RRC Northern Railway Apprentice Recruitment 2026: RRC उत्तर रेल्वे बंपर भरती: ४१५१ जागा! १०वी+ITI साठी सुवर्णसंधी.

RRC Northern Railway Apprentice Recruitment 2026: जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल आणि आयटीआय (ITI) कोर्स पूर्ण केला असेल रेल्वे विभागात करिअर घडवण्यासाठी एक उत्तम संधी उत्तर रेल्वे विभागाने निर्माण करून दिली आहे. अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार)पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, यामध्ये फिटर, इलेक्ट्रीशियन, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक), मेकॅनिक (डिझेल), सुतार आणि इतर अनेक ट्रेड्सचा समावेश आहे, जे सहा क्लस्टर्समध्ये विभागलेले आहेत. या मध्ये एकूण 4151 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे, जर तुम्ही भारतीय रेल्वेसोबत काम करण्याचे स्वप्न बघितले असेल तर या संधीचा नक्कीच फायदा करून घ्या. हि भरती केवळ प्रशिक्षण नाही तर यामध्ये तुम्हाला मासिक पगार देखील देण्यात येणार असून, या भरतीचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून त्याचा अंतिम दिनांक 11 डिसेंबर 2026 पर्यंत देण्यात आलेला आहे. अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आलेली आहे ती वाचावी!

RRC Northern Railway Apprentice Recruitment 2026

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : 4151 पदे
  • पदाचे नाव : अप्रेंटिस शिकाऊ उमेदवार (मूळ जाहिरात वाचा)
  • शैक्षणिक पात्रता : तुम्ही मान्यताप्राप्त बोर्डातून एसएससी / मॅट्रिक्युलेशन / दहावी (किंवा १०+२ प्रणाली अंतर्गत समकक्ष) एकूण किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, तुम्ही एनसीव्हीटी (NCVT) किंवा एससीव्हीटी (SCVT) मधून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अधिक दहावी पास नोकऱ्या आणि आयटीआय (ITI) नोकऱ्या तपासा.

पदांचा तपशील

क्लस्टरचे नाव प्रवर्ग  रिक्त जागा
लखनऊ UR 774 / SC 229 / ST 112 / OBC 410 1525
दिल्ली UR 668 / SC 198 / ST 94 / OBC 352 1312
फिरोझपूर UR 442 / SC 169 / ST 12 / OBC 117 740
मोरादाबाद UR 32 / SC 9 / ST 6 / OBC 16 63
अंबाला UR 501 / SC 144 / ST 72 / OBC 262 979
जम्मू UR 16 / SC 6 / ST 4 / OBC 6 32
  • भरती विभाग : RRC उत्तर रेल्वे विभागा अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • भरती श्रेणी : भविष्यात रेल्वे विभागात नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
  • भरती प्रकार : अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरु ११ नोव्हेंबर 2026 पासून
शेवटची तारीख 11 डिसेंबर 2026 पर्यंत
मिरीत लिस्ट (अपेक्षित) फेब्रुवारी 2026

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही RRC उत्तर रेल्वे विभागाच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा शॉर्टलिस्टिंग
दुसरा टप्पा गुणवत्ता यादी (दहावी+आयटीआय गुणांवर आधारित)
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
चौथा टप्पा वैद्यकीय तपासणी
  • मासिक वेतन (Salary) : अप्रेंटिस ऍक्ट 1961 नुसार मासिक 11,000 रुपये देण्यात येईल
  • वयोमर्यादा (Age Limit) : 11 डिसेंबर 2026 रोजी, सर्वसाधारण उमेदवारांचे वय किमान 15 वर्षे व कमाल 24 वर्षे असावे.
  • [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्ष सूट ]
  • नोकरीचे ठिकाण : RRC उत्तर रेल्वे विभागामध्ये

अर्ज शुल्क

श्रेणी शुल्क
General/OBC/EWS 100/- रुपये
SC/ST/PWD/Woman अर्ज शुल्क नाही
महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

RRC Northern Railway Apprentice Recruitment 2026

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये रंच उत्तर रेल्वे विभागाकडे (RRC Northern Railway Apprentice Recruitment 2026)निर्णय अंतिम असेल.
  6. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  7. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  8. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  9. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  10. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 💁‍♂️RRB Station Master Bharti 2026: भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदांसाठी बंपर भरती; पगार ₹३५,४००, असा करा अर्ज!

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo