Laghuvad Nyayalay Bharti 2025:सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी लघुवाद न्यायालय, मुंबई यांच्या आस्थापनेवारील ग्रंथपाल पहारेकरी शिपाई या पदांकरिता एक उत्तम संधी निर्माण करून देण्यात आलेले आहे या भरतीमुळे बरेच उमेदवारांचे सरकारी नोकरीचे स्वप्न हे पूर्ण होणार आहे. कारण लघुवाद न्यायालय मुंबई यांच्या अंतर्गत नवीन 2025 जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचा कालावधी हा दिनांक 11 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. प्रस्तुत भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आले आहेत. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी!
Laghuvad Nyayalay Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 04
- पदाचे नाव : ग्रंथपाल, पहारेकरी आणि माळी या पदांकरिता भरती प्रक्रिया
- शैक्षणिक पात्रता : 7वी / 10वी उत्तीर्ण उमेदवार (मूळ जाहिरात वाचा)
पदांचा तपशील
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | ग्रंथपाल (Librarian) | 01 |
| 2. | पहारेकरी (Watchmen) | 02 |
| 3. | माळी (Gardener) | 01 |
| एकुण | 04 |
- भरती विभाग : लघुवाद न्यायालय, मुंबई यांचा आस्थापने अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : सरकारी विभागात कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याची संधी.
- मासिक वेतन : दरमहा 15,000 ते 69,900 रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
- नोकरीचे ठिकाण : मुंबई(महाराष्ट्र)
महत्त्वाच्या तारखा
| अर्ज सुरू तारीख | 11 सप्टेंबर 2025 रोजी |
| अर्जाची अंतिम तारीख | 25 सप्टेंबर 2025 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. |
| परीक्षा/मुलाखत | नंतर कळवण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही लघुवाद न्यायालय, मुंबई यांच्या आस्थापनेच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
- अर्ज शुल्क (Fee) : शुल्क नाही
- वयोमर्यादा (Age Limit) : सर्वसाधारण प्रवर्गाकरिता किमान वयोमर्यादा 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा 38 वर्ष देण्यात आलेले असून मागास प्रवर्ग गटातील उमेदवारांसाठी 43 वर्षापेक्षा वयाचा जास्त नसावा.
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | लघुसूची (Shortlist) |
| दुसरा टप्पा | लेखी परीक्षा |
| तिसरा टप्पा | मुलाखत (Interview) |
| चौथा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
अर्ज सादर करण्याचा ठिकाण : स्पीड पोस्टाने (पोचपावतीसह) प्रबंधक, लघुवाद न्यायालय, लोकमान्य टिळक मार्ग, धोबी तलाव, मुंबई-400002
अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक : 25 सप्टेंबर 2025 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| अर्ज नमुना | येथे क्लिक करा |
Laghuvad Nyayalay Bharti 2025
⚠️उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील दिलेल्या पत्त्यावरती दिनांक 25 सप्टेंबर 2025 च्या आत आलेले अर्ज ग्राह्य धरले जातील.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी व मोबाईल नंबर वैध राहणे आवश्यक राहील.
- एका उमेदवारास वेगवेगळ्या पदाकरिता अर्ज करावयाचे असल्यास वेगवेगळे अर्ज सादर करावेत. एकाच अर्जावर तीनही पदे किंवा एकाच लिफाफ्यात तीनही पदे लिहून पाठविल्यास ते रद्द समजले जाईल.
- कोणत्याही परिस्थितीत हस्तप्रेक्षणाद्वारे (by hand/e-mail/whatsapp) द्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम तारखेनंतर प्राप्त अर्जाचा, सूचना क्र. ३ व्यतिरिक्त आलेल्या अर्जाचा, डाकेने विलंब झालेल्या अर्जाचा, बंद पाकीटावर पदाचे नांव नमूद नसलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही
- उमेदवाराने अर्जासोबत कोणतीही मुळ कागदपत्रे / प्रमाणपत्रे अथवा साक्षांकित प्रती जोडू नयेत. उमेदवारांना मुळ कागदपत्रे सादर करण्याबाबत योग्य वेळी सूचना दिली जाईल.
- या कार्यालयाने भरती प्रक्रियेकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारलेले नसून ती पूर्णपणे निशुल्क आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच अर्जासोबत कोणत्याही प्रकारचे शुल्क जसे की, दर्शनी धनाकर्ष (Demand Draft), प्रदानादेश (Pay Order) धनादेश (Cheque) इ. जोडू नये.
- अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा व अर्जदारा विरुध्द कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झाला नसावा
- उमेदवारांनी आपले अर्जासोबत स्वतःच्या नावासह संपूर्ण पत्ता असलेला लिफाफा ५ रुपयाचे डाक टिकीट लावून पाठवावा
- सदर जाहिरातीस अनुसरुन ज्या उमेदवारांचे अर्ज विहित मुदतीत प्राप्त होतील केवळ अशाच उमेदवरांचे अर्ज विचारात घेतले जातील. अन्य कोणत्याही संदर्भातील यापूर्वी या कार्यालयास प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही
- केंद्र शासनाने संबंधित पदे नामंजुर केल्यास उमेदवाराची सेवा कोणतीही पुर्व सुचना न देता तात्काळ समाप्त करण्यात येईल.
- उमेदवारांनी अर्ज करित असलेल्या पदाचे नाव व स्वतःच्या जातीचा प्रवर्ग अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करावा. जर एकापेक्षा अधिक पदांकरिता अर्ज करावयाचा असल्यास उमेदवारांनी प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र अर्ज सादर करावेत. तसेच ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्याच पदासाठी अर्ज ग्राहय धरला जाईल. तसेच कार्यक्रमाचे नाव स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे.
- चुका टाळण्यासाठी, अर्ज पाठविण्यापुर्वी उमेदवारांनी संकेतस्थळावर दर्शविण्यात आलेलया सूचना लक्षपूर्वक वाचाव्यात
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
Laghuvad Nyayalay Bharti 2025
हि जाहिरात पण पहा 👇
राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी नवीन जाहिराती प्रसिद्ध 2025 | National Health Mission Parbhani Bharti 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा