Reserve Bank of India Requirement 2025:बँकांची बँक म्हणून ओळखली जाणारी रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) ने नुकतीच RBI ग्रेड- B २०२५ भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये जवळपास एकूण 120 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. बँकिंग क्षेत्रातील करिअर हे केवळ नोकरी नाही तर ती प्रतिष्ठेची आणि सुरक्षतेची बाब असल्याने, ही भरती मोहीम सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग उद्योगात स्थिर आणि फायदेशीर कारकीर्द मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 31 सप्टेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!
Reserve Bank of India Requirement 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 0120
- पदाचे नाव : ऑफिसर ग्रेड B (DR) – General, DEPR, and DSIM Cadres
- शैक्षणिक पात्रता : किमान 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
◾पदांचा तपशील
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | Officers in Grade ‘B’ (DR) – General Cadre | 083 |
| 2. | Officers in Grade ‘B’ (DR) – DEPR Cadre | 017 |
| 3. | Officers in Grade ‘B’ (DR) – DSIM Cadre | 020 |
| TOTAL | 0120 |
- भरती विभाग : रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- भरती श्रेणी : ग्रुप- B पदाकरिता भरती मोहीम राबविण्यात येत आहे.
- नोकरीचा प्रकार : कायमस्वरूप बँकिंग क्षेत्रात नोकरी
- नोकरीचे ठिकाण : रिझर्व बँक ऑफ इंडिया भारतातील विविध शाखांमध्ये
◾महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाइन अर्ज सुरू | 10 सप्टेंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 30 सप्टेंबर 2025 पर्यंत संध्याकाळी 6:00 पर्यंत |
| ऑनलाइन परीक्षा- I (जनरल) | 18 ऑक्टोंबर 2025 पर्यंत |
| ऑनलाइन परीक्षा-II (जनरल) | 06 डिसेंबर 2025 |
| ऑनलाइन परीक्षा-I (DEPR & DSIM) | 19 ऑक्टोबर 2025 |
| ऑनलाईन/लेखी परीक्षा-II (DEPR & DSIM) | 07 डिसेंबर 2025 |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
◾अर्ज शुल्क (Fee)
| श्रेणी | शुल्क |
| General/OBC/EWS | 850 + GST 18% /- रुपये |
| SC/ST/PwBD | 100 + GST 18% /- रुपये |
मासिक वेतन (Salary ) : दरमहा 1,50,374 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
वयोमर्यादा (Age Limit) : 01 सप्टेंबर 2025 रोजी, 21 ते 30 वर्षा दरम्यान असावे.
◾निवड प्रक्रिया (Selection Process)
| पहिला टप्पा | पूर्व परीक्षा |
| दुसरा टप्पा | मुख्य परीक्षा |
| तिसरा टप्पा | मुलाखत (Interview) |
| चौथा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 सप्टेंबर 2025 पर्यंत.
◾ऑनलाईन अर्ज कसा करावा
- आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- “Opportunities@RBI” विभागात जा आणि “Current Vacancies” वर क्लिक करा.
- “Direct Recruitment for the post of Officers in Grade ‘B’ (Direct Recruit-DR)” साठी लिंक शोधा आणि “Online Application Form” वर क्लिक करा.
- प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळविण्यासाठी तुमची मूलभूत माहिती देऊन नोंदणी करा.
- लॉग इन करा आणि सर्व आवश्यक तपशीलांसह अर्ज फॉर्म भरा.
- तुमचा स्कॅन केलेला फोटो, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणापत्र अपलोड करा.
- डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग वापरून ऑनलाइन अर्ज शुल्क भरा.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी तुमचा अर्ज काळजीपूर्वक तपासा.
- यशस्वी सबमिशननंतर, अर्ज फॉर्मचा प्रिंटआउट आणि तुमच्या रेकॉर्डसाठी ई-पावती घ्या.
◾महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
Reserve Bank of India Requirement 2025
⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मनात घेतली जाणार नाही.
- बँकेने स्थापन केलेली शॉर्टलिस्टिंग समिती शॉर्टलिस्टिंग पॅरामीटर्स ठरवेल आणि त्यानंतर, बँकेने ठरवल्याप्रमाणे पुरेशा संख्येने उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
- मुलाखतीसाठी उमेदवारांना बोलावण्याचा बँकेचा निर्णय अंतिम असेल. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवारांच्या भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही उमेदवाराची उमेदवारी नाकारण्याचा अधिकार बँकेकडे राखून ठेवला आहे, जर अपात्र असल्याचे आढळले किंवा चुकीची माहिती/प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर केली किंवा कोणतीही ‘भौतिक तथ्ये’ लपवली असतील, आणि अपात्र उमेदवारांनी भरलेले शुल्क जप्त केले जाईल.(Reserve Bank of India Requirement 2025)
- जाहिरात केलेल्या रिक्त पदांची संख्या तात्पुरती आहे आणि बँकेच्या ‘वास्तविक आवश्यकतांनुसार, योग्य उमेदवाराच्या उपलब्धतेनुसार’ बदलू शकते.
- बँकेच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांची योग्यता आणि अनुभव यावर आधारित बँक त्यांची पात्रता विचारात घेईल. केवळ किमान पात्रता आणि अनुभव पूर्ण केल्याने मुलाखतीसाठी बोलावण्याचा उमेदवाराला कोणताही अधिकार राहणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
हि जाहिरात पण पहा 👇
📢 खुशखबर टप्पा दुसरा | बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध | Bank Of Maharashtra Bharti 202
हि जाहिरात तुमचे नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा
1 thought on “रिझर्व बँक ऑफ इंडिया नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | Reserve Bank of India Requirement 2025”