Mira-Bhayandar Municipal Corporation Requirement 2025 : मीरा-भाईंदर महानगरपालिका भरती 2025

Mira-Bhayandar Municipal Corporation Requirement 2025
MBMC पूर्ण रूप (Mira Bhayandar Municipal Corporation) आहे,
मिरा भाईंदर महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान National Health Mission (NHM), राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम (NTEP), 15 वा वित्त आयोग (नागरी आयुष्यामन आरोग्य मंदिर) व हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत करारतत्वावर ठोक मानधनावर  रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांची निवड करणेकामी भाईंदर महानगर पालिकेने जाहिरात प्रसिद्ध केली आहे इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कळविण्यात येत आहे. या जाहिरातीमध्ये जवळपास 15 वेगवेगळ्या पदांसाठी 130 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आणि वेगवेगळ्या पदासाठी पदानुसार पात्रता मागवण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी जाहिरातीत पदापुढे नमूद केलेली शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी. अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने मागवण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी अंतिम दिनांक हा 20 ऑगस्ट 2025 पर्यंत देण्यात आलेले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

पदांचा तपशील येथे आहे:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1. रेडिओलॉजिस्ट/Radiologist 01
2. बालरोगतज्ञ/Pediatrician 01
3. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ/Microbiology 01
4. वैद्यकीय अधिकारी/Medical Officer 33
5. साथरोगतज्ञ/Epidemologist 01
6. दंतशल्य चिकिस्तक/Dentist 01
7. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक/Public Health Manager 02
8. परिचारिका/Nurse 37
9. प्रयोगशाळा तंत्रज्ञ/Laboratory Technician 04
10. औषध निर्माता/Pharmacist 02
11. प्रसविका/Obstetrician 06
12. औषध निर्माण अधिकारी/Drug Manufacturing Officer 01
13. वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक/Senior Tuberculosis Laboratory Supervisor 01
14. क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता/Tuberculosis Health worker 01
15. MPW/MPW 34

एकूण पदसंख्या: 130
अर्ज पद्धत: ऑफलाईन पद्धतीने
(या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.)
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता हे प्रत्येक पदांनुसार वेगवेगळी आहे त्यामुळे सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प.), ता. जि. ठाणे 401101
वयोमर्यादा: अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकास म्हणजेच 20/08/2025 रोजी उमेदवाराचे वय हे किमान 18 व ज्या पदाकरीता जाहिरातीत विहित केलेल्या वयोमर्यादेत असणे आवश्यक आहे. अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा ३८ वर्ष व राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा ४३ वर्ष राहील.
अर्ज शुल्क: शुल्क नाही
निवड प्रक्रिया: थेट मुलाखत
नोकरीचे ठिकाण: मीरा-भाईंदर, ठाणे (महाराष्ट्र)
पत्राद्वारे अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक: 20 ऑगस्ट 2025
वेतनमान (Pay Scale) : 45,000/- रुपये ते 75,000/- रुपये पर्यंत.
(अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

जाहिरात बघा PDF येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना:
•अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
•सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
•अर्ज सादर करीत असतांना आवश्यक सर्व शैक्षणिक, अनुभव, जात इ. दाखले, प्रमाणपत्राच्या स्वयंसाक्षांकित सुस्पष्ठ छायांकित प्रती जोडाव्यात.
•अपूर्ण माहिती भरलेले व आवश्यक कागदपत्रे नसलेले अर्ज ग्राहय धरले जाणार नाहीत.
•उमेदवारांस मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यास मराठी लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
•राखीव प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर प्रवर्गातील उमेदवारांना तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात येईल, त्यामुळे सर्व प्रवर्गातील पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत.

•अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावे

जाहिरात तुमच्या नातेवाईक /मित्र-मैत्रिणींना शेअर करा 👇

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo