सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | NHM Sangli Miraj Mahanagarpalika Bharti 2025

NHM Sangli Miraj Mahanagarpalika Bharti 2025:नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका  या ठिकाणी 23 वेगवेगळ्या 82 रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून. इच्छुक असाल तर हि जाहिरात नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कारण राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2025 मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका(NHM Sangli Miraj Mahanagarpalika Bharti 2025) अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पात्रताधारक उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. या भरतीचे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरायचे असून दिनांक 12 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2025 यादरम्यान सादर करण्यास उमेदवारांना आवाहन केले आहे. उमेदवारांची निवड हि थेट मुलाखती द्वारे  होणार असून या भरती मोहिमेमध्ये कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा नाही.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

NHM Sangli Miraj Mahanagarpalika Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : 082
  • पदाचे नाव : विविध पदासाठी जाहिरात (मूळ जाहिरात पहा)
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि वेगवेगळ्या पदांनुसार देण्यात आलेली आहे.(मूळ जाहिरात वाचा)

◾पदांचा तपशील

पद क्रं. पदाचे नाव पद संख्या
1. भुलतज्ञ 02
2. बालरोग तज्ञ 01
3. सर्जन 01
4. पॅथॉलॉजिस्ट 01
5. रेडिओलॉजिस्ट 01
6. डेंटिस्ट 01
7. फिजिशियन 01
8. प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ 01
9. नेत्ररोगतज्ज्ञ 01
10. त्वचारोगतज्ज्ञ 01
11. पुर्णवेळ वैदयकीय अधिकारी NUHM 07
12. पुर्णवेळ वैदयकीय अधिकारी UHWC 04
13. अर्धवेळ वैदयकीय अधिकारी 04
14. पब्लिक हेल्थ मॅनेजर 02
15. शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक 01
16. कार्यक्रम सहाय्यक 01
17 स्टाफ नर्स UHWC 12
18. स्टाफ नर्स UPHC/UCHC 12
19. आरोग्य सेविका (ए.एन.एम.) 02
20. पुरुष बहुउददेशिय कर्मचारी (Male MPW) 21
21. फार्मासिस्ट 02
22. लॅब टेक्निशियन 02
23. X-ray टेक्निशियन 01
TOTAL 082
  • भरती विभाग : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती
  • मासिक वेतन : दरमहा 17,000 ते 75,000 रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
    नोकरीचे ठिकाण : सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात (महाराष्ट्र)

◾महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू तारीख 12 सप्टेंबर 2025 रोजी
अर्जाची अंतिम तारीख 03 ऑक्टोंबर 2025 सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत.

[ अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही  सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

◾अर्ज शुल्क (Fee)

अराखीव प्रवर्गासाठी रुपये 150/-
राखीव प्रवर्गासाठी रुपये 100/-
  • वयोमर्यादा (Age Limit) : वैद्यकीय अधिकारी पदाकरिता किमान वय 70 वर्ष व इतर पदांकरिता कमाल वयोमर्यादा 38 वर्षे व राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी कमाल 43 वर्षे देण्यात आलेली आहे.
  • निवड प्रक्रिया (Selection Process)
    निवड पद्धती हि शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळालेल्या गुणवत्तेच्या आधारे गुणांक पद्धती नुसार करण्यात येणार आहे. [ कोणत्या प्रकारची लेखी परीक्षा किंवा मुलाखत नाही.]

अर्ज सादर करण्याचा ठिकाण : वैदयकीय आरोग्य अधिकारी, आरसीएच कार्यालय, पाण्याच्या टाकीखाली, आपटा पोलीस चौकी शेजारी, उत्तर शिवाजी नगर, सांगली-416416

अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक : 03 ऑक्टोंबर 2025  सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत

◾महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अर्ज नमुना येथे क्लिक करा
जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा

NHM Sangli Miraj Mahanagarpalika Bharti 2025

⚠️उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना

  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील दिलेल्या पत्त्यावरती दिनांक 3 ऑक्टोंबर 2025 च्या आत आलेले अर्ज ग्राह्य धरले जातील.
  2. ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी व मोबाईल नंबर वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरतीप्रक्रिया स्थगीत करणे, रद्द करणे, पदभरती प्रक्रियेत बदल करणे, पदांच्या संख्येत बदल करण्याचे सर्व अधिकार मा.आयुक्त, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांच्या स्तरावर राखून ठेवण्यात आले आहेत. याबाबत कोणालाही कोणताही दावा करता येणार नाही.
  5. सदर पदे राज्य शासनाची नियमित पदे नसुन निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत. सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही तसेच या पदांसाठी शासनाचे सेवा नियम लागु नाही. तसेच अर्जदाराला शासकीय सेवेत सामावुन घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही.(NHM Sangli Miraj Mahanagarpalika Bharti 2025)
  6. पदभरती प्रक्रियेकरिता प्रत्येक अर्जाकरिता अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता ₹150/- (अक्षरी रक्कम रु. एकशे पन्नास फक्त) व राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹100/- (अक्षरी रक्कम रु. शंभर रुपये फक्त) चा धनाकर्ष (Demand Draft) जोडणे आवश्यक आहे.
  7. राष्ट्रीय आरोग्य अभियान मधुन कोणत्याही संस्थास्तरावरुन एखादया कर्मचा-यांच्या अकार्यक्षमता/अनियमितेच्या कारणामुळे सेवा समाप्त करण्यात आल्या असतील तर त्या कर्मचा-यास या पुढे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कोणत्याही पदाकरिता विचार केला जाणार नाही.
  8. अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा व अर्जदारा विरुध्द कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झाला नसावा.
  9. शासकीय, निमशासकीय, खाजगी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असणा-या संबंधित अनुभवाचाच विचार निवड प्रक्रियेत करण्यात येईल. ज्या पदाकरिता अर्ज केला आहे त्याच पदाचा असलेला अनुभव ग्राहय धरण्यात येईल.
  10. वरिल पदे ही कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधन तत्वानुसार भरण्यात येणार असून सदरील नियुक्ती आदेश हे निर्गमित केलेल्या तारखेपासुन ते 11 महिने 29 दिवस पर्यंतच्या कालावधीकरिता भरण्यात येणार आहेत. पुढील पुनर्नियुक्ती आपल्या कामगिरी मुल्यांकनावर आधरित असेल.
  11. सदर जाहिरातीस अनुसरुन ज्या उमेदवारांचे अर्ज विहित मुदतीत प्राप्त होतील केवळ अशाच उमेदवरांचे अर्ज विचारात घेतले जातील. अन्य कोणत्याही संदर्भातील यापूर्वी या कार्यालयास प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही
  12. केंद्र शासनाने संबंधित पदे नामंजुर केल्यास उमेदवाराची सेवा कोणतीही पुर्व सुचना न देता तात्काळ समाप्त करण्यात येईल.
  13. उमेदवारांनी अर्ज करित असलेल्या पदाचे नाव व स्वतःच्या जातीचा प्रवर्ग अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करावा. जर एकापेक्षा अधिक पदांकरिता अर्ज करावयाचा असल्यास उमेदवारांनी प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र अर्ज सादर करावेत.
  14. तसेच ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्याच पदासाठी अर्ज ग्राहय धरला जाईल. तसेच कार्यक्रमाचे नाव स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे.
  15. मेदवारांनी अर्ज करीत असलेल्या पदाचे नांव व सामाजिक आरक्षणानुसार सदर पदाकरीता नमुद प्रवर्ग (जातीचा प्रवर्ग), बँकेचे नाव व डिमांड ड्राफ्ट क्रमांक अर्जामध्ये स्पष्टपणे नमुद करावा.
  16. अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचा सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचुक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहतील याची दक्षता घ्यावी.
  17. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

NHM Sangli Miraj Mahanagarpalika Bharti 2025

हि जाहिरात पण पहा 👇
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | NHM Alibag Bharti 2025 

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

1 thought on “सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | NHM Sangli Miraj Mahanagarpalika Bharti 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo