State Bank Of India Admit Card 2025:स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) क्लर्क भरती 2025 भरती प्रक्रिया जाहीर केली होती ज्यामध्ये विविध पदांसाठी 6579 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती या जाहिरातीचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने दिनांक 06 ऑगस्ट 2025 ते 26 ऑगस्ट 2025 या कालावधीत मागविण्यात आले होते. बऱ्याच प्रतीक्षा नंतर आज अखेर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) क्लर्क भरती पूर्व परीक्षेची अधिकृत घोषणा केलेली आहे. सदर भरती प्रक्रियेसाठीची ऑनलाईन परिक्षा दि.20 सप्टेंबर 2025 ते 27 सप्टेंबर 2025 या कालावधीत घेण्याचे आयोजित केले आहे. ऑनलाईन परिक्षांचे वेळापत्रक, परिक्षाकेंद्र व प्रवेशपत्र & (Hall Ticket) इत्यादीबांबत सविस्तर माहिती SBI च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
State Bank Of India Admit Card 2025
- परीक्षा पद्धत : ऑनलाइन लेखी परीक्षा (CBT) पद्धती द्वारे
- परीक्षेचे स्वरूप : परीक्षा पद्धती तीन शिफ्ट मध्ये घेतली जाणार आहे.
- एकूण पदसंख्या : 6579 रिक्त पदे
- पदाचे नाव : लिपिक (मूळ जाहिरात PDF स्वरूपात पहा)
♦️महत्त्वाच्या तारखा
- जाहिरात प्रसिद्ध दिनांक : 06 ऑगस्ट 2025 रोजी
- ऑनलाइन अर्ज सुरूः 06 ऑगस्ट 2025 पासून
- अर्जाची शेवटची तारीखः 26 ऑगस्ट 2025 पर्यंत संध्याकाळी 5:00 पर्यंत
- शुल्क भरण्याची शेवटची तारीख : 26 ऑगस्ट 2025 पर्यंत
- हॉल तिकीट उपलब्ध : 02 सप्टेंबर 2025 पासून
- पूर्व परीक्षेची तारीख : 20, 21 ते 27 सप्टेंबर 2025 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने परीक्षा पार पडणार आहे
- मुख्य परीक्षेची तारीख : 15 आणि 16 नोव्हेंबर 2025 (अपेक्षित)
- मुख्य परीक्षेचा प्रवेशपत्र तारीख : नोव्हेंबर 2025
- भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India)अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात गट क प्रकारची नोकरी मिळविण्याची संधी.
- भरती प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरी
♦️निवड प्रक्रिया (Selection Process)
- पहिला टप्पा : पूर्व लेखी परीक्षा.
- दुसरा टप्पा : मुख्य लेखी परीक्षा.
- तिसरा टप्पा : स्थानिक भाषा चाचणी.
- चौथा टप्पा : कागदपत्र पडताळणी.
- पाचवा टप्पा : वैद्यकीय तपासणी.
State Bank Of India Admit Card 2025
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| प्रवेश पत्र डाउनलोड | येथे क्लिक करा |
| जाहिरात pdf पहा | येथे क्लिक करा |
(अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची माहिती ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
♦️पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम
| Sections | Questions | Marks | Duration |
| English Language | 30 | 30 | 20 minutes |
| Numerical Ability | 35 | 35 | 20 minutes |
| Reasoning | 35 | 35 | 20 minutes |
| TOTAL | 100 | 100 | 60 Minutes (1 Hour) |
♦️मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम
| Sections | Questions | Marks | Duration |
| General English | 40 | 40 | 35 Minutes |
| Quantitative Aptitude | 50 | 50 | 45 Minutes |
| Reasoning Ability and Computer Aptitude | 50 | 60 | 45 Minutes |
| General/Financial Awareness | 50 | 50 | 35 Minutes |
| TOTAL | 190 | 200 | 2 Hours 40 Minutes |
State Bank Of India Admit Card 2025
♦️परीक्षेसाठी उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना
- परीक्षेसाठी प्रवेशपत्र (Hall Ticket) आवश्यक आहे: उमेदवारांनी परीक्षेसाठी प्रवेशपत्र अनिवार्यरित्या सोबत ठेवावे अधिकृत वेबसाइटवरून ते वेळेत डाउनलोड करून प्रिंट काढा.
- परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी प्रवेश मिळवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा अन्य वैध ओळखपत्र यापैकी मूळ ओळखपत्र परीक्षेसाठी घेऊन जाणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी परीक्षा केंद्रावरती परीक्षेच्या वेळेच्या आधी किमान 30 मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. उशिरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षेस बसू दिले जाणार नाही.
- उमेदवारांनी परीक्षेला जातेवेळी सोबत मोबाईल, स्मार्टवॉच, ब्लूटूथ डिव्हाईस, कॅल्क्युलेटर किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स परीक्षा केंद्रात नेण्यास सक्त मनाई आहे.
- सरकारच्या नियमांनुसार परीक्षा केंद्रात साधा आणि औपचारिक पोशाख परिधान करावा. जसेकी मेटल बटण नसलेले कपडे, साधी चप्पल किंवा सॅंडल इत्यादी.
- परीक्षेच्या सूचनांचे पालन करा प्रश्नपत्रिका पूर्ण वाचून उत्तर द्या. गैरवर्तन किंवा अनुचित वर्तन केल्यास परीक्षेतून अपात्र ठरवले जाईल.
- अधिक माहितीसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया SBI च्या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या.
State Bank Of India Admit Card 2025
♦️प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची पद्धत
- स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- लॉग इन करा– ‘Recruitment’ किंवा ‘Advertisement’ विभागात गेल्यानंतर अर्ज करताना तुम्ही जो तयार केलेला युझर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
- हॉल तिकीट शोधा– लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला ‘Download Hall Ticket’ किंवा ‘Admit Card’ यासारखा पर्याय दिसेल, त्यावर ते क्लिक करा.
- डाउनलोड करा– तुमचे हॉल तिकीट तयार झाले असल्यास, तुम्ही ते डाउनलोड करून प्रिंट करू शकता.
State Bank Of India Admit Card 2025
हि पण जाहिरात पहा
आसाम रायफल्सच्या महासंचालक कार्यालय अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध | Assam Rifle Requirement 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा