आसाम रायफल्सच्या महासंचालक कार्यालय अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध | Assam Rifle Requirement 2025

Assam Rifle Requirement 2025:क्रीडा क्षेत्रातून करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आसाम रायफल्सच्या महासंचालक कार्यालयाने क्रीडा कोट्या अंतर्गत रायफलमन/रायफलवुमन (जनरल ड्युटी) पदभरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, या अंतर्गत जवळपास 69 रिक्त पदासाठी भरती मोहीम राबवण्यात येत आहे. ही फक्त नोकरी नाही तर तुमची खेळाडू वृत्तीची आवड जोपासत आसाम रायफलमध्ये सुरक्षित आणि स्थिर करिअर घडवण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे.(Assam Rifle Requirement 2025)भारतातील सर्वात जुन्या आणि सर्वात प्रतिष्ठित निमलष्करी दलांपैकी एकाचा भाग बनण्याचे तुमचं स्वप्न या भरतीद्वारे पूर्ण होणार आहे. या भरतीमध्ये तुम्हाला आकर्षक पगार आणि असंख्य भत्ते, मिळणार आहेत. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी  मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Assam Rifle Requirement 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : 069
  • पदाचे नाव : रायफलमन/रायफलवुमन (जनरल ड्युटी)

📃पदांचा तपशील

अ. क्रं. खेळ पुरुष पदे महिला पदे
1. Boxing 03 03
2. Football 05 04
3. Shooting (Sports) 02 02
4. Taekwondo 04 04
5. Karate 04 06
6. Sepaktakraw 02 00
7. Fencing 01 04
8. Badminton 02 02
9. Pencak Silat 03 07
10 Athletics 04 07
TOTAL 30 39

▪️शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️क्रीडा पात्रता: उमेदवारांनी खालीलपैकी कोणत्याही स्पर्धेत भाग घेतलेला असणे आवश्यक आहे:

  • आंतरराष्ट्रीय स्पर्धा
  • राष्ट्रीय स्पर्धा
  • आंतर-विद्यापीठ स्पर्धा
  • शाळांसाठी राष्ट्रीय क्रीडा/खेळ
  • खेलो इंडिया विद्यापीठ खेळ
  • खेलो इंडिया युवा खेळ
  • खेलो इंडिया हिवाळी खेळ

🗓️महत्त्वाच्या तारखा

  1. ऑनलाइन अर्ज सुरूः  15 ऑगस्ट 2025 पासून
  2. अर्जाची शेवटची तारीखः  15 सप्टेंबर 2025 पर्यंत रात्री 23:59 पर्यंत
  3. ऑनलाइन अर्ज शुल्क: 15 सप्टेंबर 2025 पर्यंत.
  4. भरती मेळावा: ऑक्टोंबर/डिसेंबर 2025
  • भरती विभाग : आसाम रायफल्सच्या महासंचालक कार्यालय अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
  • नोकरीचा प्रकार :  आसाम रायफल मध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकरी
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)

(अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही आसाम रायफल्सच्या महासंचालक कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

  • अर्ज शुल्क (Fee) : General / OBC : 100/- रुपये ]
    SC / ST / Female : अर्ज शुल्क नाही ]
  • मासिक वेतन (Salary) : मासिक वेतन 21,700 ते 69,100/- रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 01 ऑगस्ट 2025 रोजी
    सर्वसाधारण उमेदवारांचे वय 18 वर्षे ते 28 वर्ष दरम्यान असावे.
    [ SC/ST : उमेदवारांना वयात 5 वर्ष सूट असणार आहे.]

📝निवड प्रक्रिया (Selection Process)

  • पहिला टप्पा : प्रारंभिक कागदपत्रे आणि शारीरिक मानक चाचणी (PST)
  • दुसरा टप्पा : फील्ड ट्रायल आणि मोटर क्षमता चाचणी (MAT)
  • तिसरा टप्पा : सविस्तर वैद्यकीय तपासणी (DME) आणि पुनरावलोकन

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 सप्टेंबर 2025 पर्यंत.

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 

Assam Rifle Requirement 2025

💻ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

  1. आसाम रायफल्सच्या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या.
  2. होमपेजवर, गेल्या नंतर “ऑनलाईन अर्ज” लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  3. अर्ज फॉर्म नोंदणी करून वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि क्रीडा कामगिरीसह सर्व आवश्यक तपशील अचूकपणे भरा.
  4. तुमच्या छायाचित्राच्या, स्वाक्षरीच्या आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
  5. ऑनलाईन पेमेंट विभागात जा. तुम्ही अर्ज शुल्क ऑनलाईन किंवा एसबीआय बँकेच्या चलनातून भरू शकता.
  6. पेमेंट पावती/चलनाची प्रत अपलोड करा.
  7. सर्व तपशील बरोबर आहेत याची खात्री करण्यासाठी तुमचा अर्ज फॉर्म काळजीपूर्वक तपासा.
  8. अंतिम अर्ज फॉर्म सबमिट करा आणि तुमच्या नोंदींसाठी प्रिंटआउट घ्या, हे प्रिंटआउट रॅलीच्या ठिकाणी आवश्यक असेल.

Assam Rifle Requirement 2025

📌उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये  आसाम रायफल कर्यालाचा (Assam Rifle Requirement 2025)निर्णय अंतिम असेल.
  • अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
    कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • जर अर्जदार पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी

हि पण जाहिरात पहा👇
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये 10 पात्र उमेदवारांसाठी भरती 2025 | Mahavitaran Bharti 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

4 thoughts on “आसाम रायफल्सच्या महासंचालक कार्यालय अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध | Assam Rifle Requirement 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo