RRB Station Master Bharti 2026: भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदांसाठी बंपर भरती; पगार ₹३५,४००, असा करा अर्ज!

RRB Station Master Bharti 2026: भारतीय रेल्वे विभागात नोकरी शोधत असाल तर ही जाहिरात तुमच्या साठी आहे कारण रेल्वे भरती मंडळांनी (RRBs) स्टेशन मास्टर पदासाठी CEN क्र. 08/2026 अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या मध्ये सुरुवातीचा पगार हा 35,400 रुपये आहे. देशातील सर्व RRB चे विभाग मिळून एकूण 1,265 रिक्त जागा आहेत. यासाठी 27 ऑक्टोबर 2026 ते 25 नोव्हेंबर 2026 (रात्री 11:59 वाजेपर्यंत) ऑनलाइन अर्ज करता येतील. पात्रता, निकष सर्व माहिती या लेखात दिली आहे. उमेदवारांनी कृपया अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आलेले आहे ती वाचावी!

RRB Station Master Bharti 2026

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 1265 पदे
  • पदाचे नाव : स्टेशन मास्टर या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

पदांचा तपशील

पद क्रं  पदाचे नाव  पद संख्या
1. स्टेशन मास्टर  1265
  • भरती विभाग : भारतीय रेल्वे मंडळा अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : रेल्वे विभागात कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण :  संपूर्ण भारत (Job In India)

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू 27 ऑक्टोंबर 2026 पासून
अर्जाची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2026 पर्यंत
ऑनलाईन अर्ज शुल्क 27 नोव्हेंबर 2026 पर्यंत
परीक्षा तारीख नंतर कळवण्यात येईल

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही भारतीय रेल्वे मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसाणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा संगणक आधारित चाचणी १ (CBT-1)
दुसरा टप्पा संगणक आधारित चाचणी २ (CBT-2)
तसरा टप्पा  संगणक आधारित अभियोग्यता चाचणी (CBAT / सायको टेस्ट)
चौथा टप्पा  कागदपत्र पडताळणी
पाचवा टप्पा वैद्यकीय तपासणी
  • मासिक वेतन (Salary) : बेसिक 35,400/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 1 जानेवारी 2027 रोजी पात्रता धारक उमेदवारांचे किमान वय 20 वर्षे व कमाल वयोमर्यादा 33 वर्षे देण्यात आलेली आहे.
  • [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क
श्रेणी शुल्क
General/EWS/OBC 500/- रुपये
SC/ST/Ex-Servicemen /PwBD/Female /Transgender/Minorities/EBC 250/- रुपये

[टीप: परीक्षा दिल्यानंतर बँक चार्जेस वजा करून General/OBC/EWS उमेदवारांना ४०० रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना पूर्ण २५० रुपये परत मिळतात. “बँक चार्जेस वजा करून शुल्क परत मिळेल” असा स्पष्ट उल्लेख केल्यास अधिक पारदर्शकता राहील.]

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 

RRB Station Master Bharti 2026

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  • या जाहिरातीचे अर्ज हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
    कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  • उमेदवाराची उमेदवारी निवडीच्या सर्व टप्प्यांवर तात्पुरती आहे जर सर्व पात्रता अटी पूर्ण झाल्या असतील आणि रेल्वे बोर्डाने वेळोवेळी जारी केलेल्या नियम/सूचनांनुसार पात्र नसल्याचे आढळल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार RRB कडे राखून ठेवते.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
RRB NTPC Bharti 2026: १२ वी पास तरुणांसाठी रेल्वेत मोठी संधी; RRB NTPC अंतर्गत १,६८८ पदांची भरती सुरू

ही जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo