RRB NTPC Recruitment 2025:भारतीय रेल्वेमध्ये सुरक्षित आणि स्थिर नोकरीच्या सोधत असलेल्या उमेदवारांसाठी भारतीय रेल्वे अंतर्गत ज्यामध्ये विविध नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज (NTPC) मध्ये 3058 रिक्त पदांसाठी, यामध्ये कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि ट्रेन क्लर्क सारख्या पदांचा समावेश आहे. भारतीय रेल्वेमध्ये सुरक्षित आणि स्थिर करिअर घडवण्यासाठी ही एक सुवर्ण संधी भारतीय रेल्वे भरती मंडळाने दिलेली आहे. तसेच भारतीय रेल्वेचा एक भाग बनण्याची चांगली संधी आहे. या भरतीमध्ये तुम्हाला आकर्षक पगार आणि असंख्य भत्ते, देखील मिळणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत दिलेली आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!
RRB NTPC Recruitment 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 3058 पदे
- पदाचे नाव : कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि ट्रेन क्लर्क या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठ/संस्थेतून बारावी (+2 टप्पा) किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. सोबत संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता असणे आवश्यक आहे.
पदांचा तपशील
| पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | कमर्शियल कम टिकीट क्लर्क | 2424 |
| 2. | अकाउंटंट क्लार्क कम टायपिस्ट | 0394 |
| 3. | जूनियर क्लर्क कम टायपिस्ट | 0163 |
| 4. | ट्रेन क्लर्क | 077 |
| एकुण | 3058 |
- भरती विभाग : भारतीय रेल्वे मंडळा अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : रेल्वे विभागात कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्ज सुरू | 28 ऑक्टोंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत |
| ऑनलाईन अर्ज शुल्क | 29 नोव्हेंबर 2025 पर्यंत |
| परीक्षा तारीख | नंतर कळवण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही भारतीय रेल्वे मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | पेपर-I (CBT) |
| दुसरा टप्पा | पेपर-II |
| तिसरा टप्पा | कौशल्य चाचणी |
| चौथा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
| पाचवा टप्पा | वैद्यकीय तपासणी |
- मासिक वेतन (Salary) : बेसिक 19,900 ते 21,700/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
- वयोमर्यादा (Age Limit) : 1 जानेवारी 2026 रोजी
पात्रता धारक उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे व कमाल वयोमर्यादा 30 वर्षे देण्यात आलेली आहे. - [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्ष सुट]
अर्ज शुल्क
| श्रेणी | शुल्क |
| General/EWS/OBC | 500/- रुपये |
| SC/ST/Ex-Servicemen /PwBD/Female /Transgender/Minorities/EBC | 250/- रुपये |
[टीप:अर्ज शुल्क हे परतावा आहे, जे उमेदवार ऑनलाईन लेखी परीक्षेसाठी उपस्थित असतील अशाच उमेदवारांना शुल्क परत मिळणार आहे.]
RRB NTPC Recruitment 2025
ऑनलाईन अर्ज कसा करायचा
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या चरणांचे अनुसरण करा:
- अधिकृत RRB अर्ज पोर्टलवर जा (लिंक खाली ‘अत्यावश्यक लिंक्स’ विभागात दिली आहे).
- तुम्हाला प्रथम ‘खाते तयार करा’ आवश्यक आहे. जर तुम्ही आधीच्या कोणत्याही RRB भरतीसाठी खाते तयार केले असेल, तर तुम्ही लॉग इन करण्यासाठी समान क्रेडेन्शियल्स वापरावेत.
- खाते तयार करताना, तुमचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी यासारखी मूलभूत माहिती अत्यंत काळजीपूर्वक भरा. हे तपशील नंतर बदलता येणार नाहीत.
- आधार किंवा इतर वैध आयडी वापरून तुमची ओळख प्रमाणित करा.
- तुमचे खाते तयार झाल्यानंतर, लॉग इन करा आणि “CEN क्रमांक 07/2025(NTPC अंडर ग्रॅज्युएट)” सूचना निवडा.
- तुमची शैक्षणिक पात्रता, पत्ता आणि श्रेणी यासह ऑनलाइन अर्ज फॉर्ममध्ये सर्व आवश्यक तपशील भरा.
- अर्ज तुम्हाला तुमचा वेबकॅम किंवा फोन कॅमेरा वापरून लाईव्ह फोटो घेण्यास सांगेल. तुम्ही जुना किंवा आधीपासून अस्तित्वात असलेला फोटो अपलोड करू शकत नाही. तुम्ही एका साध्या पार्श्वभूमी असलेल्या आणि चांगल्या प्रकाश असलेल्या ठिकाणी असल्याची खात्री करा.
- दिलेल्या तपशीलांनुसार तुमची स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करा.
- तुमच्या पसंतीच्या पद्धतीचा वापर करून (इंटरनेट बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा UPI) ऑनलाइन अर्ज शुल्क भरा.
- सर्व तपशील बरोबर आहेत याची खात्री करण्यासाठी तुमचा अर्ज शेवटचा तपासा आणि तो सबमिट करा.
- तुमच्या रेकॉर्डसाठी तुमच्या अंतिम सबमिट केलेल्या अर्जाची प्रत डाउनलोड करा आणि प्रिंट करा.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत.
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
RRB NTPC Recruitment 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. - जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवाराची उमेदवारी निवडीच्या सर्व टप्प्यांवर तात्पुरती आहे जर सर्व पात्रता अटी पूर्ण झाल्या असतील आणि रेल्वे बोर्डाने वेळोवेळी जारी केलेल्या नियम/सूचनांनुसार पात्र नसल्याचे आढळल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार RRB कडे राखून ठेवते.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
RRB NTPC Recruitment 2025
हि जाहिरात पण पहा 👇
रेल्वे रिक्रुटमेंट सेल अंतर्गत उत्तर पूर्व रेल्वे विभागामध्ये 1104 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध 2025 | RRC NER Recruitment 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा
1 thought on “RRB NTPC Recruitment 2025:भारतीय रेल्वे विभागामध्ये 3058 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025”