RRB JE Recruitment 2025:रेल्वे विभागात करिअर घडवण्यासाठी इच्छुक आहात का? कारण RRB JE 2025 साठी भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, या मध्ये देशभरातील अभियांत्रिकी पदवीधर आणि पदविकाधारकांसाठी पात्र उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी मिळाली आहे. या मध्ये कनिष्ठ अभियंता (JE), डेपो मटेरियल सुपरिटेंडेंट (DMS) आणि केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट (CMA) पदासाठी एकूण 2570 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे, जर तुम्ही भारतीय रेल्वेसोबत काम करण्याचे स्वप्न बघितले असेल तर या संधीचा नक्कीच फायदा करून घ्या. यामध्ये तुम्हाला मासिक पगार 35,400 रुपये देखील देण्यात येणार असून, या भरतीचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून त्याचा अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आलेली आहे ती वाचावी.
RRB JE Recruitment 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 2570 पदे
- पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (JE), डेपो मटेरियल सुपरिटेंडेंट (DMS), केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट (CMA) पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- शैक्षणिक पात्रता : कनिष्ठ अभियंता(JE)साठी: मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल किंवा इतर संबंधित अभियांत्रिकी क्षेत्रात तीन वर्षांचा डिप्लोमा. किंवा संबंधित अभियांत्रिकी विषयात B.E ./B टेक पदवी.
डेपो मटेरियल सुपरिटेंडेंट(DMS)साठी: मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून अभियांत्रिकीच्या कोणत्याही प्रवाहात तीन वर्षांचा डिप्लोमा.
केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट(CMA)साठी: भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात किमान 45% गुणांसह विज्ञान (B.sc) मध्ये बॅचलर पदवी.
पदांचा तपशील
| पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | कनिष्ठ अभियंता (JE) | नंतर कळविण्यात येईल |
| 2. | डेपो मटेरियल अधीक्षक (DMS) | नंतर कळविण्यात येईल |
| 3. | केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट (CMA) | नंतर कळविण्यात येईल |
| एकुण | 2570 |
- भरती विभाग :भारतीय रेल्वे मंडळा (RRB) अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- भरती श्रेणी : रेल्वे क्षेत्रात कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी.
- नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्ज सुरू | 31 ऑक्टोंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 10 डिसेंबर 2025 पर्यंत |
| परिक्षा तारीख | नंतर कळविण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही भारतीय रेल्वे मंडळाच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | पुर्व परिक्षा (CBT) |
| दुसरा टप्पा | मुख्य परिक्षा |
| तिसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
| चौथा टप्पा | वैद्यकीय तपासणी |
- मासिक वेतन (Salary) : मासिक 35,400/- रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
- वयोमर्यादा (Age Limit) : 1 जानेवारी 2026 रोजी, किमान 18 वर्ष व कमाल 33 वर्षे असावे.
- [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्ष सूट ]
अर्ज शुल्क
| General/OBC/EWS: 500 | 500/- रुपये |
| SC/ST/PWD/Woman/Ex. Servicemen | 250/- रुपये |
RRB JE Recruitment 2025
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
- अधिकृत RRB अर्ज पोर्टलला भेट द्या.
- CEN क्रमांक 05/2025 साठी “ऑनलाइन अर्ज करा” लिंकवर क्लिक करा.
- प्रथम, तुम्हाला तुमचे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि ईमेल पत्ता यासारखी मूलभूत माहिती देऊन खाते तयार करावे लागेल.
- नोंदणी केल्यानंतर, तुमच्या ओळखपत्रांचा वापर करून लॉग इन करा.
- तुमच्या वैयक्तिक, शैक्षणिक आणि संपर्क तपशीलांसह तपशीलवार अर्ज फॉर्म भरा.
- तुमच्या छायाचित्राच्या आणि स्वाक्षरीच्या स्कॅन केलेल्या प्रती निर्दिष्ट स्वरूपात अपलोड करा.
- उपलब्ध ऑनलाइन पेमेंट पद्धतींद्वारे अर्ज शुल्क भरण्यासाठी पुढे जा.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी तुमचा अर्ज काळजीपूर्वक तपासा.
- सबमिट केल्यानंतर, भविष्यातील संदर्भासाठी तुमच्या अर्ज फॉर्मची प्रत डाउनलोड करा आणि प्रिंट करा.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 डिसेंबर 2025 पर्यंत
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
RRB JE Recruitment 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये आर आर बी रेल्वे विभागाकडे (RRB JE Recruitment 2025)निर्णय अंतिम असेल.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. - जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
खुशखबर | भारतीय रेल्वे विभागांतर्गत RRB NTPC 8875 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर | RRB NTPC Recruitment 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा