Panjab and Shindh Bank Bharti 2025 : बँकिंग क्षेत्रात करियर घडवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी सुवर्ण संधी चालून आलेली आहे. भारतातील इच्छुक बँकर्ससाठी एक महत्त्वाची जाहिरात आहे. “क्रेडिट मॅनेजर, एमएमजीएस II मध्ये कृषी व्यवस्थापक” 190 रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पंजाब अँड सिंध बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक आहे या क्षेत्रातील करिअर हे केवळ नोकरी नाही तर ती प्रतिष्ठेची आणि सुरक्षतेची बाब असल्याने, ही भरती मोहीम सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग उद्योगात स्थिर आणि फायदेशीर कारकीर्द मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 10 ऑक्टोंबर 2025 पर्यंत देण्यात आलेले आहेत. उमेदवारांनी कृपया अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आलेले आहे ती वाचावी!
Panjab and Shindh Bank Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने पअर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 0190 पदे
- पदाचे नाव : क्रेडिट मॅनेजर, MMGS II कृषी व्यवस्थापक”
- शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्या शाखेतील पदवी (मूळ जाहिरात वाचा!)
पदांचा तपशीलव
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | क्रेडिट मॅनेजर MMGS II | 130 |
| 2. | कृषी व्यवस्थापक MMGS II | 060 |
| एकुण | 0190 |
- भरती विभाग : पंजाब अँड सिंध बँक अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : बँकिंग क्षेत्रात कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाइन अर्ज सुरू | 19 सप्टेंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 10 ऑक्टोंबर 2025 पर्यंत |
| परिक्षा शुल्क अंतिम तारीख | 10 ऑक्टोबर 2025 |
| परिक्षा/मुलाखत | नंतर कळविण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही पंजाब अँड सिंध बँकच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | ऑफलाईन लेखी परीक्षा |
| दुसरा टप्पा | मुलाखत (Interview) |
| तिसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- अर्ज शुल्क (Fee)
General/OBC/EWS : 850/- रुपये + GST ]
SC/ST/PWD : 175/- रुपये + GST ] - मासिक वेतन (Salary) : बेसिक 48,480/- ते 85,920/- रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
- वयोमर्यादा (Age Limit) : 19 सप्टेंबर 2025 रोजी, 23 ते 35 वर्षा दरम्यान असावे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्ष सूट ]
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 ऑक्टोंबर 2025 पर्यंत रात्री 11:59 वाजेपर्यंत
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
Panjab and Shindh Bank Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मनात घेतली जाणार नाही.
- बँकेने स्थापन केलेली शॉर्टलिस्टिंग समिती शॉर्टलिस्टिंग पॅरामीटर्स ठरवेल आणि त्यानंतर, बँकेने ठरवल्याप्रमाणे पुरेशा संख्येने उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल.(Panjab and Shindh Bank Bharti 2025)
- मुलाखतीसाठी उमेदवारांना बोलावण्याचा बँकेचा निर्णय अंतिम असेल. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवारांच्या भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही उमेदवाराची उमेदवारी नाकारण्याचा अधिकार बँकेकडे राखून ठेवला आहे, जर अपात्र असल्याचे आढळले किंवा चुकीची माहिती/प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर केली किंवा कोणतीही ‘भौतिक तथ्ये’ लपवली असतील, आणि अपात्र उमेदवारांनी भरलेले शुल्क जप्त केले जाईल.
- जाहिरात केलेल्या रिक्त पदांची संख्या तात्पुरती आहे आणि बँकेच्या ‘वास्तविक आवश्यकतांनुसार, योग्य उमेदवाराच्या उपलब्धतेनुसार’ बदलू शकते.
- बँकेच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांची योग्यता आणि अनुभव यावर आधारित बँक त्यांची पात्रता विचारात घेईल. केवळ किमान पात्रता आणि अनुभव पूर्ण केल्याने मुलाखतीसाठी बोलावण्याचा उमेदवाराला कोणताही अधिकार राहणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
Panjab and Shindh Bank Bharti 2025
हि जाहिरात पण पहा 👇
💁♂️बँक ऑफ बडोदा विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध | Bank Of Baroda Recruitment 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा