RRC उत्तर मध्ये रेल्वे विभाग भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध | RRC NCR Apprentice Recruitment 2025

RRC NCR Apprentice Recruitment 2025:रेल्वे विभागात करिअर घडवण्यासाठी इच्छुक आहात का? कारण RRC उत्तर मध्य रेल्वे विभागाने अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार)पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, या मध्ये दहावी/बारावी/आयटीआय पात्रता धारक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी मिळाली आहे. या भारतीय मोहिमेअंतर्गत जवळपास 1763 रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे.जर तुम्ही भारतीय रेल्वेसोबत काम करण्याचे स्वप्न बघितले असेल तर या संधीचा नक्कीच फायदा करून घ्या. हि भरती केवळ प्रशिक्षण नाही तर यामध्ये तुम्हाला मासिक पगार देखील देण्यात येणार असून, या भरतीचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून त्याचा अंतिम दिनांक 18 ऑक्टोंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. या भरतीचे सर्व तपशील या लेखात देण्यात आलेला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

RRC NCR Apprentice Recruitment 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 1763 पदे
  • पदाचे नाव : अप्रेंटिस शिकाऊ उमेदवार (मूळ जाहिरात वाचा)
  • शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयासह (किमान ५०% गुणांसह) १० वी/12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (सविस्तर मूळ जाहिरात pdf स्वरूपात वाचावी.)

पदांचा तपशील

अ. क्रं. विभाग/कार्यशाळा युनिट पद सांख्या
1. प्रयागराज (PRYJ) विभाग 703
2. झाशी (JHS) विभाग 497
3. आग्रा (AGC) विभाग 296
4. कार्यशाळा झाशी  235
5. मुख्यालय/NCR/PRYJ 032
एकुण  1763
  • भरती विभाग : RRC उत्तर मध्य रेल्वे विभागा अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • भरती श्रेणी : रेल्वे क्षेत्रात नोकरी मिळविण्याची संधी.
  • भरती प्रकार : अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार)

महत्त्वाच्या तारखा

जाहिरात प्रकाशित 16 सप्टेंबर 2025 रोजी
ऑनलाइन अर्ज सुरू 18 सप्टेंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 17 ऑक्टोंबर 2025 पर्यंत

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही RRC उत्तर मध्य रेल्वे विभागाच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

  • वयोमर्यादा (Age Limit) : 16 सप्टेंबर 2025 रोजी,  15 ते 24 वर्षे  [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्ष सूट ]
  • मासिक वेतन (Salary) : अप्रेंटिस ऍक्ट 1961 नुसार मासिक वेतन मिळणार आहे.
  • नोकरीचे ठिकाण : RRC उत्तर मध्य रेल्वे विभागामध्ये

अर्ज शुल्क 

General/OBC/EWS 100/- रुपये
SC/ST/PWD/Woman  अर्ज शुल्क नाही
निवड प्रक्रिया
  •  गुणवत्तेच्या आधारावर निवड होणार आहे यामध्ये लेखी परीक्षा किंवा मुलाखत नाही.
  • उमेदवारांनी त्यांच्या पात्रता परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. ती खालील पद्धतीने असेल.
  • गुणवत्ता यादी उमेदवाराने मॅट्रिक (दहावी) आणि आयटीआय दोन्ही परीक्षांमध्ये मिळवलेल्या गुणांच्या टक्केवारीच्या सरासरीच्या आधारे तयार केली जाईल, दोन्ही परीक्षांना समान वजन दिले जाईल.
  • गुणवत्ता गणना सूत्र: (दहावीतील गुणांची टक्केवारी + आयटीआयमधील गुणांची टक्केवारी)/२ उदाहरणार्थ, जर एखाद्या उमेदवाराने दहावीत 75% आणि आयटीआय ट्रेडमध्ये 85% गुण मिळवले असतील, तर त्यांचा गुणवत्ता गुण (75 + 85) / 2 = 80% म्हणून मोजला जाईल. त्यानंतर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.

RRC NCR Apprentice Recruitment 2025

ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत
  1. आरआरसी प्रयागराजच्या सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  2. होमपेजवर, आल्यानंतर 2025-26 साठी अप्रेंटिस कायदा 1961 अंतर्गत अप्रेंटिसची सहभागिता” या लिंकवर क्लिक करा.
  3. दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि नाव, ईमेल आणि मोबाइल नंबर यासारखी तुमची महत्वाची माहिती  देऊन नोंदणी करा.
  4. नोंदणी केल्यानंतर तुमच्या ईमेल आणि मोबाइलवर पाठवलेला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
  5. अर्जामध्ये अचूक वैयक्तिक, शैक्षणिक आणि संपर्क तपशीलांसह ऑनलाईन अर्ज फॉर्म भरा.
  6. अर्जामध्ये आवश्यक असलेले कागदपत्र व्यवस्थितरित्या दिलेल्या साईज मध्ये अपलोड करा.
  7. पेमेंट गेटवेद्वारे ऑनलाईन अर्ज शुल्क भरा. शुल्क परतफेड करण्यायोग्य नाही.
  8. अर्ज शुल्क व्यवस्थित भरल्यानंतर तुमचा अर्ज व्यवस्थित रित्या भरला गेला आहे याची खात्री करा आणि मगच सबमिट या बटणावर क्लिक करा.
  9. तुमच्या निवड पद्धतीमध्ये अर्जाचे फ्रेंड मागितली जाऊ शकते त्यामुळे प्रिंट डाउनलोड करून व्यवस्थित रित्या जपून ठेवा.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत

महत्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा

RRC NCR Apprentice Recruitment 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये  आर आर सी दक्षिण रेल्वे विभागाकडे (RRC NCR Apprentice Recruitment 2025)निर्णय अंतिम असेल.
  • अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
    कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

RRC NCR Apprentice Recruitment 2025

हि जाहिरात पण पहा 👇

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण भरती वर्धा जाहिरात प्रसिद्ध | National Health Mission Wardha Bharti 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा

4 thoughts on “RRC उत्तर मध्ये रेल्वे विभाग भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध | RRC NCR Apprentice Recruitment 2025”

  1. ड्राफ्ट्समन मेकॅनिकल च्या जागा कधी निघणार आहे ?

    Reply

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo