CRPF Constable Bharti 2026: 10वी पास उमेदवारांसाठी मोठी भरती

CRPF Constable Bharti 2026: भारतीय सैन्यदलात सामील होण्यासाठी स्वप्न बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) वर्ष २०२६ साठी ‘टेक्निकल आणि ट्रेड्समेन’ (Technical & Tradesmen) तसेच ‘पायोनियर विंग’ (Pioneer Wing) अंतर्गत ९,१९५ कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी एक मोठी अधिसूचना जारी केली आहे. 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. सर्व पदांसाठी वेतन श्रेणी (Pay Level) ‘लेव्हल-३’ (₹२१,७०० – ₹६९,१००) अशी असून या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया २० एप्रिल २०२६ रोजी सुरू होईल आणि १९ मे २०२६ रोजी संपेल. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी  मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!

CRPF Constable Bharti 2026

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : ९,१९५ पदे
  • पदाचे नाव : कॉन्स्टेबल (तांत्रिक व कारागीर) आणि कॉन्स्टेबल (पायोनियर विंग – गवंडी / इलेक्ट्रिशियन) पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पदांचा तपशील

विभाग / पद प्रवर्ग पद संख्या
कॉन्स्टेबल (तांत्रिक व कारागीर) पुरुष 9096
कॉन्स्टेबल (तांत्रिक व कारागीर) महिला 79
कॉन्स्टेबल (पायोनियर) – गवंडी संपूर्ण भारत 13
कॉन्स्टेबल (पायोनियर) – इलेक्ट्रिशियन संपूर्ण भारत 07
एकूण ९,१९५
  • भरती विभाग : केंद्रीय राखीव पोलीस दला, अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • भरती प्रकार : भारतीय सैन्यदलात मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू 20 एप्रिल 2026 पासून
शेवटची तारीख 19 मे 2026 पर्यंत
लेखी परीक्षा लवकराच जाहीर होईल

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसाणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा शारीरिक मानक चाचणी (PST)
दुसरा टप्पा शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
तिसरा टप्पा लेखी परीक्षा (CBT)
चौथा टप्पा वैद्यकीय चाचणी
  • मासिक वेतन (Salary) : बेसिक 21,700/- ते 69,100/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 01 जानेवारी 2026 रोजी सर्वसाधारण उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे व कमाल 23 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, माजी सैनिक – 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क
श्रेणी शुल्क
General/OBC/EWS-Male 100/- रुपये
Female/SC/ST/Ex.Serviceman अर्ज शुल्क नाही

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

CRPF Constable Bharti 2026

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये  CRPF चा (CRPF Constable Bharti 2026) निर्णय अंतिम असेल.
  6. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  7. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  8. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  9. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  10. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात देखील पहा 👇
SSB Constable Bharti 2026: 10वी पाससाठी 827 जागा | Online अर्ज सुरू

हि माहिती तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना देखील शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo