Bank Of Baroda Recruitment 2025:बँकिंग क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी बँक ऑफ बडोदाने एक उत्तम संधी निर्माण करून दिलेली आहे, विविध पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. तुमच्याकडे जर पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता असेल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात. कारण या भरतीमध्ये 56 रिक्तू पदे भरण्यात येणार असून ही एक उमेदवारांसाठी खुप चांगली संधी आहे. या भरतीची वैशिष्ट्य म्हणजे सुरक्षितता आणि स्थिर करिअर घडवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीमध्ये तुम्हाला आकर्षक पगार आणि असंख्य भत्ते, देखील मिळणार आहेत. या भरतीचे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 9 ऑक्टोंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!
Bank Of Baroda Recruitment 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने पअर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 056 पदे
- पदाचे नाव : विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध (मूळ जाहिरात वाचा)
पदांचा तपशील
| पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | मुख्य व्यवस्थापक – गुंतवणूकदार संबंध | 02 |
| 2. | व्यवस्थापक – ट्रेड फायनान्स ऑपरेशन्स | 14 |
| 3. | व्यवस्थापक – फॉरेक्स अधिग्रहण आणि संबंध | 37 |
| 4. | वरिष्ठ व्यवस्थापक – फॉरेक्स अधिग्रहण आणि संबंध | 05 |
| एकुण | 056 |
शैक्षणिक पात्रता
| पद | पात्रता |
| मुख्य व्यवस्थापक – गुंतवणूकदार संबंध | अर्थशास्त्र / वाणिज्य पदवीधर (प्राधान्य: सीए / एमबीए / ईपीजीएम / आयआयएम किंवा समकक्ष अभ्यासक्रमांमधून प्रमाणित जनरल मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह) + अनुभव. |
| व्यवस्थापक – ट्रेड फायनान्स ऑपरेशन्स | कोणत्याही शाखेत पदवी (प्राधान्य: आयआयबीएफ कडून फॉरेक्समध्ये प्रमाणपत्र, सीडीसीएस / सीआयटीएफ किंवा फॉरेक्स / आंतरराष्ट्रीय व्यवसाय ऑफरवरील इतर प्रमाणपत्र उत्तीर्ण उमेदवार) + अनुभव. |
| व्यवस्थापक – फॉरेक्स संपादन आणि संबंध | कोणत्याही शाखेत पदवी (प्राधान्य: सीडीसीएस / सीआयटीएफ किंवा फॉरेक्स / आंतरराष्ट्रीय व्यवसाय ऑफरवरील इतर प्रमाणपत्र उत्तीर्ण उमेदवार, एमबीए / पीजीडीएम / वित्त / विपणन / व्यापार वित्त मध्ये विशेषज्ञता) + अनुभव. |
| वरिष्ठ व्यवस्थापक – फॉरेक्स संपादन आणि संबंध | कोणत्याही शाखेत पदवी आणि विक्री / विपणन / बँकिंग / वित्त / व्यापार वित्त मध्ये २ वर्ष पूर्णवेळ एमबीए / पीजीडीएम (प्राधान्य: आयआयबीएफ कडून फॉरेक्समध्ये प्रमाणपत्र. सीडीसीएस / सीआयटीएफ किंवा फॉरेक्स / आंतरराष्ट्रीय व्यवसाय ऑफरवरील इतर प्रमाणपत्र उत्तीर्ण उमेदवार) + अनुभव |
- भरती विभाग : बँक ऑफ बडोदा अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : बँकिंग क्षेत्रात कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाइन अर्ज सुरू | 19 सप्टेंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 9 ऑक्टोंबर 2025 पर्यंत |
| परिक्षा शुल्क अंतिम तारीख | 9 ऑक्टोबर 2025 |
| परिक्षा/मुलाखत | नंतर कळविण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | ऑनलाईन लेखी परीक्षा |
| दुसरा टप्पा | मुलाखत (Interview) |
| तिसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- अर्ज शुल्क(Fee)
General/OBC/EWS : 850/- रुपये + GST ]
SC/ST/PWD : 175/- रुपये + GST ] - मासिक वेतन (Salary) : बेसिक 64,820/- ते 1,20,940/- रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
- वयोमर्यादा (Age Limit) : 1 सप्टेंबर 2025 रोजी, 24 ते 40 वर्षा दरम्यान असावे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्ष सूट ]
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 9 ऑक्टोंबर 2025 पर्यंत रात्री 11:59 वाजेपर्यंत
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
Bank Of Baroda Recruitment 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मनात घेतली जाणार नाही.
- बँकेने स्थापन केलेली शॉर्टलिस्टिंग समिती शॉर्टलिस्टिंग पॅरामीटर्स ठरवेल आणि त्यानंतर, बँकेने ठरवल्याप्रमाणे पुरेशा संख्येने उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
- मुलाखतीसाठी उमेदवारांना बोलावण्याचा बँकेचा निर्णय अंतिम असेल. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.(Bank Of Baroda Recruitment 2025)
- उमेदवारांच्या भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही उमेदवाराची उमेदवारी नाकारण्याचा अधिकार बँकेकडे राखून ठेवला आहे, जर अपात्र असल्याचे आढळले किंवा चुकीची माहिती/प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर केली किंवा कोणतीही ‘भौतिक तथ्ये’ लपवली असतील, आणि अपात्र उमेदवारांनी भरलेले शुल्क जप्त केले जाईल.
- जाहिरात केलेल्या रिक्त पदांची संख्या तात्पुरती आहे आणि बँकेच्या ‘वास्तविक आवश्यकतांनुसार, योग्य उमेदवाराच्या उपलब्धतेनुसार’ बदलू शकते.
- बँकेच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांची योग्यता आणि अनुभव यावर आधारित बँक त्यांची पात्रता विचारात घेईल. केवळ किमान पात्रता आणि अनुभव पूर्ण केल्याने मुलाखतीसाठी बोलावण्याचा उमेदवाराला कोणताही अधिकार राहणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
Bank Of Baroda Recruitment 2025
हि जाहिरात पण पहा 👇
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 133 रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध | Yavatmal DCC Banks Bharti 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा
1 thought on “बँक ऑफ बडोदा विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध | Bank Of Baroda Recruitment 2025”