NHM Nandurbar Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नंदुरबार जिल्हा अंतर्गत कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर विविध पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध आहे. पात्र उमेदवारांना सविस्तर माहिती या लेखात दिली आहे. अर्ज प्रक्रिया हि ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याचे निर्देश उमेदवारांना देण्यात आले आहेत. आणि त्यासाठी अंतिम दिनांक 18 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेली आहेत. आणि मुलाखतीसाठी दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10:00 वाजता खालील दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहण्याचे उमेदवारांना आवाहन केले आहे, प्रस्तुत भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी एन एच एम च्या अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आले आहे.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी!
NHM Nandurbar Bharti 2025
अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
एकूण पदसंख्या : 98 पदे
पदाचे नाव : स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन / सल्लागार औषध, ईएनटी सर्जन, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी (आयुष यूजी), वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस आरबीएसके), वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस), रुग्णालय व्यवस्थापक, डीईआयसी व्यवस्थापक, सीपीएचसी सल्लागार, अभियंता-बायोमेडिकल, ऑडिओलॉजिस्ट, स्टाफ नर्स महिला, कनिष्ठ अभियंता-सिव्हिल, कार्यक्रम सहाय्यक सांख्यिकी (ब्लॉक एम अँड ई), अकाउंटंट (एफएमजी अकाउंटंट), ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी मुळ जाहिरात पहा.
NHM Nandurbar Bharti 2025
भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती
नोकरीचे ठिकाण : नंदुरबार जिल्हा (महाराष्ट्र)
महत्त्वाच्या तारखा
| अर्ज सुरू तारीख | 05 डिसेंबर 2025 पासून |
| अर्जाची अंतिम तारीख | 18 डिसेंबर 2025 पर्यंत |
| मुलाखत Interview | नंतर कळविण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार जिल्हाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | मुलाखत (Interview) |
| दुसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
वयोमर्यादा (Age Limit) : खुल्या गटातील उमेवारांसाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षे व राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी कमाल 43 वर्षे देण्यात आलेली आहे.
मासिक वेतन : दरमहा 18,000 ते 75,000 रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
अर्ज शुल्क
| श्रेणी | शुल्क |
| अमागासवर्गीय उमेदवारांसाठी | 150/- रुपये |
| मागासवर्गीय उमेदवारांसाठी | 100/- रुपये |
अर्ज सादर करण्याचा पत्ता : आर.ए.ए. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार.
मुलाखतीची पत्ता : आर.ए.ए. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| अर्ज नमुना | येथे क्लिक करा |
| व्हॉट्सॲप ग्रुप | येथे क्लिक करा |
| टेलिग्राम चैनल | येथे क्लिक करा |
NHM Nandurbar Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील दिलेल्या पत्त्यावरती दिनांक 18 डिसेंबर 2025 च्या आत आलेले अर्ज ग्राह्य धरले जातील.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी व मोबाईल नंबर वैध राहणे आवश्यक राहील.
- शासकीय, निमशासकीय, खाजगी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असणा-या संबंधित अनुभवाचाच विचार निवड प्रक्रियेत करण्यात येईल. ज्या पदाकरिता अर्ज केला आहे त्याच पदाचा असलेला अनुभव ग्राहय धरण्यात येईल.
- वरिल पदे ही कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधन तत्वानुसार भरण्यात येणार असून सदरील नियुक्ती आदेश हे निर्गमित केलेल्या तारखेपासुन ते 11 महिने 29 दिवस पर्यंतच्या कालावधीकरिता भरण्यात येणार आहेत. पुढील पुनर्नियुक्ती आपल्या कामगिरी मुल्यांकनावर आधरित असेल.
- अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचा सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचुक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहतील याची दक्षता घ्यावी.
- वरील नमुद पदे ही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत. सदर पदावर शासकीय सेवेप्रमाणे असलेले नियम अटी व शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही तसेच यापदासाठी शासनाचे सेवानियम लागू नाहीत.
- अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुध्द् कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
- अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचेसोईनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणीकरता येणार नाही.
- अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्या सुरु असलेला मोबाईलनंबर व ई-मेलआयडी अचूक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्णहोईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी.(NHM Nandurbar Bharti 2025)
- भरती प्रक्रियेदरम्यान ज्या-ज्या उमेदवारांना बोलविण्यात येईल, त्या-त्या वेळी त्यांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. तसेच सदर उपस्थितीकरीता कोणतेही मानधन अथवा प्रवास खर्च देव राहणार नाही.
- अर्जाचा नमुना हा जाहिराती सोबत प्रसिध्द करण्यात आलेला असून, सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास उमेदवारांचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.
- उमेदवारांचा अर्ज अपुर्ण व अर्धवट भरलेला असल्याने नाकारला गेल्यास सर्वस्वी जबाबदारी हीउमेदवारांची राहील याबाबत उमेदवारांना तक्रार करता येणार नाही
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
💁♂️Mahavitaran Akola Bharti 2025: महावितरण अकोला अंतर्गत नवीन 136 जागांसाठी नवीन भरती जाहीर 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा