जळगाव जनता सहकारी बँके अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध | Jalgaon Janata Sahkari Bank Bharti 2025

Jalgaon Janata Sahkari Bank Bharti 2025:नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी? जळगाव जनता सहकारी बँक भरती 2025 साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये “उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य महाव्यवस्थापक, मुख्य अनुपालन अधिकारी, महाव्यवस्थापक, जोखीम अधिकारी आणि दक्षता अधिकारी” या पदाकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून, या भरतीच्या वैशिष्ट्य म्हणजे सुरक्षितता आणि स्थिर करिअर घडवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीमध्ये तुम्हाला चांगले वेतन त्याच बरोबर असंख्य भत्ते, देखील मिळणार आहेत. तसेच या भरतीचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे असून अंतिम दिनांक हा 9 ऑक्टोंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी  मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!

Jalgaon Janata Sahkari Bank Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : तूर्तास उपलब्ध नाही
  • पदाचे नाव : उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य महाव्यवस्थापक, मुख्य अनुपालन अधिकारी, महाव्यवस्थापक, जोखीम अधिकारी आणि दक्षता अधिकारी पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव पात्रता
उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्यवसाय प्रशासन, वित्त, अर्थशास्त्र, व्यवस्थापन किंवा संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी, CAIIB, वित्त/अर्थशास्त्रात पदविका, सहकारी व्यवसाय व्यवस्थापनात पदविका, चार्टर्ड अकाउंटंट (CA), किंवा वित्त मध्ये MBA (किंवा समतुल्य) यासारख्या अतिरिक्त पात्रता + अनुभवाला प्राधान्य दिले जाते.
मुख्य महाव्यवस्थापक व्यवसाय प्रशासन, वित्त, अर्थशास्त्र, व्यवस्थापन किंवा संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी, CAIIB, वित्त/अर्थशास्त्रात पदविका, सहकारी व्यवसाय व्यवस्थापनात पदविका, चार्टर्ड अकाउंटंट (CA), किंवा वित्त मध्ये MBA (किंवा समतुल्य) यासारख्या अतिरिक्त पात्रता + अनुभवाला प्राधान्य दिले जाते.
मुख्य अनुपालन अधिकारी मुख्य अनुपालन अधिकारी: वित्त, अकाउंटन्सी, जोखीम व्यवस्थापन किंवा कायद्यामध्ये पदव्युत्तर पदवी किंवा व्यावसायिक प्रमाणपत्र. CAIIB, CA, ICWA, CS, IIBF चा प्रमाणित बँकिंग अनुपालन व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा LLB + अनुभव अशा पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते.
जनरल मॅनेजर व्यवसाय प्रशासन, वित्त, अर्थशास्त्र, व्यवस्थापन किंवा संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी, CAIIB, वित्त/अर्थशास्त्रात पदविका, सहकारी व्यवसाय व्यवस्थापनात पदविका, चार्टर्ड अकाउंटंट (CA), किंवा वित्त (किंवा समतुल्य) मध्ये MBA (किंवा समतुल्य) यासारख्या अतिरिक्त पात्रता + अनुभवाला प्राधान्य दिले जाते.
जोखीम अधिकारी वित्त, जोखीम, लेखा किंवा संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी, चार्टर्ड अकाउंटंट (CA), वित्त मध्ये MBA, किंवा FRM प्रमाणपत्र किंवा जोखीम, अनुपालन किंवा अंतर्गत लेखापरीक्षणात समतुल्य प्रमाणपत्र + अनुभव.
दक्षता अधिकारी व्यवसाय प्रशासन, वित्त, अर्थशास्त्र, व्यवस्थापन, चार्टर्ड अकाउंटन्सी (CA), किंवा संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी किंवा चार्टर्ड अकाउंटंट (CA), वित्त मध्ये MBA, किंवा FRM प्रमाणपत्र किंवा जोखीम, अनुपालन किंवा अंतर्गत लेखापरीक्षणात समतुल्य प्रमाणपत्र + अनुभव

Jalgaon Janata Sahkari Bank Bharti 2025

  • भरती विभाग :  जळगाव जनता सहकारी बँके अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : मुख्यालय जळगांव (महाराष्ट्र)

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू 25 सप्टेंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 9 ऑक्टोंबर 2025 पर्यंत रात्री
शोर्टलिस्त तारीख नंतर कळविण्यात येईल

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही जळगाव जनता सहकारी बँकच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा शॉर्टलिस्ट
दुसरा टप्पा मुलाखत (Interview)
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
  • अर्ज शुल्क (Fee) : उपलब्ध नाही
  • मासिक वेतन (Salary) : वेतन श्रेणी संदर्भात जाहिरातीमध्ये उल्लेख नाही.(अधिकृत संकेतस्थळावरती पहा)
  • वयोमर्यादा (Age Limit) : 31 augast 2025 रोजी
    प्रत्येक पदाकरिता वयोमर्यात आहे वेगवेगळे देण्यात आलेली आहेत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 9 ऑक्टोंबर 2025 पर्यंत सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत

महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 

Jalgaon Janata Sahkari Bank Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. निवड झालेल्या उमेदवारास बँकेच्या कोणत्याही शाखेवर नेमणूक देण्यात येईल.
  5. पदसंख्या, निवड प्रक्रिया संबंधीचे, निवड पद्धत इत्यादी बाबतचे सर्व अधिकार बैंकेकडे राखीव असतील.
  6. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  7. भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांसाठी फक्त निवडलेल्या उमेदवारांशी संपर्क साधला जाईल.
  8. कोणत्याही टप्प्यावर पूर्वसूचना न देता भरती प्रक्रियेत बदल करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार बँकेकडे राखीव आहे.
  9. कोणतेही कारण न देता कोणताही अर्ज नाकारण्याचा अधिकार बँकेकडे राखून आहे.
  10. बँकेच्या धोरणांनुसार कागदपत्रांची पडताळणी आणि पार्श्वभूमी तपासणीच्या अधीन निवड केली जाईल.
  11. या जाहिरातीमुळे आणि निवड प्रक्रियेमुळे उद्भवणारा कोणताही विवाद केवळ जळगाव येथील न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रात राहील.
  12. भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर जर असे आढळून आले की उमेदवार पात्रता निकष पूर्ण करत नाही आणि/किंवा त्याने/तिने कोणतीही चुकीची/खोटी माहिती दिली आहे किंवा कोणतीही महत्त्वाची वस्तुस्थिती लपवली आहे, तर त्याची/तिची उमेदवारी रद्द केली जाईल, नियुक्तीनंतरही यापैकी कोणतीही कमतरता आढळल्यास/निदर्शनास आल्यास, त्याच्या/तिच्या सेवा समाप्त करण्यास पात्र आहेत.
  13. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) दिल्ली पोलीस दलात 7565 पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध | SSC Delhi Police Constable Recruitment 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo