Income Tax Department Sports Quota Bharti 2026: आयकर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त, मुंबई यांनी गुणवंत खेळाडूंच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मोहिमेद्वारे कर सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड-II आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) या पदांसाठी ९७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. केंद्र सरकारमध्ये स्थिर आणि प्रतिष्ठित करिअर करू इच्छिणाऱ्या खेळाडूंसाठी आयकर विभागात सामील होण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती मुंबई येथे केली जाईल आणि त्यांना सातव्या वेतन आयोगाचे फायदे मिळतील. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक ०७ जानेवारी २०२६ पासून सक्रिय झाली असून ती ३१ जानेवारी २०२६ रोजी बंद होईल.
Income Tax Department Sports Quota Bharti 2026
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 97 पदे
- पदाचे नाव : कर सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड-II, एमटीएस पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी/पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज सादर करू शकतात
पदांचा तपशील
| पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | कर सहाय्यक (TA) | 47 |
| 2. | मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) | 38 |
| 3. | स्टेनोग्राफर ग्रेड-II | 12 |
| एकुण | 97 |
- भरती विभाग : आयकर विभागा अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : आयकर विभागात कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र
महत्त्वाच्या तारखा
| अर्ज सुरू | 7 जानेवारी 2026 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 31 जानेवारी 2026 पर्यंत |
| निकाल | नंतर कळविण्यात येईल |
[Disclaimer : सदर भरती ची जाहिरात हिआयकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | शॉर्टलीस्ट स्पोर्ट मिरीट |
| दुसरा टप्पा | कौशल्य चाचणी |
| तिसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- मासिक वेतन (Salary) : बेसिक 18,000/- ते रु. 81,100/- रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
- वयोमर्यादा (Age Limit) : 1 जानेवारी 2026 रोजी खुल्या प्रवर्गासाठी किमान वय 18 वर्ष व कमाल 27 वर्षे असणे आवश्यक आहे.
- [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्ष सूट ]
अर्ज शुल्क
| श्रेणी | शुल्क |
| General/OBC/EWS | 200/- रुपये |
| SC/ST/Women | अर्ज शुल्क नाही |
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 जानेवारी 2026 पर्यंत
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
Income Tax Department Sports Quota Bharti 2026
महत्त्वाची सूचना
- अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आयकर विभागाच्या अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
- रिक्त पदांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे
- भरती प्रक्रियेबाबत आयकर विभागाचा निर्णय अंतिम राहील
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
Bombay High Court Bharti 2026: बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत नवीन 2,331 जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध 2026
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा
1 thought on “Income Tax Department Sports Quota Bharti 2026 : आयकर विभाग मुंबईत विविध पदांसाठी भरती 2026”