Bank of Baroda Recruitment 2026: बँक ऑफ बडोदाने (BOB) सहा विभागांमधील २०६ जागांसाठी ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ (SO) भरतीची मोठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जर तुम्ही सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअर, आयटी (IT) किंवा डेटा क्षेत्रातील व्यावसायिक, चार्टर्ड अकाउंटंट असाल, किंवा पाच वर्षांची ‘कमिशनड्’ (commissioned) किंवा ‘क्लास-१ गॅझेटेड’ सेवा पूर्ण केलेले संरक्षण, पोलीस किंवा निमलष्करी दलातील अधिकारी असाल, तर तुमच्यासाठी येथे संधी उपलब्ध आहे. यामध्ये टेक्निकल ऑफिसर, मॅनेजर, सीनियर मॅनेजर आणि चीफ मॅनेजर या पदांचा समावेश असून, त्यासाठीचा मूळ पगार (basic pay) दरमहा ₹४८,४८० ते ₹१,२०,९४० इतका आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची साठी अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026 ते 26 ऑगस्ट 2026 पर्यंत खुली आहे. पात्रता आणि निवडीबद्दल संपूर्ण माहितीसाठी खाली वाचा.
Bank of Baroda Recruitment 2026
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 206 पदे
- पदाचे नाव : तांत्रिक अधिकारी, तांत्रिक व्यवस्थापक, तांत्रिक वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उत्पादन व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक आणि मुख्य व्यवस्थापक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- शैक्षणिक पात्रता : तुमची पदवी तुम्ही निवडलेल्या पदाशी सुसंगत असावी आणि ती भारत सरकार, सरकारी संस्था किंवा AICTE द्वारे मान्यताप्राप्त महाविद्यालय, संस्था किंवा विद्यापीठातून मिळवलेली असावी. पदनिहाय शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी खाली दिलेली अधिसूचना PDF पहा.
पदांचा तपशील
| Sr. No. | Post Name | Vacancy |
| 1. | Facility Management | 88 |
| 2. | Security | 54 |
| 3. | Digital Banking | 19 |
| 4. | Information Security | 16 |
| 5. | Accounts and Taxation | 15 |
| 6. | Enterprise Data Management | 14 |
| TOTAL | 206 |
- भरती विभाग : बँक ऑफ बडोदा, अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- भरती प्रकार : BOB मध्ये कायमस्वरुपी नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
- नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (Anywhere in India )
महत्त्वाच्या तारखा
| अर्ज सुरू | 6 ऑगस्ट 2026 पासून |
| शेवटची तारीख | 26 ऑगस्ट 2026 |
| ऑनलाईन परीक्षा/मुलाखत | नंतर कळवण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | अर्ज छाननी |
| दुसरा टप्पा | ऑनलाईन परीक्षा |
| तिसरा टप्पा | ऑनलाईन परीक्षा /मुलाखत |
- मासिक वेतन (Salary) : बेसिक ₹४८,४८०/- पासून मिळणार आहे. वेतन श्रेणी पदानुसार वेगवेगळी देण्यात आली आहे
- वयोमर्यादा (Age Limit) : 6 ऑगस्ट 2026 रोजी सर्वसाधारण उमेदवाराचे किमान वय 23 वर्षे व कमाल 37 वर्षे असणे आवश्यक आहे.
- [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्षे सूट]
अर्ज शुल्क
| श्रेणी | तपशील |
| General/OBC/EWS | 850/- + GST रुपये |
| SC/ST/PwBD/ESM/ DESM/Women | 175/- + GST रुपये |
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
Bank of Baroda Recruitment 2026
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये BOB चा (Bank of Baroda Recruitment 2026) निर्णय अंतिम असेल.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील PDF जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
IBPS Clerk Recruitment 2026: 11,403 जागांसाठी मेगा भरती सुरू | रुपये 24,050 पगार, अर्ज सुरू
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना देखील शेअर करा