Shir Shubhlaxmi Credit Co-Op Society Ltd Bharti 2025:नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी? श्री शुभलक्ष्मी क्रेडिट को-ऑप सोसायटी लिमिटेड, नागपूर अंतर्गत नवीन भरती 2025 साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये “लिपिक आणि शिपाई” या पदाकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून, या भरतीच्या वैशिष्ट्य म्हणजे सुरक्षितता आणि स्थिर करिअर घडवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीमध्ये तुम्हाला चांगले वेतन त्याच बरोबर असंख्य भत्ते, देखील मिळणार आहेत, तसेच या भरतीचे अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने भरायचे असून अंतिम दिनांक हा 9 ऑक्टोंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!
Shir Shubhlaxmi Credit Co-Op Society Ltd Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 06 पदे
- पदाचे नाव : “लिपिक आणि शिपाई” पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
शैक्षणिक पात्रता : लिपिक : मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी सोबत MS CIT उत्तीर्ण
शिपाई : दहावी उत्तीर्ण
पदांचा तपशील
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | लिपिक | 04 |
| 2. | शिपाई | 02 |
| एकुण | 06 |
- भरती विभाग : श्री शुभलक्ष्मी क्रेडिट को-ऑप सोसायटी लिमिटेड, नागपूर अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : नागपुर (महाराष्ट्र)
महत्त्वाच्या तारखा
| ऑफलाईन अर्ज सुरू | 27 सप्टेंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 9 ऑक्टोंबर 2025 पर्यंत |
| परिक्षा/मुलाखत | नंतर कळविण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि श्री शुभलक्ष्मी क्रेडिट को-ऑप सोसायटी लिमिटेड, नागपूरच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | लेखी परीक्षा |
| दुसरा टप्पा | मुलाखत (Interview) |
| तिसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- अर्ज शुल्क (Fee) : अर्ज शुल्क नाही
- मासिक वेतन (Salary) : वेतन श्रेणी संदर्भात जाहिरातीमध्ये उल्लेख नाही.(अधिकृत संकेतस्थळावरती पहा)
- वयोमर्यादा (Age Limit) : 27 सप्टेंबर 2025 रोजी
सर्वसाधारण पात्रता धारक उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे व कमाल वयोमर्यादा 35 वर्षे देण्यात आलेली आहे. - [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
अर्ज सादर करण्याचा पत्ता : श्री सुभलक्ष्मी क्रेडिट को-ऑप सोसायटी लि., भंडारा रोड, झाशी राणी चौक, पारडी, नागपूर-35.
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 9 ऑक्टोंबर 2025 पर्यंत सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात पहा | येथे क्लिक करा |
Shir Shubhlaxmi Credit Co-Op Society Ltd Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे अर्ज हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लीलेल्या पत्यावर्ती अर्ज करावयाचा आहे.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- पात्रता निकषात न बसणाऱ्या उमेदवारांनी परीक्षेचा अर्ज भरल्यास अथवा भरलेली माहिती चुकीची आढळल्यास संबंधित अर्ज बाद करण्यात येईल
- अर्ज सादर करणाऱ्या पात्र उमेदवारांना प्रत्यक्ष तौडी मुलाखतीसाठी त्यांनी अर्जात नमुद केलेल्या भ्रमणध्वनीवर (SMS) व्दारे मुलाखतीचे स्थळ व दिनांक कळविण्यात येईल. मुलाखतीचे वेळी मुळ कागदपत्र व त्यांचे झेरॉक्स प्रतीसह स्वखर्चाने उपस्थित रहावयाचे आहे.
- निवड झालेल्या उमेदवारास संस्थेच्या कोणत्याही शाखेवर नेमणूक देण्यात येईल.
- पदसंख्या, निवड प्रक्रिया संबंधीचे, निवड पद्धत इत्यादी बाबतचे सर्व अधिकार संसस्थेकडे राखीव असतील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर जर असे आढळून आले की उमेदवार पात्रता निकषांची पूर्तता करत नाही आणि/किंवा त्याने कोणतीही चुकीची/खोटी माहिती/प्रमाणपत्र/कागदपत्रे सादर केली आहेत किंवा कोणतीही महत्त्वाची वस्तुस्थिती लपवली आहे, तर त्याची/तिची उमेदवारी रद्द केली जाईल. संसस्थेत सामील झाल्यानंतरही, कोणत्याही वेळी अशी कोणतीही विसंगती किंवा कमतरता आढळल्यास, त्याच्या/तिच्या सेवा रद्द केल्या जाऊ शकतात.(Shir Shubhlaxmi Credit Co-Op Society Ltd Bharti 2025)
- उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये बँकेकडे निर्णय अंतिम असेल.
- उमेदवारांच्या पात्रतेबाबत, पात्रतेची अशी छाननी कोणत्या टप्प्यात करायची आहे, मुलाखत, निवड आणि भरतीशी संबंधित इतर कोणत्याही बाबींसाठी बँकेचा निर्णय अंतिम आणि उमेदवारावर बंधनकारक असेल. या संदर्भात वैयक्तिक चौकशीसाठी संसस्थेकडून कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- आवश्यक असल्यास, निवड प्रक्रियेत बदल करण्याचा/थांबवण्याचा/बदल करण्याचा अधिकार संस्थेकडे राखून आहे. जर काही बदल झाले तर, उमेदवारांना कळवले जातील.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) दिल्ली पोलीस दलात 7565 पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध | SSC Delhi Police Constable Recruitment 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा