राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती | Nashik Mahanagar Palika Bharti 2025

Nashik Mahanagar Palika Bharti 2025: नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक महानगरपालिका  या ठिकाणी 12 वेगवेगळ्या 93 रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून. इच्छुक असाल तर हि जाहिरात नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कारण राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2025 नाशिक महानगरपालिका अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पात्रताधारक उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. या भरतीचे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरायचे असून अंतिम दिनांक 1 ऑक्टोंबर 2025 पर्यंत सादर करण्यास उमेदवारांना आवाहन केले आहे. उमेदवारांची निवड हि थेट मुलाखती द्वारे  होणार असून या भरती मोहिमेमध्ये कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा नाही. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Nashik Mahanagar Palika Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 093 पदे
  • पदाचे नाव : विविध पदासाठी जाहिरात (मूळ जाहिरात पहा)
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि वेगवेगळ्या पदांनुसार देण्यात आलेली आहे.(मूळ जाहिरात वाचा)

पदांचा तपशील

पद क्रं. पदाचे नाव पद संख्या
1. विशेषज्ञ ओबीजीवाय/स्त्रीरोगतज्ज्ञ (विशेषज्ञ) 04
2. (आयपीएचएस), बालरोगतज्ञ (विशेषज्ञ), 12
3. ऑर्थोपेडिशियन (विशेषज्ञ) 01
4. भूलतज्ज्ञ (विशेषज्ञ) (आयपीएचएस) 11
5. सर्जन (विशेषज्ञ) (आयपीएचएस) 03
6. फिजिशियन/कन्सल्टंट मेडिसिन (विशेषज्ञ) 06
7. मानसोपचारतज्ज्ञ (डीएमएचपी) 01
8. ईएनटी सर्जन (विशेषज्ञ) 01
9. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (विशेषज्ञ) 01
10. रेडिओलॉजिस्ट (विशेषज्ञ) (आयपीएचएस) 02
11. वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस 50
12. कार्यक्रम व्यवस्थापक-सार्वजनिक आरोग्य 01
एकुण 093
  • भरती विभाग : नाशिक महानगरपालिका यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती
  • मासिक वेतन : दरमहा 35,000 ते 75,000 रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
  • नोकरीचे ठिकाण : नाशिक शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात (महाराष्ट्र)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू तारीख 23 सप्टेंबर 2025 रोजी
अर्जाची अंतिम तारीख 1 ऑक्टोंबर 2025 पर्यंत
मुलाखत (Interview) 1 ऑक्टोंबर 2025 रोजी

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही नाशिक शहर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

अर्ज शुल्क  

अराखीव प्रवर्गासाठी 150/- रुपये
राखीव प्रवर्गासाठी 100/- रुपये
  • वयोमर्यादा (Age Limit) : खुल्या गटातील उमेवारांसाठी किमान वय 18 वर्ष व कमाल वयोमर्यादा 38 वर्षे व राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी कमाल 43 वर्षे देण्यात आलेली आहे.
  • मुलाखतीचा पत्ता : कै. रावसाहेब थोरात सभागृह (जुने), जिल्हा परिषद, नाशिक.

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा मुलाखत (Interview)
दुसरा टप्पा कागदपत्र पडताळणी

अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक : 1 ऑक्टोंबर 2025  सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत

महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
अर्ज नमुना येथे क्लिक करा 

Nashik Mahanagar Palika Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील दिलेल्या पत्त्यावरती दिनांक 3 ऑक्टोंबर 2025 च्या आत आलेले अर्ज ग्राह्य धरले जातील.
  2. ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी व मोबाईल नंबर वैध राहणे आवश्यक राहील.
  4. सदर Specialist तथा Medical Officer MBBS पदे नियमित रिक्त राहत असल्याने दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे Walk-in-interview पध्दतीने ३१ मार्च २०२६ पर्यंत पदे भरण्यात येतील. सदर पदे सामाजिक आरक्षणानुसार भरण्यात येतील तसेच राज्यस्तरावरुन वेळोवेळी दिलेल्या निर्देशान्वये प्रक्रिया राबविण्यात येईल.
  5. खुल्या प्रवर्गातील पदाकरीता रु. १५०/- व राखिव प्रवर्गातील पदाकरीता रू. 100/-चा डिमांड ड्राप्ट जोडणे आवश्यक आहे व डिमांड ड्राफटच्या मागे स्वतःचे नाव स्वहस्ताक्षरात लिहावे, सदरचा डिमांड ड्राफट “District Integrated Health & Family Welfare Society Nashik-Non PIP“या नावे असावा.
  6. कोणत्याही कारणास्तव डिमांड ड्राफट बँकेत न वठल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  7. शासकीय, निमशासकीय, खाजगी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असणा-या संबंधित अनुभवाचाच विचार निवड प्रक्रियेत करण्यात येईल. ज्या पदाकरिता अर्ज केला आहे त्याच पदाचा असलेला अनुभव ग्राहय धरण्यात येईल.
  8. वरिल पदे ही कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधन तत्वानुसार भरण्यात येणार असून सदरील नियुक्ती आदेश हे निर्गमित केलेल्या तारखेपासुन ते 11 महिने 29 दिवस पर्यंतच्या कालावधीकरिता भरण्यात येणार आहेत. पुढील पुनर्नियुक्ती आपल्या कामगिरी मुल्यांकनावर आधरित असेल.
  9. अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचा सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचुक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहतील याची दक्षता घ्यावी.
  10. वरील नमुद पदे ही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत. सदर पदावर शासकीय सेवेप्रमाणे असलेले नियम अटी व शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही तसेच यापदासाठी शासनाचे सेवानियम लागू नाहीत.
  11. केंद्र / राज्य शासनाने संबंधित पदे नामंजूर केल्यास उमेदवाराची सेवा कोणतीही पूर्वसूचना न देता तात्काळ समाप्त करण्यात येईल.
  12. अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुध्द् कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
  13. अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचेसोईनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणीकरता येणार नाही.(Nashik Mahanagar Palika Bharti 2025)
  14. अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्या सुरु असलेला मोबाईलनंबर व ई-मेलआयडी अचूक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्णहोईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी.
  15. भरती प्रक्रियेदरम्यान ज्या-ज्या उमेदवारांना बोलविण्यात येईल, त्या-त्या वेळी त्यांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. तसेच सदर उपस्थितीकरीता कोणतेही मानधन अथवा प्रवास खर्च देव राहणार नाही.
  16. अर्जाचा नमुना हा जाहिराती सोबत प्रसिध्द करण्यात आलेला असून, सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास उमेदवारांचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.
  17. उमेदवारांचा अर्ज अपुर्ण व अर्धवट भरलेला असल्याने नाकारला गेल्यास सर्वस्वी जबाबदारी हीउमेदवारांची राहील याबाबत उमेदवारांना तक्रार करता येणार नाही
  18. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

Nashik Mahanagar Palika Bharti 2025

हि जाहिरात पण पहा 👇
कॅनरा बँके अंतर्गत 3500 पदांकरिता नवीन भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध | Canara bank Requirement 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo