NHM Maharashtra CHO Bharti 2025:राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), अंतर्गत सामुदायिक आरोग्य अधिकारी (CHO) या पदासाठी एक मोठी भरती मोहीम जाहीर केली आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जवळपास 1974 रिक्त जागा भरणे आहे, ज्यामुळे वैद्यकीय आणि नर्सिंग पदवीधरांना सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात एक फायदेशीर करिअर घडवण्याची एक उत्तम संधी मिळाली आहे. आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्रांमध्ये सामुदायिक आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी ही भूमिका महत्त्वाची आहे. या भरतीमध्ये उत्तम पगार पॅकेज देखील मिळेल. ही एक सुवर्ण संधी आहे जी तुम्ही गमावू इच्छित नाही. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 4 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी.
NHM Maharashtra CHO Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 1974 पदे
- पदाचे नाव : समुदाय आरोग्य अधिकारी पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- शैक्षणिक पात्रता : BAMS/BUMS/BSc Nursing/उत्तीर्ण असणे आवश्यक.
पदांचा तपशील
| अ. क्रं. | प्रवर्ग | पद संख्या |
| 1. | SC | 143 |
| 2. | ST | 103 |
| 3. | VJ(A) | 060 |
| 4. | NT(B) | 030 |
| 5. | NT(C) | 072 |
| 6. | NT(D) | 028 |
| 7. | SBC | 00 |
| 8. | SEBC | 197 |
| 9. | OBC | 243 |
| 10. | OPEN | 900 |
| 11. | EWS | 197 |
| एकुण | 1974 |
- भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती
- नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र (Job In Maharashtra)
महत्त्वाच्या तारखा
| अर्ज सुरू तारीख | 18 नोव्हेंबर 2025 पासून |
| अर्जाची अंतिम तारीख | 04 डिसेंबर 2025 पर्यंत |
| लेखी परिक्षा | नंतर कळविण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्य यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | लेखी परिक्षा (CBT) |
| दुसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- वयोमर्यादा (Age Limit) : खुल्या गटातील उमेवारांसाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षे व राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी कमाल 43 वर्षे देण्यात आलेली आहे.
- मासिक वेतन : दरमहा 15,000 ते 25,000 रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
अर्ज शुल्क
| श्रेणी | शुल्क |
| अमागासवर्गीय उमेदवारांसाठी | 1000/- रुपये |
| मागासवर्गीय उमेदवारांसाठी | 900/- रुपये |
NHM Maharashtra CHO Bharti 2025
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
- होमपेजवर, “भरती” किंवा “करिअर” विभाग शोधा.
- “सामुदायिक आरोग्य अधिकारी (CHO) २०२५ साठी जाहिरात” साठी लिंकवर क्लिक करा.
- सविस्तर सूचना काळजीपूर्वक वाचा.
- तुमची मूलभूत माहिती, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी देऊन प्रोफाइल तयार करण्यासाठी स्वतःची नोंदणी करा.
- तुमच्या नोंदणी क्रेडेंशियल्ससह लॉग इन करा आणि अचूक तपशीलांसह ऑनलाइन अर्ज फॉर्म भरा.
- तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती निर्दिष्ट स्वरूपात अपलोड करा.दिलेल्या पेमेंट गेटवेद्वारे ऑनलाइन अर्ज शुल्क भरा.कोणत्याही त्रुटींसाठी तुमचा अर्ज फॉर्म तपासा आणि तो सबमिट करा.
- भविष्यातील संदर्भासाठी तुमच्या सबमिट केलेल्या अर्जाची आणि फी पावतीची प्रत डाउनलोड करा आणि प्रिंट करा.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 4 डिसेंबर 2025 पर्यंत रात्री 11:59 वाजेपर्यंत
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
NHM Maharashtra CHO Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील दिलेल्या लिंकवरती दिनांक 4 डिसेंबर 2025 पर्यंत .
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी व मोबाईल नंबर वैध राहणे आवश्यक राहील.
- वरिल पदे ही कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधन तत्वानुसार भरण्यात येणार असून सदरील नियुक्ती आदेश हे निर्गमित केलेल्या तारखेपासुन ते 11 महिने 29 दिवस पर्यंतच्या कालावधीकरिता भरण्यात येणार आहेत. पुढील पुनर्नियुक्ती आपल्या कामगिरी मुल्यांकनावर आधरित असेल.
- अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचा सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचुक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहतील याची दक्षता घ्यावी.
- वरील नमुद पदे ही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत. सदर पदावर शासकीय सेवेप्रमाणे असलेले नियम अटी व शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही तसेच यापदासाठी शासनाचे सेवानियम लागू नाहीत.
- अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुध्द् कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
- अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचेसोईनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणीकरता येणार नाही.
- भरती प्रक्रियेदरम्यान ज्या-ज्या उमेदवारांना बोलविण्यात येईल, त्या-त्या वेळी त्यांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. तसेच सदर उपस्थितीकरीता कोणतेही मानधन अथवा प्रवास खर्च देव राहणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
नाशिक अग्निशमन विभागा अंतर्गत नवीन 186 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध 2025 : Nashik Fire Department Bharti 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा
1 thought on “NHM Maharashtra CHO Bharti 2025|राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र मध्ये “समुदाय आरोग्य अधिकारी” पदासाठी 1974 जागांसाठी मेगा भरती 2025”