मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गट-ड भरती 2025 : GMC Miraj Bharti 2025

GMC Miraj Bharti 2025 : आरोग्य क्षेत्रात सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई याच्या अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज, पदमभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली व आरोग्य शिक्षण पथ्थक, तासगांव यांच्या अंतर्गत जवळपास 263 पदांसाठी गट-ड (वर्ग-4) संवर्गातील रिक्त वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, आणि पदानुसार पात्रता मागवण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी जाहिरातीत पदापुढे नमूद केलेली शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी.(GMC Miraj Bharti 2025) अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी अंतिम दिनांक हा 04 ऑक्टोंबर 2025 पर्यंत देण्यात आलेले आहे. पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

GMC Miraj Bharti 2025

अर्ज स्विकारण्याची पद्धत :  ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
एकूण पदसंख्या : 263 पदे
पदाचे नाव :  वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेले आहेत. मूळ जाहिरात pdf मध्ये पहा
शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि प्रत्येक पदांनुसार वेगवेगळी आहे त्यामुळे सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

महत्त्वाच्या तारखा :

  1. जाहिरात प्रसिद्ध तारीख: 22 ऑगस्ट 2025 रोजी
  2. ऑनलाइन अर्ज सुरूः 14 सप्टेंबर 2025 पासून
  3. अर्जाची शेवटची तारीखः   04 ऑक्टोंबर 2025 पर्यंत
  4. शुल्क भरण्याची शेवटची तारीख (ऑनलाइन): 04 ऑक्टोंबर 2025 रात्री 23:59पर्यंत
  5. ऑनलाईन (CBT)परीक्षेची तारीख :- ऑनलाइन परीक्षेची तारीख अधिकृत
  6. संकेतस्थळावरती परीक्षेच्या 10 दिवस आधी कळविण्यात येईल
    संस्थेचे नांव

GMC Miraj Bharti 2025

पदांचा तपशील:

अ. क्रं. संस्थेचे नाव पद संख्या
1. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज 047
2. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज 080
3. पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली 128
4. आरोग्य शिक्षण पथक, तासगांव 008
TOTAL 263

भरती विभाग :  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,मिरज अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
भरती श्रेणी : सरळसेवे मार्फत सरकारी नोकरी मिळण्याची  संधी
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूप सरकारी नोकरी
नोकरीचे ठिकाण:- सांगली जिल्हा (महाराष्ट्र)

(अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

अर्ज शुल्क (Fee) :
मासिक वेतन (Salary ) : दरमहा 15,000 ते 47,600 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.

वयोमर्यादा (Age Limit): 31 ऑगस्ट 2025 रोजी
पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 ते 38 वर्ष दरम्यान असावे.
सरकारी नियमांनुसार विविध श्रेणींसाठी वयात सूट देण्यात आली आहे.
[SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट, दिव्यांग : 7 वर्ष सूट, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त : 7 वर्ष सूट ]

निवड प्रक्रिया (Selection Process) :

  • पहिला टप्पा : संगणक आधारित परीक्षा (CBT)
  • दुसरा टप्पा : कागदपत्र पडताळणी

ऑनाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 ऑगस्ट 2025 रात्री 23:59 पर्यंत

अधिकृत संकेतस्थळ मिरज  येथे क्लिक करा 
जाहिरात pdf पहा  येथे क्लिक करा 
अधिकृत संकेतस्थळ सांगली येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:

  • उमेदवारांस मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यास मराठी लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध (Valid) ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी (Mobile No.) असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेची तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणार असल्याने, भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणांमध्ये वाढ, घट अथवा बदल होण्याची शक्यता आहे.
  • कोणत्याही कारणास्तव पदभरती प्रक्रिया स्थगित रह झाल्यास उमेदवारास परीक्षा शुल्क परत करण्यात येणार नाही.
  • प्रस्तुत जाहीरातीस अनुसरुन अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता / अनुभव धारण करणे आवश्यक आहे.
  • अनुभवाच्या कालावधीची गणना प्रस्तूत जाहीरातीस अनुसरुन अर्ज सादर करण्याकरीता विहित केलेल्या अंतिम दिनांकास करण्यात येईल. (GMC Miraj Bharti 2025)
  • परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-Refundable) आहे. ऑनलाईन शुल्क भरतांना बँकेचे इतर शुल्क उमेदवाराला स्वतः भरावे लागतील.
  • भरती प्रक्रियेबाबतचे सर्व अधिकार नियुक्ती प्राधिकारी यांना असून कोणत्याही टप्प्यावर भरती स्थगित किंवा रद्द करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांचेकडे राखून ठेवले आहे.
  • उमेदवाराने या भरती प्रकियेसंदर्भातील माहिती व सूचना वैद्यकीय महाविद्यालय मिरज यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द होणार असल्याने भरती प्रक्रिया पूर्ण हाईपर्यंत www.gmcmiraj.edu.inSangli.gov.in वरील संकेतस्थळावर उमेदवारांनी सद्यस्थिती (updates) वेळोवेळी पहावी.
  • परीक्षेसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रवास खर्च देय नाही.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील दिलेली जाहिरात pdf सविस्तर वाचवी.

हि जाहिरात पण पहा 👇

नागपूर महानगरपालिका नवीन जाहिरात प्रसिद्ध: Nagpur Mahanagar Palika Bharti 2025

हि जाहिरात तुमचे नातेवाईक मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा

3 thoughts on “मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गट-ड भरती 2025 : GMC Miraj Bharti 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo