MPSC Group C Bharti 2025:महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन म्हणजेच (MPSC) अंतर्गत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त प्राथमिक परीक्षा 2025 साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून यामध्ये “उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक” या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी पदवीधरांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांना एक उत्तम संधी निर्माण करून दिलेली आहे या भरती मोहीमे अंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी जवळपास 938 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली असून उमेदवारांना या भारतीचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरण्याकरिता आवाहन केले आहे आणि त्याचा अंतिम दिनांक 27 ऑक्टोंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी मुळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!
MPSC Group C Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 938 पदे
- पदाचे नाव : उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्या शाखेतील पदवी / टंकलेखन अहर्ता
पदांचा तपशील
| पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | उद्योग निरीक्षक | 09 |
| 2. | तांत्रिक सहाय्यक | 04 |
| 3. | कर सहाय्यक | 73 |
| 4. | लिपिक-टंकलेखक | 852 |
| एकुण | 938 |
- भरती विभाग : महाराष्ट्र लोकसेवा आयोगान (MPSC) अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.
- नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र (Job In Maharashtra)
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्ज सुरू | 7 ऑक्टोंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 27 ऑक्टोंबर 2025 पर्यंत |
| चलनाद्वारे अर्ज शुल्क बँकेत | 30 ऑक्टोंबर 2025 पर्यंत |
| पूर्व परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | पूर्व परीक्षा |
| दुसरा टप्पा | मुख्य परीक्षा |
| तिसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
बेसिक वेतन
| पद क्रं | पदाचे नाव | वेतन श्रेणी |
| 1. | उद्योग निरीक्षक | S13 रुपये. 35,400 ते 1,12,400/- |
| 2. | तांत्रिक सहाय्यक | S10 रुपये. 29,200 ते 92,300/- |
| 3. | कर सहाय्यक | S8 रुपये. 25,500 ते 81,100/- |
| 4. | लिपिक-टंकलेखक | S6 रुपये. 19,900 ते 62,200/- |
- वयोमर्यादा (Age Limit) : 1 फेब्रुवारी 2026 रोजी
सर्वसाधारण उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे. - [मागासवर्गीय/अनाथ/आ.दू.घ./खेळाडू – 05 वर्षे सूट, माजी सैनिक/दिव्यांग/प्रकल्पग्रस्त – 7 वर्ष सूट,]
अर्ज शुल्क
| अमागासवर्गीय उमेदवारांसाठी | 394/- रुपये |
| मागासवर्गीय उमेदवारांसाठी | 294/- रुपये |
MPSC Group C Bharti 2025
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
- अधिकृत MPSC ऑनलाइन अर्ज पोर्टल: https://mpsc.gov.in ला भेट द्या.
- आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापूर्वी विहित पद्धतीने नोंदणी केली नसल्यास, नोंदणी करून खाते (Profile) तयार करून घ्या.
- खाते तयार केलेले असल्यास व ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्यास, सदर कालावधीमध्ये खात्याची केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य राहील.
- विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने पुढीलप्रमाणे लागू असेल त्यानुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन अर्ज सादर करा.
- अर्ज शुल्क भरण्यासाठी पेमेंट गेटवेवर जाऊन शुल्क भरा
- जिल्हा परीक्षा केंद्र निवड करा.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी तुमचा अर्ज काळजीपूर्वक तपासा.
- तुमच्या रेकॉर्डसाठी सबमिट केलेल्या अर्जाची प्रत डाउनलोड करा आणि प्रिंट करा.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 27 ऑक्टोंबर 2025 रात्री 23:59 वाजेपर्यंत
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
MPSC Group C Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. (MPSC Group C Bharti 2025)
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
हि जाहिरात पण पहा 👇
💁♂️पुणे महानगरपालिके अंतर्गत सरळसेवा पद्धतीने रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध | Pune Mahanagarpalika Bharti 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा
1 thought on “खुशखबर | MPSC गट – क लिपिक आणि इतर पदांसाठी 938 जागांसाठी भरती प्रक्रिया | नवीन जाहिरात प्रसिद्ध | MPSC Group C Bharti 2025”