NHM Raigad Bharti 2026 : आरोग्य क्षेत्रात नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), अंतर्गत अलिबाग-रायगड जिल्हा साठी विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून. इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून यामध्ये जवळपास 154 रिक्त जागांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत, पात्रताधारक उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. या भरतीचे अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 12 आणि 13 जानेवारी 2026 पर्यंत सादर करण्यास उमेदवारांना आवाहन केले आहे. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी.
NHM Raigad Bharti 2026
अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
एकूण पदसंख्या : 154 पदे
पदाचे नाव : “स्टाफ नर्स/एल.एच. व्ही (पुरुष), स्टाफ नर्स (पुरुष), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, कीटकशास्त्रज्ञ (बीपीएचयू), सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ (बीपीएचयू), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (बीपीएचयू), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (एनटीईआर), जिल्हा कार्यक्रम समन्वयक (आशा आणि ईएमएस), जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक, सीपीएचसी सल्लागार, जिल्हा कार्यक्रम समन्वयक (एनपीसीडीसीएस), रुग्णालय व्यवस्थापक, जिल्हा कार्यक्रम समन्वयक (एनटीईपी), जिल्हा साथरोग विशेषज्ञ, आयुष सल्लागार, नेत्रतज्ञ, दंत तंत्रज्ञ, दंत आरोग्यतज्ञ, फिजिओथेरपिस्ट, श्रवणशास्त्रज्ञ, दंतवैद्य, फार्मासिस्ट, आरबीएसके वैद्यकीय अधिकारी (महिला)”पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी मुळ जाहिरात पहा
भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान अलिबाग-रायगड यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती नोकरी मिळवण्याची चांगली संधी.
नोकरीचे ठिकाण : अलिबाग-रायगड (महाराष्ट्र)
महत्त्वाच्या तारखा
| अर्जाची अंतिम तारीख | 12 आणि 13 जानेवारी 2026 पर्यंत |
| मुलाखत Interview | नंतर कळविण्यात येईल |
[Disclaimer : सदर भरती ची जाहिरात ही राष्ट्रीय आरोग्य अभियान अलिबाग-रायगड जिल्हाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | मुलाखत (Interview) |
| दुसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
वयोमर्यादा (Age Limit) : खुल्या गटातील उमेवारांसाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षे व राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी कमाल 43 वर्षे देण्यात आलेली आहे.
मासिक वेतन (Salary) : दरमहा 17,000 ते 40,000 रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
अर्ज शुल्क
| श्रेणी | शुल्क |
| अमागासवर्गीय उमेदवारांसाठी | 150/- रुपये |
| मागासवर्गीय उमेदवारांसाठी | 100/- रुपये |
अर्ज सादर करण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रायगड जिल्हा परिषद, कुंटे बाग, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, अलिबाग, जिल्हा रायगड, पिन ४०२२०१.
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| अर्ज नमुना | येथे क्लिक करा |
NHM Raigad Bharti 2026
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील दिलेल्या पत्त्यावरती दिनांक 12 आणि 13 जानेवारी 2026 च्या आत आलेले अर्ज ग्राह्य धरले जातील.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी व मोबाईल नंबर वैध राहणे आवश्यक राहील.
- शासकीय, निमशासकीय, खाजगी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असणा-या संबंधित अनुभवाचाच विचार निवड प्रक्रियेत करण्यात येईल. ज्या पदाकरिता अर्ज केला आहे त्याच पदाचा असलेला अनुभव ग्राहय धरण्यात येईल.
- वरिल पदे ही कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधन तत्वानुसार भरण्यात येणार असून सदरील नियुक्ती आदेश हे निर्गमित केलेल्या तारखेपासुन ते 29/06/2026 पर्यंतच्या कालावधीकरिता भरण्यात येणार आहेत. पुढील पुनर्नियुक्ती आपल्या कामगिरी मुल्यांकनावर आधरित असेल.
- वरील नमुद पदे ही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत. सदर पदावर शासकीय सेवेप्रमाणे असलेले नियम अटी व शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही तसेच यापदासाठी शासनाचे सेवानियम लागू नाहीत.
- अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुध्द् कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
- अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचेसोईनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणीकरता येणार नाही.
- अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्या सुरु असलेला मोबाईलनंबर व ई-मेलआयडी अचूक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्णहोईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी.
- भरती प्रक्रियेदरम्यान ज्या-ज्या उमेदवारांना बोलविण्यात येईल, त्या-त्या वेळी त्यांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. तसेच सदर उपस्थितीकरीता कोणतेही मानधन अथवा प्रवास खर्च देव राहणार नाही.(NHM Raigad Bharti 2026)
- अर्जाचा नमुना हा जाहिराती सोबत प्रसिध्द करण्यात आलेला असून, सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास उमेदवारांचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.
- उमेदवारांचा अर्ज अपुर्ण व अर्धवट भरलेला असल्याने नाकारला गेल्यास सर्वस्वी जबाबदारी हीउमेदवारांची राहील याबाबत उमेदवारांना तक्रार करता येणार नाही
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
💁♂️Bombay High Court Bharti 2026: बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत नवीन 2,331 जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध 2026
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा