बृहन मुंबई महानगरपालिका नवीन जाहिरात प्रसिद्ध | Mumbai Mahanagarpalika Bharti 2025

Mumbai Mahanagarpalika Bharti 2025:नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कंत्राटी पद्धतीने “कलाकार आणि लेखापाल कम डेटा एन्ट्री ऑपरेटर26 रिक्त पदांकरिता एक उत्तम संधी निर्माण करून देण्यात आलेले आहे या भरतीमुळे खूप सार्‍या उमेदवारांचे  नोकरीचे स्वप्न हे पूर्ण होणार आहे. कारण बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025 जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 22 सप्टेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. प्रस्तुत भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आले आहेत. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Mumbai Mahanagarpalika Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन(Google Form mode)  पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : 026
  • पदाचे नाव : कलाकार आणि लेखापाल कम डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदांकरिता भरती प्रक्रिया

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कलाकार 12 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा, बॅचलर ऑफ फाइन आर्ट (कमर्शियल आर्ट) पदवी परीक्षा, डिजिटल ग्राफिक्समध्ये डिप्लोमा विथ फोटोशॉप आणि कोरेल ड्रॉ संगणकात अभ्यासक्रम आणि संगणकावर कलाकृती तयार करण्याचा 3 ते 5 वर्षांचा अनुभव असावा. उमेदवाराने 1 वर्ष कालावधीचा संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा. उमेदवाराने डेस्क टॉप पब्लिशिंग (डीटीपी) 6 महिन्यांचा अभ्यासक्रम, महाराष्ट्र सरकारची टंकलेखन परीक्षा मराठी 30 एससीपीएम आणि इंग्रजी 40 एससीपीएम उत्तीर्ण केलेला असावा. उमेदवारांनी “डी.ओ.ई., एसीसी सोसायटी (C.C.C) किंवा (ओ लेव्हल) किंवा (ए लेव्हल) किंवा (बी लेव्हल) किंवा (सी लेव्हल) पातळी प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य आणि तंत्रशिक्षण मंडळाचे MSCIT किंवा GECT प्रमाणपत्र धारक असावेत.
अकाउंटंट कम डेटा एंट्री ऑपरेटर 10 वी/12वी उत्तीर्ण, वाणिज्य (B.Com.) मध्ये पदवी परीक्षा प्रमाणपत्र, उमेदवारांकडे “डी.ओ.ई., एसीसी सोसायटी (सीसीसी) किंवा  (ओ लेव्हल) किंवा (ए लेव्हल) किंवा (बी लेव्हल) किंवा (सी लेव्हल) लेव्हल प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य आणि तंत्रशिक्षण मंडळ MSCIT किंवा GECT प्रमाणपत्र
  • भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका यांचा आस्थापने अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती नोकरी मिळवण्याची संधी.
  • मासिक वेतन : दरमहा 18,000 ते 40,000 रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
  • नोकरीचे ठिकाण : मुंबई(महाराष्ट्र)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू तारीख 15 सप्टेंबर 2025 रोजी
अर्जाची अंतिम तारीख 22 सप्टेंबर 2025 पर्यंत
परीक्षा/मुलाखत नंतर कळवण्यात येईल

[ अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

  • अर्ज शुल्क (Fee) : शुल्क नाही
  • वयोमर्यादा (Age Limit) : 01 सप्टेंबर 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे आणि 43 वर्षापेक्षा जास्त नसावे.

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा लेखी परीक्षा
दुसरा टप्पा मुलाखत (Interview)
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 22 सप्टेंबर 2025  सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

Mumbai Mahanagarpalika Bharti 2025

⚠️उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. उमेदवाराने जाहिरातीनुसार दिलेल्या कालावधीच्या आत गुगल फॉमद्वारे अर्ज करावा.
  2. कंत्राटी पध्दतीवर नेमणूक केलेल्या उमेदवारांची सेवा त्यांना पूर्वसुचना न देता संपुष्टात आणण्याचे आधिकार प्रशासनास राहतील.
  3. कंत्राटी कालावधीत काम करणाऱ्या उमेदवारांची सेवा तात्पुरत्या स्वरुपाची असल्याने त्यांची सदर सेवा सेवाजेष्ठतेसाठी विचारत घेतली जाणार नाही किंवा सदर सेवेला सेवाजेष्ठतेसाठी प्राधान्य देण्यात येणार नाही. तसेच, त्यांना नियमित पदावर हक्क सांगता येणार नाही.
  4. निवड झालेल्या उमेदवारांनी संबंधित पदावर नियुक्ती करण्यापूर्वी सोबत जोडलेल्या करारनाम्याच्या नमुन्या प्रमाणे 500/- रुपयाच्या बॉन्ड पेपरवर करारनामा द्यावा लागेल.
  5. यापूर्वी संबंधित कार्यालयात व अन्य ठिकाणी सादर केलेले व पोष्टाने प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणर नाहीत तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोणत्याही व्यक्तीला व इतर दुसऱ्या संस्थेला अर्ज विकणे, स्विकारणे इत्यांदीचा अधिकार दिलेला नाही, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
  6. जर एखादया उमेदवाराने भरतीच्या कोणत्याही टप्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास किंवा अनुचित माध्यमांचा अवलंब केल्याचे किंवा तोतया व्यक्तींची व्यवस्था केल्याचे आढळल्यास त्याला निवडीतून अपात्र ठरविण्यात येईल.
  7. मध्यस्थ/ठक/मुंबई महानगरपालिकेत संबंध असल्याचे भासविणाऱ्या व्यक्ती यांचा गैरमार्गाने नोकरी मिळवून देण्याच्या आश्वासनापासून सावध राहण्याच्या उमेदवारांना सूचना देण्यात येत आहेत.(Mumbai Mahanagarpalika Bharti 2025)
  8. प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव भरती प्रक्रिया कोणत्याही वेळेस किंवा कोणत्याही टप्यावर थांबविण्याचे अधिकार बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त / कार्यकारी आरोग्य अधिकारी यांना आहेत.
  9. गुणवत्तेनुसार स्थानिक उमेदवारांचा प्राधान्याने विचार करण्यात येईल परंतु अंतिम निर्णय प्रशासनाचा राहिल.
  10. उमेदवाराने एकदा अर्ज केल्यानंतर विहित वेळ समाप्त झाल्यानंतर कोणतेही कागदपत्रे नंतर आणून दिल्यास ती कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार नाहीत व त्यांचा अर्ज अपूर्ण समजून अपात्र ठरविण्यात येईल.
    भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी व मोबाईल नंबर वैध राहणे आवश्यक राहील.
  11. वरिल पदे ही कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधन तत्वानुसार भरण्यात येणार असून सदरील नियुक्ती आदेश हे निर्गमित केलेल्या तारखेपासुन ते 179 दिवस पर्यंतच्या कालावधीकरिता भरण्यात येणार आहेत. पुढील पुनर्नियुक्ती आपल्या कामगिरी मुल्यांकनावर आधरित असेल.
  12. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2025

हि जाहिरात पण पहा 👇
खूशखबर | राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी भरती 2025 | National Health Mission Ratnagiri Bharti 2025 

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

9 thoughts on “बृहन मुंबई महानगरपालिका नवीन जाहिरात प्रसिद्ध | Mumbai Mahanagarpalika Bharti 2025”

  1. कंत्राटदारांना पाहिजे तसं वागवता येईल .
    कायम स्वरुपी माणसांची कामे त्यांच्यावर
    लादण्यात येतील.. आणि जर काम चुकीचे काय झाले तर त्यांना लगेच कामावरून काढून टाकण्यात येईल… हेच आहे.
    म्हणून 500/_ रु. आकारण्यात आले आहेत..

    Reply

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo