स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाकरिता नवीन जाहिरात प्रसिद्ध | Delhi Police Head Constable Recruitment 2025

Delhi Police Head Constable Recruitment 2025:तुम्ही जर गणित आणि विज्ञान विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झाला असाल तर हि नोकरी तुमच्यासाठी आहे, कारण स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल असिस्टंट वायरलेस ऑपरेटर (AWO)/टेली-प्रिंटर ऑपरेटर (TOP) पदाकरिता नवीन भरती प्रक्रिया राबवण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये पुरुष आणि महिला उमेदवार साठी एक उत्तम संधी आहे. तुम्ही सुरक्षित आणि सन्माननीय सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही नोकरी तुमच्यासाठी नक्की फायदेशीर ठरणार आहे यामध्ये जवळपास 552 रिक्त पदांकरिता उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून त्याचा अंतिम दिनांक 15 ऑक्टोंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आलेली आहे ती वाचावी!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Delhi Police Head Constable Recruitment 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 552 पदे
  • पदाचे नाव : कॉन्स्टेबल (Driver) पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळातून 12वी उत्तीर्ण (तुमच्याकडे संगणक ऑपरेशन्समध्ये प्रवीणता असणे आवश्यक आहे. यामध्ये 15 मिनिटांत 1000 की डिप्रेशन्सचा इंग्रजी वर्ड प्रोसेसिंग स्पीड आणि एमएस ऑफिस, प्रिंटिंग इत्यादी मूलभूत संगणक कार्यांचे ज्ञान समाविष्ट आहे. )

पदांचा तपशील

पद क्रं. पदाचे नाव  पद संख्या 
1. हेड कॉन्स्टेबल (AWO/TPO) – पुरुष 370
2. कॉन्स्टेबल (AWO/TPO) – महिला 182
एकुण 0552
  • भरती विभाग : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.
  • नोकरीचा प्रकार : दिल्ली पोलीस दलात कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : दिल्ली (India)

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू 24 सप्टेंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 15 ऑक्टोंबर 2025 पर्यंत
परिक्षा शुल्क अंतिम तारीख 15 ऑक्टोंबर 2025 पर्यंत
अर्ज दुरुस्ती 23 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2025
लेखी परीक्षा/मैदान चाचणी डिसेंबर 2025/जानेवारी 2026

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) दिल्ली पोलीसच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा  ऑनलाईन लेखी परीक्षा (CBT)
दुसरा टप्पा  मैदानी चाचणी (Physical Test)
तिसरा टप्पा  संगणक ऑपरेशनमध्ये ट्रेड टेस्ट आणि प्रवीणता
चौथा टप्पा  कागदपत्र पडताळणी
पाचवा टप्पा  वैद्यकीय तपासणी
  • मासिक वेतन (Salary) : बेसिक 25,500 ते 81,100/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 1 जुलै 2025 रोजी
    सर्वसाधारण उमेदवाराचे वय 21 ते 27 वर्षे दरम्यान असावे.
  • [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क 

General / OBC / EWS 100/- रुपये
SC/ST/Women/Ex-Servicemen अर्ज शुल्क नाही

Delhi Police Head Constable Recruitment 2025

अर्ज करण्याची पद्धत
  1. SSC च्या नवीन अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. जर तुम्ही नवीन वापरकर्ता असाल, तर तुम्हाला प्रथम ‘वन-टाइम रजिस्ट्रेशन’ (OTR) प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
  3. OTR नंतर, तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
  4. ‘लाइव्ह एक्झामिनेशन’ विभागाअंतर्गत ‘दिल्ली पोलिस परीक्षा, २०२५ मध्ये हेड कॉन्स्टेबल {असिस्टंट वायरलेस ऑपरेटर (AWO)/टेलि-प्रिंटर ऑपरेटर (TPO)}’ साठी “अर्ज करा” लिंक शोधा.
  5. योग्य तपशीलांसह अर्ज फॉर्म भरा. तुमची वैयक्तिक माहिती तुमच्या OTR प्रोफाइलमधून आपोआप भरली जाईल.
  6. सूचनांनुसार तुमच्या वेबकॅमचा वापर करून लाईव्ह फोटो घ्या.
  7. तुमची स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करा.
  8. अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
  9. सर्व तपशील बरोबर आहेत याची खात्री करण्यासाठी तुमच्या अर्जाचे पूर्वावलोकन करा आणि नंतर ‘सबमिट करा’ वर क्लिक करा.
  10. तुमच्या रेकॉर्डसाठी तुम्ही सबमिट केलेल्या अर्ज फॉर्मची प्रत डाउनलोड करा आणि प्रिंट करा.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 ऑक्टोंबर 2025 रात्री 23:00 वाजेपर्यंत

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा

Delhi Police Head Constable Recruitment 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • लेखी परिक्षा आणि मैदानी चाचणीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मनात घेतली जाणार नाही.
  • उमेदवारांच्या  भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही उमेदवाराची उमेदवारी नाकारण्याचा अधिकार स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) दिल्ली पोलीसने राखून ठेवला आहे, जर अपात्र असल्याचे आढळले किंवा चुकीची  माहिती/प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर केली किंवा कोणतीही ‘भौतिक तथ्ये’ लपवली असतील, आणि अपात्र उमेदवारांनी भरलेले शुल्क जप्त केले जाईल.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

हि जाहिरात पण पहा 👇
💁‍♂️स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) दिल्ली पोलीस दलात 7565 पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध | SSC Delhi Police Constable Recruitment 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

1 thought on “स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाकरिता नवीन जाहिरात प्रसिद्ध | Delhi Police Head Constable Recruitment 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo