Punjab and Sindh Bank Bharti 2025: बँकिंग क्षेत्रात करियर घडवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी सुवर्ण संधी चालून आलेली आहे. भारतातील इच्छुक बँकर्ससाठी एक महत्त्वाची जाहिरात आहे. ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड/स्केल-I (JMGS-I) मध्ये “लोकल बँक ऑफिसर” पदासाठी तब्बल 750 रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पंजाब अँड सिंध बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक आहे पंजाब अँड सिंध बँक मधील करिअर हे केवळ नोकरी नाही तर ती प्रतिष्ठेची आणि सुरक्षतेची बाब असल्याने, ही भरती मोहीम सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग उद्योगात स्थिर आणि फायदेशीर कारकीर्द मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. (Punjab and Sindh Bank Bharti 2025)अर्ज करण्यासाठी दिनांक 20 ऑगस्ट 2025 पासून ते 04 सप्टेंबर 2025 या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या अविश्वसनीय संधीचा फायदा करून घ्या यशस्वीरित्या अर्ज करण्यासाठी आणि तयारी करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा हा मार्गदर्शक आणि व्यापक आढावा हा या लेखात सविस्तर दिलेला आहे. कृपया अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आलेले आहे ती वाचावी.
Punjab and Sindh Bank Bharti Details 2025
अर्ज स्विकारण्याची पद्धत :- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
एकूण पदसंख्या :- एकूण पदे 500
पदाचे नाव :- लोकल बँक ऑफिसर
शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या भरती साठी अर्ज सादर करू शकतो.
महत्त्वाच्या तारखा :-
- ऑनलाइन अर्ज सुरूः 20 ऑगस्ट 2025 पासून
- अर्जाची शेवटची तारीखः 11 सप्टेंबर 2025 पर्यंत
- शुल्क भरण्याची शेवटची तारीख (ऑनलाइन): 11 सप्टेंबर 2025 पर्यंत
- ऑनलाईन (CBT)परीक्षेची तारीख :- ऑक्टोंबर 2025
भरती विभाग :- पंजाब अँड सिंध बँक अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
भरती श्रेणी :- बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची संधी.
नोकरीचा प्रकार :- कायमस्वरूप बँकिंग क्षेत्रात नोकरी
Punjab and Sindh Bank Bharti 2025
जागांचा तपशील :-
| अ.क्रं. | राज्य/केंद्रशासित प्रदेश | पद संख्या |
| 1. | आंध्र प्रदेश | 080 |
| 2. | छत्तीसगड | 040 |
| 3. | गुजरात | 100 |
| 4. | हिमाचल प्रदेश | 030 |
| 5. | झारखंड | 035 |
| 6. | कर्नाटक | 065 |
| 7. | महाराष्ट्र | 100 |
| 9. | ओडिशा | 085 |
| 10. | पुदुचेरी | 005 |
| 11. | पंजाब | 060 |
| 12. | तामिळनाडू | 085 |
| 13. | तेलंगणा | 050 |
| 14. | आसाम | 015 |
| TOTAL | 750 |
(अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
अर्ज शुल्क (Fee) :
- General/OBC/EWS : 850 + GST ] रुपये.
- SC/ST/PWD : 100 + GST ] रुपये.
मासिक वेतन (Salary ) : दरमहा 48480 ते 85920 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
वयोमर्यादा (Age Limit): 01 ऑगस्ट 2025 रोजी
- पात्र उमेदवारांचे वय हे किमान 21 ते 30 वर्ष दरम्यान असावे.
- सरकारी नियमांनुसार विविध श्रेणींसाठी वयात सूट देण्यात आली आहे.
[SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
निवड प्रक्रिया (Selection Process) :
- पहिला टप्पा : संगणक आधारित परीक्षा (CBT)
- दुसरा टप्पा : कागदपत्र पडताळणी
- तिसरा टप्पा : मुलाखत (Interview)
नोकरीचे ठिकाण : पंजाब अँड सिंध बँक भारतातील राज्यांमध्ये
ऑनाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 04 सप्टेंबर 2025 11 सप्टेंबर 2025
Punjab and Sindh Bank Bharti 2025
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| जाहिरात pdf पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मनात घेतली जाणार नाही.
- बँकेने स्थापन केलेली शॉर्टलिस्टिंग समिती शॉर्टलिस्टिंग पॅरामीटर्स ठरवेल आणि त्यानंतर, बँकेने ठरवल्याप्रमाणे पुरेशा संख्येने उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीसाठी उमेदवारांना बोलावण्याचा बँकेचा निर्णय अंतिम असेल. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवारांच्या भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही उमेदवाराची उमेदवारी नाकारण्याचा अधिकार बँकेकडे राखून ठेवला आहे, जर अपात्र असल्याचे आढळले किंवा चुकीची माहिती/प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर केली किंवा कोणतीही ‘भौतिक तथ्ये’ लपवली असतील, आणि अपात्र उमेदवारांनी भरलेले शुल्क जप्त केले जाईल.
- जाहिरात केलेल्या रिक्त पदांची संख्या तात्पुरती आहे आणि बँकेच्या ‘वास्तविक आवश्यकतांनुसार, योग्य उमेदवाराच्या उपलब्धतेनुसार’ बदलू शकते.(Punjab and Sindh Bank Bharti 2025)
- निवडलेल्या उमेदवारांना बँकेच्या आवश्यकतेनुसार 12 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर किंवा SMGS IV मध्ये पदोन्नती झाल्यानंतर, जे आधी असेल ते भारतात कुठेही नियुक्त केले जाऊ शकते.
- बँकेच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांची योग्यता आणि अनुभव यावर आधारित बँक त्यांची पात्रता विचारात घेईल. केवळ किमान पात्रता आणि अनुभव पूर्ण केल्याने मुलाखतीसाठी बोलावण्याचा उमेदवाराला कोणताही अधिकार राहणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
हि जाहिरात पण पहा 👇
मुंबई उच्च न्यायालय भरती जाहिरात प्रसिद्ध 2025 Bombay High Court Requirement 2025
नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा
3 thoughts on “बँकिंग क्षेत्रात सुवर्णसंध | पंजाब अँड सिंध बँक भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | Punjab and Sindh Bank Bharti 2025”