RRB Section Controller Bharti 2025 :सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना रेल्वे भरती मंडळांनी (RRB) RRB सेक्शन कंट्रोलर भरती २०२५ द्वारे एक महत्त्वपूर्ण रोजगाराची संधी उपलब्ध केली आहे. CEN क्रमांक 04/2025 अंतर्गत ही भरती मोहीम, राबवण्यात येत आहे. सेक्शन कंट्रोलरच्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी या जाहिरातीत जवळपास 368 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. हे पद केवळ नोकरी नाही तर ते भारतीय रेल्वेच्या कामकाजाच्या केंद्रस्थानी राहण्याची उमेदवारांना सुवर्ण संधी आहे, या भरती मध्या तुम्हाला सातव्या वेतन आयोगा नुसार आकर्षक पगार पॅकेज आणि नोकरीची सुरक्षा देणारी भरती आहे. पदवीधर उमेदवारांसाठी चांगल्या करिअरचा मार्ग आहे.(RRB Section Controller Bharti 2025)
अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी अंतिम दिनांक हा 14 ऑक्टोंबर 2025 पर्यंत देण्यात आलेले आहे. पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी.
RRB Section Controller Bharti 2025
अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
एकूण पदसंख्या : 0368 पदे
पदाचे नाव : विभाग नियंत्रक (Section Controller)
अर्ज शुल्क (Fee) : General/OBC : 500/- रुपये [SC/ST/PwBD/EBC/माजी सैनिक/महिला/ट्रान्सजेंडर/: 250/- रुपये.]
- ऑनलाईन लेखी परीक्षा CBT झाल्यानंतर अर्ज शुल्क परत देण्यात येईल.
- जे उमेदवार परीक्षेस गैरहजर राहतील अशा उमेदवारांना अर्ज शुल्क परत मिळणार नाही.)
| पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
| 01. | सेक्शन कंट्रोलर | 0368 |
RRB Section Controller Bharti 2025
महत्त्वाच्या तारखा :
- जाहिरात प्रसिद्ध तारीख: 23 ऑगस्ट 2025 रोजी
- ऑनलाइन अर्ज सुरूः 15 सप्टेंबर 2025 पासून
- अर्जाची शेवटची तारीखः 14 ऑक्टोंबर 2025 पर्यंत
- शुल्क भरण्याची शेवटची तारीख: 14 ऑक्टोंबर 2025 पर्यंत
- परीक्षेची तारीख : अधिकृत संकेतस्थळ वरती कळविण्यात येईल.
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असणे गरजेचे आहे.
भरती विभाग : रेल्वे भरती मंडळ (RRB) अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
(अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
मासिक वेतन : दरमहा 35,400 ते 44,900 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
वयोमर्यादा (Age Limit) : 01 जानेवारी 2026 रोजी.
- उमेदवारांचे वय 20 वर्षे ते 33 वर्षांपर्यंत असावे.
- आरक्षित श्रेणींसाठी वयात सूट(SC/ST/OBC-NCL/Ex-Servicemen/PwBD)
- वयातील सवलत सरकारी नियमांनुसार लागू होईल.
- सवलतीचे तपशील अधिसूचनेत उपलब्ध असतील.
निवड प्रक्रिया (Selection Process) :
- पहिला टप्पा : संगणक आधारित परिक्षा (CBT)
- पहिला टप्पा : संगणक आधारित अभियोग्यता परिक्षा (CBAT)
- तिसरा टप्पा : कागदपत्र पडताळणी
- तिसरा टप्पा : वैद्यकीय तपासणी
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)
ऑनाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14 ऑक्टोंबर 2025 पर्यंत.
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| जाहिरात pdf पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
RRB Section Controller Bharti 2025
अर्ज करण्याचे टप्पे:-
- अधिकृत RRB च्या अर्ज पोर्टलला भेट द्या.
- CEN क्रमांक 04/2025 – सेक्शन कंट्रोलरसाठी भरतीसाठी लिंकवर क्लिक करा.
- सूचना काळजीपूर्वक वाचा आणि “नवीन नोंदणी” वर क्लिक करा.
- नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी यासारखी तुमची मूलभूत माहिती भरा. विलंब टाळण्यासाठी आधार वापरून तुमची माहिती पडताळण्याचा सल्ला दिला जातो.
- तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीवर नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड मिळेल.
- या क्रेडेन्शियल्सचा वापर करून लॉग इन करा आणि तुमच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक तपशीलांसह तपशीलवार अर्ज भरा.
- तुमच्या छायाचित्राच्या आणि स्वाक्षरीच्या स्कॅन केलेल्या प्रती विहित नमुन्यात अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरण्यासाठी पेमेंट गेटवेवर जा.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी तुमच्या अर्जाची पूर्णपणे तपासणी करा.
- भविष्यातील संदर्भासाठी तुमच्या सबमिट केलेल्या अर्जाची एक प्रत डाउनलोड करा आणि प्रिंट करा.
⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- कौशल्य चाचणी, वैद्यकीय तपासणी, शारीरिक पात्रता यासाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावरती कळवण्यात येईल.
- मुलाखतीसाठी उमेदवारांना बोलावण्याचा इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स निर्णय अंतिम असेल. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
- मुलाखतीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करिता बोलवण्यात येईल
- उमेदवारांच्या भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही उमेदवाराची उमेदवारी नाकारण्याचा अधिकार रेल्वे भरती मंडळ राखून ठेवेल, जर अपात्र असल्याचे आढळले किंवा चुकीची माहिती/प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर केली किंवा कोणतीही ‘भौतिक तथ्ये’ लपवली असतील, तर उमेदवारी रद्द करण्यात येईल.(RRB Section Controller Bharti 2025)
- जाहिरात केलेल्या रिक्त पदांची संख्येत वाढ किंवा घट होऊ शकते.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
ही जाहिरात पण पहा👇
मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गट-ड भरती 2025 : GMC Miraj Bharti 2025
हि जाहिरात तुमचे नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा
Good