कॅनरा बँके अंतर्गत 3500 पदांकरिता नवीन भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध | Canara bank Requirement 2025

Canara bank Requirement 2025:तुम्ही नुकतेच पदवीधर परीक्षा उत्तीर्ण झाले आहात का? कारण पदवीधर उमेदवारांसाठी बँकिंग क्षेत्रात तुमचे मजबूत करियर घडवण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर हि जाहिरात तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. कारण कॅनरा बँकेने “पदवीधर अप्रेंटिस” भरती 2025 ची अधिकृत घोषणा ही नुकतीच केलेली आहे, संपूर्ण भारतामध्ये जवळपास 3,500 नवीन पदवीधर उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचे असून त्याचा अंतिम दिनांक हा 12 ऑक्टोंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे इच्छुक उमेदवारांनी या संधीचा नक्की फायदा करून घ्या! उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Canara bank Requirement 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 3500 पदे
  • पदाचे नाव : पदवीधर अप्रेंटिस पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या भरती साठी अर्ज सादर करू शकतात.

पदांचा तपशीलव

पद क्रं राज्य पद संख्या
1. कर्नाटक 591
2. उत्तर प्रदेश 410
3. तामिळनाडू 394
4. आंध्र प्रदेश 242
5. केरळ 243
6. महाराष्ट्र 201
7. पश्चिम बंगाल 150
8. तेलंगणा 132
9. बिहार 119
10. हरियाणा 111
11. मध्यप्रदेश 111
एकुण 3500

[टीप : जागांची संख्या तात्पुरती आहे आणि बँकेच्या आवश्यकतांनुसार बदलू शकते. राज्यनिहाय आणि श्रेणीनिहाय तपशीलवार माहितीसाठी, कृपया अधिकृत जाहिरात पहा !]

  • भरती विभाग : कॅनरा बँक अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.
  • नोकरीचा प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू 23 सप्टेंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 12 ऑक्टोंबर 2025 पर्यंत
शॉर्ट लिस्ट यादी नंतर कळविण्यात येईल

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि कॅनरा बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया
कॅनरा बँक अप्रेंटिस भरतीसाठी निवड प्रक्रिया सोपी आणि गुणवत्तेवर आधारित आहे. त्यासाठी कोणतीही लेखी परीक्षा नाही.(मुळ जाहिरात वाचा!)

पहिला टप्पा गुणवत्ता यादी तयार करणे
दुसरा टप्पा शॉर्ट लिस्ट उमेदवार
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
चौथा टप्पा वैद्यकीय चाचणी
  • मासिक वेतन (Salary) :  उमेदवारांना 15,000 रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 23 सप्टेंबर 2025 रोजी
    सर्वसाधारण उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे.
    [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्ष सूट]

अर्ज शुल्क

General / OBC / EWS/Other 500/- रुपये + GST
SC / ST / PwBD अर्ज शुल्क नाही

Canara bank Requirement 2025

अर्ज कसा करावा
  1. NATS पोर्टलवर नोंदणी करा: प्रथम, तुम्हाला राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रशिक्षण योजना (NATS) पोर्टलवर नोंदणी करावी लागेल (खाली दिलेली लिंक). तुमचे प्रोफाइल १००% पूर्ण करा आणि तुमचा नोंदणी क्रमांक मिळवा. हे अनिवार्य आहे.
  2. कॅनरा बँकेच्या वेबसाइटला भेट द्या: कॅनरा बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि ‘करिअर’ -> ‘भरती’ विभागात जा.
  3. लिंक शोधा: “2025-26 साठी कॅनरा बँकेतील पदवीधर अप्रेंटिसची नियुक्ती ॲक्ट, 1961 अंतर्गत कॅनरा बँकेत नियुक्ती” या लिंकवर क्लिक करा.
  4. नवीन नोंदणी: “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” वर क्लिक करा. तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड मिळविण्यासाठी तुमची मूलभूत माहिती प्रविष्ट करा.
  5. अर्ज भरा: लॉग इन करा आणि ऑनलाइन अर्ज फॉर्ममधील सर्व आवश्यक तपशील काळजीपूर्वक भरा. तुमचे नाव आणि इतर तपशील तुमच्या अधिकृत कागदपत्रांशी जुळत असल्याची खात्री करा.
  6. कागदपत्रे अपलोड करा: तुमचा फोटो, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणापत्राच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
  7. अर्ज शुल्क भरा: डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग वापरून ऑनलाइन अर्ज शुल्क भरण्यासाठी पुढे जा.
  8. अंतिम सबमिशन: “सेव्ह अँड नेक्स्ट” पर्याय वापरून सर्व तपशील पडताळून पहा. सर्वकाही बरोबर असल्याची खात्री झाल्यावर, “फायनल सबमिट” बटणावर क्लिक करा.
  9. अर्ज प्रिंट करा: अंतिम सबमिट केलेल्या अर्जाचा प्रिंटआउट आणि तुमच्या नोंदींसाठी ई-पावती घ्या.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 12 ऑक्टोंबर 2025 पर्यंत रात्री 11:59 वाजेपर्यंत

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा

Canara bank Requirement 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • पात्रता निकषात न बसणाऱ्या उमेदवारांनी परीक्षेचा अर्ज भरल्यास अथवा भरलेली माहिती चुकीची आढळल्यास संबंधित अर्ज बाद करण्यात येईल तसेच त्यासाठी भरण्यात आलेले परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत दिले जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.(Canara bank Requirement 2025)
  • सदरची लेखनिक पदाकरिता केवळ महिला उमेदवार अर्ज करू शकतात अर्ज करण्यापूर्वी अर्जदारानी काळजी घ्यावी.
  • पदसंख्या, निवड प्रक्रिया संबंधीचे, निवड पद्धत इत्यादी बाबतचे सर्व अधिकार बैंकेकडे राखीव असतील.
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर जर असे आढळून आले की उमेदवार पात्रता निकषांची पूर्तता करत नाही आणि/किंवा त्याने कोणतीही चुकीची/खोटी माहिती/प्रमाणपत्र/कागदपत्रे सादर केली आहेत किंवा कोणतीही महत्त्वाची वस्तुस्थिती लपवली आहे, तर त्याची/तिची उमेदवारी रद्द केली जाईल. बँकेत सामील झाल्यानंतरही, कोणत्याही वेळी अशी कोणतीही विसंगती किंवा कमतरता आढळल्यास, त्याच्या/तिच्या सेवा रद्द केल्या जाऊ शकतात..
  • उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये बँकेकडे  निर्णय अंतिम असेल.
  • उमेदवाराला निवड झालेल्या त्या ठिकाणाच्या स्थानिक भाषेचे ज्ञान असणे गरजेचे असणार आहे
  • उमेदवारांच्या पात्रतेबाबत, पात्रतेची अशी छाननी कोणत्या टप्प्यात करायची आहे, निवड आणि भरतीशी संबंधित इतर कोणत्याही बाबींसाठी बँकेचा निर्णय अंतिम आणि उमेदवारावर बंधनकारक असेल. या संदर्भात वैयक्तिक चौकशीसाठी बँकेकडून कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
  • कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  • आवश्यक असल्यास, निवड प्रक्रियेत बदल करण्याचा/थांबवण्याचा/बदल करण्याचा अधिकार बँकेकडे राखून आहे. जर काही बदल झाले तर, उमेदवारांना कळवले जातील.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) दिल्ली पोलीस दलात 7565 पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध | SSC Delhi Police Constable Recruitment 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

1 thought on “कॅनरा बँके अंतर्गत 3500 पदांकरिता नवीन भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध | Canara bank Requirement 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo