NHM Parbhani Bharti 2025:राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १५ व्या वित्त आयोग जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, परभणी भरती 2025

NHM Parbhani Bharti 2025:राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १५ व्या वित्त आयोग जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, परभणी अंतर्गत कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर “लॅब टेक्निशियन” पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करत आहे. पात्र उमेदवारांना सविस्तर माहिती या लेखात दिली आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याचे निर्देश उमेदवारांना देण्यात आले आहेत. आणि त्यासाठी अंतिम दिनांक 1 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आले आहेत. प्रस्तुत भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी एन एच एम च्या अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आले आहे उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

NHM Parbhani Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 05 पदे
  • पदाचे नाव :  लॅब तंत्रज्ञ पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण सोबत DMLT डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक.

पदांचा तपशील

अ. क्रं. सामाजिक आरक्षण पद संख्या 
1. SC 01
2. ST 01
3. OBC 02
4. EWS  01
एकुण 05
  • भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, परभणी यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती
  • नोकरीचे ठिकाण : परभणी जिल्हा (महाराष्ट्र)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू तारीख 21 नोव्हेंबर 2025 पासून
अर्जाची अंतिम तारीख 1 डिसेंबर 2025 पर्यंत
लेखी परीक्षा/Interview नंतर कळविण्यात येईल

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही राष्ट्रीय आरोग्य अभियान एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, परभणीच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा लेखी परीक्षा
दुसरा टप्पा मुलाखत (Interview)
दुसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
  • वयोमर्यादा (Age Limit) : खुल्या गटातील उमेवारांसाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षे व राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी कमाल 43 वर्षे देण्यात आलेली आहे.
  • मासिक वेतन : दरमहा 17,000 रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.

अर्ज शुल्क

श्रेणी  शुल्क
अमागासवर्गीय उमेदवारांसाठी 150/- रुपये
मागासवर्गीय उमेदवारांसाठी 100/- रुपये

अर्ज पाठवण्याचा पत्तामा. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकत्मित आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, परभणी.

महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
NHM Parbhani Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील दिलेल्या पत्त्यावरती दिनांक 1 डिसेंबर 2025 च्या आत आलेले अर्ज ग्राह्य धरले जातील.
  2. ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी व मोबाईल नंबर वैध राहणे आवश्यक राहील.
  4. अर्जा सोबत उमेदवाराने अध्यक्ष, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी, जि.प. परभणी या नावे देय असलेला खुल्या प्रवर्गासाठी रु.150/- व मागासवर्गीय रु 100/- चा ना परतावा राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष (DD) जोडावा. चेक अथवा डिडि काढण्यासाठी बँकेत पैसे भरलेली स्लिप ग्राहय धरली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  5. शासकीय, निमशासकीय, खाजगी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असणा-या संबंधित अनुभवाचाच विचार निवड प्रक्रियेत करण्यात येईल. ज्या पदाकरिता अर्ज केला आहे त्याच पदाचा असलेला अनुभव ग्राहय धरण्यात येईल.
  6. वरिल पदे ही कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधन तत्वानुसार भरण्यात येणार असून सदरील नियुक्ती आदेश हे निर्गमित केलेल्या तारखेपासुन ते 11 महिने 29 दिवस पर्यंतच्या कालावधीकरिता भरण्यात येणार आहेत. पुढील पुनर्नियुक्ती आपल्या कामगिरी मुल्यांकनावर आधरित असेल.
  7. अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचा सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचुक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहतील याची दक्षता घ्यावी.
  8. वरील नमुद पदे ही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत. सदर पदावर शासकीय सेवेप्रमाणे असलेले नियम अटी व शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही तसेच यापदासाठी शासनाचे सेवानियम लागू नाहीत.
  9. अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुध्द् कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
  10. अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचेसोईनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणीकरता येणार नाही.
  11. अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्या सुरु असलेला मोबाईलनंबर व ई-मेलआयडी अचूक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्णहोईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी.(NHM Parbhani Bharti 2025)
  12. भरती प्रक्रियेदरम्यान ज्या-ज्या उमेदवारांना बोलविण्यात येईल, त्या-त्या वेळी त्यांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. तसेच सदर उपस्थितीकरीता कोणतेही मानधन अथवा प्रवास खर्च देव राहणार नाही.
  13. अर्जाचा नमुना हा जाहिराती सोबत प्रसिध्द करण्यात आलेला असून, सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास उमेदवारांचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.
  14. उमेदवारांचा अर्ज अपुर्ण व अर्धवट भरलेला असल्याने नाकारला गेल्यास सर्वस्वी जबाबदारी हीउमेदवारांची राहील याबाबत उमेदवारांना तक्रार करता येणार नाही
  15. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
💁‍♂️RRC SER Apprentice Bharti 2025: भारतीय रेल्वे विभागामध्ये 1785 रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo