाही
  10. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
SPMCIL Recruitment 2026: CNP Nashik सहित 534 पदांसाठी मोठी भरती | 10वी ते पदवीधरांसाठी संधी

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo