TAIT Exam Result 2025:आज अखेर, अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा (TAIT) परीक्षेचा निकाल आणि गुणपत्रिका आज, दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरती www.mscepune.in वर प्रसिद्ध करण्यात आला आहे. ही परीक्षा 27 ते 30 मे आणि 02 ते 05 जून 2025 पर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यात अनेक शिफ्टमध्ये घेण्यात आली होती. शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षेचा निकाल 2025 हा स्कोअरकार्ड स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आला आहे, ज्यामध्ये उमेदवाराचे नाव, प्रत्येक विभागात मिळालेले गुण, एकूण गुण, पात्रता स्थिती इत्यादी माहिती समाविष्ट केली आहे.
या परीक्षेसाठी एकूण 02 लाख 28 हजार 808 उमेदवारांनी नोंदणी केली होती आणि त्यापैकी एकूण 02 लाख 21 हजार 308 उमेदवार परीक्षेला बसले होते. महाराष्ट्र TAIT Exam Result 2025 निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख वापरून तपासता येतील. उमेदवारांनी त्यांचे स्कोअर कार्ड 31 ऑगस्ट 2025 पूर्वी डाउनलोड करावेत. कारण ही लिंक त्याच तारखेपर्यंत सक्रिय राहणार आहे, उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ही सरकारी अनुदानित शाळांमधील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांसाठी उमेदवारांच्या पात्रतेचे मूल्यांकन करण्यासाठी घेतली जाणारी राज्यस्तरीय परीक्षा आहे. महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (TAIT Exam Result 2025) साठी पात्रता स्थिती आज संकेतस्थळावरती किमान पात्रता गुणांनुसार उपलब्ध करून देण्यात आली आहे.
TAIT Exam Result 2025
परीक्षेचा तपशील :
आयोजक संस्था :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे (MSCE Pune) अंतर्गत
परीक्षेचे नाव :- महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (MAHA TAIT-2025)
निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा
परीक्षेत उपस्थित उमेदवार :- 02 लाख 21 हजार 308
( ! हे जाणून घ्या :- जे उमेदवार वेळेवर कागदपत्रे सादर करू शकले नाहीत त्यांना त्यांचे निकाल मिळणार नाहीत. परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे की अंतिम मुदतीनंतर उशिरा आलेल्या कोणत्याही अर्जाची किंवा विनंत्या स्वीकारल्या जाणार नाहीत.)
महत्वाच्या तारखा :-
1) निकाल आणि स्कोअर कार्ड प्रकाशन तारीख :- 18 ऑगस्ट 2025
2) स्कोअर कार्ड डाउनलोड करण्याची शेवटची तारीख :- 31 ऑगस्ट 2025
अर्ज प्रक्रिया :- 26 एप्रिल 2025 पासून सुरू झाली होती शेवटची तारीख :-14 मे 2025 देण्यात आली होती.
परीक्षा कालावधी :- TAIT परिक्षा दोन टप्प्यात घेण्यात आली होती
दिनांक – 27 मे ते 30 मे 2025
दिनांक – 2जून ते 5 जून 2025
परीक्षेचा मुख्य उद्दिष्ट :-
•गुणवत्तापूर्ण शिक्षक तयार करणे.
•शिक्षक म्हणून कार्य करण्यासाठी आवश्यक पात्रता तपासणे.
•ज्ञान, कौशल्ये आणि अध्यापन क्षमता तपासणे.
•शालेय स्तरावर (प्राथमिक व माध्यमिक) शिक्षकांची निवड सुनिश्चित करणे.
TAIT Exam :- शिक्षक अभियोग्यता चाचणी ही शिक्षक म्हणून पात्र ठरण्यासाठी घेतली जाणारी एक महत्त्वाची परीक्षा आहे. जी महाराष्ट्रातील D.ed/ B.ed करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांची पात्रता तपासण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही शिक्षक पात्रता परीक्षा किंवा शिक्षक अभियोग्यता चाचणी घेण्यात येणारे महाराष्ट्रातील महत्त्वांच्या परीक्षांपैकी एक परीक्षा आहे. जी उमेदवारांना शिक्षक म्हणून निवड होण्यासाठी महत्त्वाची परीक्षा मानली जाते .
TAIT Exam Result 2025
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| संपूर्ण pdf निकाल | येथे क्लिक करा |
| निकाल येथे पहा | येथे क्लिक करा |
शिक्षक अभियोग्यता चाचणी निकाल आणि स्कोर कार्ड पाहण्यासाठी उमेदवारांनी खालील पद्धतीचे अनुसरण करू शकता.
- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची अधिकृत वेबसाइट www mscepune.in ला भेट द्या.
- मुख्यपृष्ठावर, विभागाविषयी विभागांतर्गत, “शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT)- 2025-निकाल किंवा शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) – 2025 निकाल” वर क्लिक करा. TAIT Exam Result 2025
- क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर एक लॉगिन पोर्टल दिसेल.
- लॉगिन पोर्टलमध्ये नोंदणी क्रमांक/रोल नंबर आणि पासवर्ड/जन्मतारीख यासारखे लॉगिन तपशील भरा.
- क्रेडेन्शियल्स सबमिट करा आणि तुमची पात्रता स्थिती तपासा.
- MSCE पुणे TAIT निकाल 2025 स्क्रीनवर दिसतो.
भविष्यातील संदर्भासाठी ते जतन करा आणि डाउनलोड करा.
ही जाहिरात पण पहा 👇
भारतीय जीवन विमा महामंडळ जाहिरात प्रसिद्ध : LIC Recruitment 2025
ही माहिती तुमच्या नातेवाईक/मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा