Bank of Maharashtra Apprentice Bharti 2026 | बँकिंग क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी बँक ऑफ महाराष्ट्राने (BOM) एक उत्तम संधी निर्माण करून दिलेली आहे, महाराष्ट्रातील पुणे येथे 600 अप्रेंटिस रिक्त पदांसाठी ही एक मोठी भरती मोहीम आहे. तुमच्याकडे योग्य शैक्षणिक पात्रता असेल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात, या भरतीमध्ये तुम्हाला मासिक वेतन अप्रेंटिस कायदा 1961 नुसार मिळणार आहेत. या भरतीचे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 25 जानेवारी 2026 पर्यंत देण्यात आलेला आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!
Bank of Maharashtra Apprentice Bharti 2026
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 600 पदे
- पदाचे नाव : अप्रेंटिस शिकाऊ उमेदवार (मूळ जाहिरात वाचा)
- शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्या शाखेतील पदवी उत्तीर्ण नसणे आवश्यक आहे.
पदांचा तपशील
| पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | अप्रेंटिस | 600 |
- भरती विभाग : बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.
- नोकरीचा प्रकार : अप्रेंटिस
- नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र (Job In Maharashtra)
महत्त्वाच्या तारखा
| अर्ज सुरू | 15 जानेवारी 2026 पासून |
| शेवटची तारीख | 25 जानेवारी 2026 पर्यंत |
| निकाल | नंतर कळविण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाची सूचना : सदर भरती ची जाहिरात ही बँक ऑफ महाराष्ट्राच्या (BOM) अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | शॉर्टलीस्ट |
| दुसरा टप्पा | स्थानिक भाषा चाचणी |
| तिसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
| चौथा टप्पा | वैद्यकीय तपासणी |
- मासिक वेतन (Salary) : अप्रेंटिस ऍक्ट 1961 नुसार 12,300 मासिक वेतन मिळणार आहे.
- वयोमर्यादा (Age Limit) : सर्वसाधारण उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे.
- [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्ष सूट]
अर्ज शुल्क
| General/OBC/EWS | 150/- रुपये + GST |
| SC/ST | 100/- रुपये + GST |
| PwBD/Women | अर्ज शुल्क नाही |
Bank of Maharashtra Apprentice Bharti 2026
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
- अनिवार्य पोर्टल नोंदणी: प्रथम, सर्व उमेदवारांनी भारत सरकारच्या अप्रेंटिसशिप पोर्टलवर स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे.
- NATS पोर्टल आणि/किंवा NAPS पोर्टलवर जा (खाली दिलेली लिंक)
- तुमची नोंदणी पूर्ण करा आणि तुमचा नावनोंदणी आयडी (NATS कडून) किंवा अप्रेंटिस नोंदणी कोड (NAPS वरून) मिळवा.
- पोर्टलवर अर्ज करा: NATS/NAPS पोर्टलवर लॉग इन करा आणि “बँक ऑफ महाराष्ट्र” अप्रेंटिसशिप संधी शोधा आणि “अर्ज करा” वर क्लिक करा.
- ईमेलची वाट पहा: सरकारी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर, तुम्हाला info@bfsissc.com वरून एक ईमेल प्राप्त होईल. या ईमेलमध्ये अंतिम अर्ज फॉर्मची लिंक असेल.
- अंतिम अर्ज भरा: “अर्ज सह परीक्षा फॉर्म” उघडण्यासाठी ईमेलमधील लिंकवर क्लिक करा.
- तपशील प्रविष्ट करा: तुमची सर्व वैयक्तिक माहिती, श्रेणी आणि तुमच्या निवडलेल्या राज्यातील जास्तीत जास्त तीन पसंतीच्या प्रशिक्षण ठिकाणांची निवड भरा.
- शुल्क भरा: प्रदान केलेल्या पेमेंट गेटवेद्वारे अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
- सबमिट करा आणि प्रिंट करा: अंतिम अर्ज सबमिट करा आणि फॉर्मची प्रिंटआउट आणि तुमच्या नोंदींसाठी ई-पावती घ्या.
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
Bank of Maharashtra Apprentice Bharti 2026
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये BOM चा (Bank of Maharashtra Apprentice Bharti 2026) निर्णय अंतिम असेल.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
Yantra Indian Limited Apprentice Bharti 2026 | 3979 जागांसाठी 10वी व ITI उमेदवारांना संधी
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना देखील शेअर करा
Data opretar