UCO Bank Recruitment 2025:यूको बँकेने यूको बँक अप्रेंटिस भरती २०२५ साठी पदवीध उमेदवारांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे, बँकिंग क्षेत्रात करिअर सुरू करू इच्छिणाऱ्या पदवीधरांसाठी ही एक उत्तम संधी आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये युको बॅंके अंतर्गत एकूण 532 अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. जर तुम्ही पात्रता निकष पूर्ण करत असाल आणि यशस्वी बँकिंग कारकिर्दीचा पाया रचण्यास उत्सुक असाल, तर ही एक संधी आहे जी तुम्ही गमावू नका, रिक्त पदांचे तपशील, पात्रता, पगार, निवड प्रक्रिया सर्व माहिती या लेखात दिली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत देण्यात आली आहे अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात वाचा!
UCO Bank Recruitment 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 532 पदे
- पदाचे नाव : पदवीधर अप्रेंटिस पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या भरती साठी अर्ज सादर करू शकतात.
पदांचा तपशील
| पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | Apprentice | 532 |
- भरती विभाग : युको बँक अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.
- नोकरीचा प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)
महत्त्वाच्या तारखा
| ऑफलाईन अर्ज सुरू | 21 ऑक्टोंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 30 ऑक्टोंबर 2025 पर्यंत |
| परिक्षा शुल्क | 5 नोव्हेंबर 2025 पर्यंत |
| परीक्षेची तारीख | 9 नोव्हेंबर 2025 |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि युको बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | ऑनलाईन परिक्षा |
| दुसरा टप्पा | स्थानिक भाषा चाचणी |
| तिसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- मासिक वेतन (Salary) : उमेदवारांना 15,000 रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
- वयोमर्यादा (Age Limit) : 1 ऑक्टोंबर 2025 रोजी
सर्वसाधारण उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे. - [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्ष सूट]
अर्ज शुल्क
| श्रेणी | शुल्क |
| General / OBC / EWS | 800/- रुपये + GST |
| PwBD | 400/- रुपये + GST |
| SC / ST | अर्ज शुल्क नाही |
UCO Bank Recruitment 2025
ऑनलाईन अर्ज कसा भरावा
- पायरी 1: NATS पोर्टल नोंदणी (अनिवार्य)
- प्रथम, सर्व उमेदवारांनी NATS पोर्टलवर स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे.
- NATS वेबसाइटवर जा. (खाली दिलेली लिंक)
- “विद्यार्थी नोंदणी/लॉगिन” वर क्लिक करा आणि तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता इत्यादी भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
- यशस्वी नोंदणीनंतर, तुम्हाला एक नावनोंदणी आयडी मिळेल. हा आयडी लक्षात ठेवा; पुढील चरणासाठी ते आवश्यक आहे.
- पायरी 2: UCO बँक अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करा
- NATS वर नोंदणी झाल्यानंतर, लॉग इन करा आणि UCO बँक अप्रेंटिसशिप संधी शोधा आणि त्यासाठी अर्ज करा.
- पायरी 3: BFSI SSC अर्ज आणि शुल्क भरणा
- NATS पोर्टलवर यशस्वीरित्या अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना BFSI SSC कडून एक ईमेल प्राप्त होईल.
- हा ईमेल तुम्हाला वेगळ्या पोर्टलवर (खाली दिलेली लिंक) आमंत्रित करेल जेणेकरून तुम्ही अतिरिक्त तपशील (जसे की जात, जिल्ह्यांची निवड इ.) भरू शकाल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ऑनलाइन परीक्षेसाठी पैसे भरू शकाल.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 ऑक्टोंबर 2025 पर्यंत रात्री 11:59 वाजेपर्यंत
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| NAST पोर्टल नोदणी | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
UCO Bank Recruitment 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
रेल्वे विभागामध्ये 5810 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | RRB NTPC Bharti 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा