रेल्वे विभागामध्ये 5810 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | RRB NTPC Bharti 2025

RRB NTPC Bharti 2025:भारतीय रेल्वेमध्ये सुरक्षित आणि स्थिर नोकरीच्या सोधत असलेल्या उमेदवारांसाठी भारतीय रेल्वे अंतर्गत ज्यामध्ये विविध नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज (NTPC) मध्ये 5810 रिक्त पदांसाठी, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर आणि वरिष्ठ क्लर्क यासारख्या प्रतिष्ठित पदे भरण्यासाठी भरती मोहीम राबविण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये सुरक्षित आणि स्थिर करिअर घडवण्यासाठी ही एक सुवर्ण संधी भारतीय रेल्वे भरती मंडळाने दिलेली आहे. तसेच भारतीय रेल्वेचा एक भाग बनण्याची चांगली संधी आहे. या भरतीमध्ये तुम्हाला आकर्षक पगार आणि असंख्य भत्ते, देखील मिळणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत  4 डिसेंबर 2025 पर्यंत दिलेली आहे.सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी  मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

RRB NTPC Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 5810 पदे
  • पदाचे नाव : स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ट्रॅफिक असिस्टंट, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, सिनियर क्लर्क कम टंकलेखक, ज्युनियर अकाउंट्स असिस्टंट कम टंकलेखक.
  • शैक्षणिक पात्रता : उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्याच्या समकक्ष पदवी सोबत संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता असणे आवश्यक आहे.

पदांचा तपशील

पद क्रं. पदाचे नाव  पद संख्या 
1. गुड्स ट्रेन मॅनेजर 3416
2. कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टंकलेखक 921
3. वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक 638
4. स्टेशन मास्टर 615
5. मुख्य व्यावसायिक सह तिकीट पर्यवेक्षक 261
6. वाहतूक सहाय्यक 59
एकुण 5810
  • भरती विभाग : भारतीय रेल्वे मंडळा अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : रेल्वे विभागात कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू 21 ऑक्टोंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 4 डिसेंबर 2025 पर्यंत
ऑनलाईन अर्ज शुल्क 4 डिसेंबर 2025 पर्यंत

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही भारतीय रेल्वे मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा पेपर-I (CBT)
दुसरा टप्पा पेपर-II(CBT)
तिसरा टप्पा कौशल्य चाचणी (अकाउंटंट आणि क्लर्क पदासाठी)
चौथा टप्पा कागदपत्र पडताळणी
चौथा टप्पा वैद्यकीय तपासणी
  • मासिक वेतन (Salary) : बेसिक 25,500 ते 35,400/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : पात्रता धारक उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे व कमाल वयोमर्यादा 33 वर्षे देण्यात आलेली आहे.
  • [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्ष सुट]

अर्ज शुल्क

श्रेणी शुल्क
General/EWS/OBC 500/- रुपये
SC/ST/EBC/Ex-Servicemen/PwBD/Female/ Transgender/Minorities 250/- रुपये

RRB NTPC Bharti 2025

ऑनलाईन अर्ज कसा भरायचा
  1. तुम्हाला ज्या RRB साठी अर्ज करायचा आहे त्या RRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या (खाली दिलेल्या लिंक्स).
  2. “CEN क्रमांक 06/2025 NTPC पदवीधर स्तरावरील पदांसाठी भरती” साठी लिंकवर क्लिक करा.
  3. प्रथम, तुम्हाला ‘खाते तयार करा’. जर तुमचे मागील RRB भरतीचे खाते असेल, तर तुम्ही तेच प्रमाणपत्रे वापरू शकता.
  4. तुमचे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सारखे मूलभूत तपशील अतिशय काळजीपूर्वक भरा, कारण ते नंतर बदलता येणार नाहीत.
  5. तुमच्या नोंदणी तपशीलांचा वापर करून लॉग इन करा आणि तपशीलवार अर्ज फॉर्म भरा.
  6. तुमचे शैक्षणिक तपशील, पोस्ट प्राधान्ये आणि इतर आवश्यक माहिती द्या.
  7. अर्ज प्रक्रियेदरम्यान तुमच्या डिव्हाइसच्या कॅमेऱ्याद्वारे लाइव्ह फोटो कॅप्चर केला जाईल. तुम्ही साध्या पार्श्वभूमीसह चांगल्या प्रकाश असलेल्या क्षेत्रात असल्याची खात्री करा.
  8. निर्दिष्ट फॉरमॅटनुसार (30 KB ते 49 KB) तुमच्या स्वाक्षरीची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.
  9. नेट बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा UPI द्वारे ऑनलाइन अर्ज शुल्क भरण्यासाठी पुढे जा.
  10. यशस्वी पेमेंटनंतर, तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन करा, तो सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 04 डिसेंबर 2025 पर्यंत.

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 

RRB NTPC Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
    कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  • उमेदवाराची उमेदवारी निवडीच्या सर्व टप्प्यांवर तात्पुरती आहे जर सर्व पात्रता अटी पूर्ण झाल्या असतील आणि रेल्वे बोर्डाने वेळोवेळी जारी केलेल्या नियम/सूचनांनुसार पात्र नसल्याचे आढळल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार RRB कडे राखून ठेवते.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
रेल्वे रिक्रुटमेंट सेल अंतर्गत उत्तर पूर्व रेल्वे विभागामध्ये 1104 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध 2025 | RRC NER Recruitment 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

2 thoughts on “रेल्वे विभागामध्ये 5810 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | RRB NTPC Bharti 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo