थेट मुलाखत | जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 | Jalgaon DCC Banks Bharti 2025

Jalgaon DCC Banks Bharti 2025:बँकिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत नवीन कंत्राटी पद्धतीने पदभरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे,  यामध्ये सुरक्षित आणि स्थिर करिअर घडवण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. या भरतीमध्ये तुम्हाला आकर्षक पगार आणि असंख्य भत्ते, मिळणार आहेत. या जाहिराती मध्ये एकूण 125 रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत घोषणा केलेली आहे, तसेच  ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 12 सप्टेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे.(Jalgaon DCC Banks Bharti 2025) सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी  मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Jalgaon DCC Banks Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : 126
  • पदाचे नाव : लिपिक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : कला शाखेतील पदवी (बी.ए. एमए.) आणि पदव्युत्तर पदवीधर उमेदवार वगळता, उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे अनिवार्य आहे आणि उमेदवाराने पदवी परीक्षा किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, MS CIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (मूळ जाहिरात वाचा)

🗓️महत्त्वाच्या तारखा 

  1. ऑनलाइन अर्ज सुरू : 05 सप्टेंबर 2025 पासून
  2. अर्जाची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2025 पर्यंत सायंकाळी 5:00 पर्यंत
  • भरती विभाग : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण :  जळगांव (महाराष्ट्र)

[ अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

  • अर्ज शुल्क (Fee) : अर्ज शुल्क नाही.
  • वयोमर्यादा (Age Limit) :  05 ऑगस्ट 2025 रोजी
    पात्रता धारक उमेदवारांचे किमान वय 21 वर्षे व कमाल वयोमर्यादा 35 वर्षे देण्यात आलेली आहे.

[ महत्वाचे : कोणत्याही श्रेणीसाठी वरच्या किंवा खालच्या वयोमर्यादेत कोणतीही सूट देण्यात आलेली नाही.]

📝निवड प्रक्रिया (Selection Process)

  • पहिला टप्पा : मुलाखत (Interview)
  • दुसरा टप्पा : कागदपत्र पडताळणी

अर्ज सादर करण्याचा पत्ताजळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, 27, रिंग रोड, जळगाव, 425001, महाराष्ट्र

📮ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 12 सप्टेंबर 2025 सायंकाळी 5:00 पर्यंत

अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 

Jalgaon DCC Banks Bharti 2025

⚠️उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना

  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. उमेदवारांनी A4 आकाराच्या कोऱ्या कागदावर अर्ज करावा त्यावर जन्म तारीख, संपूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक, शैक्षणिक अर्हतेचा संपूर्ण तपशील, कामाचा अनुभव, आधार कार्ड व इतर अनुषंगीक माहितीसह अर्ज दिनांक 12 सप्टेंबर 2025 पावेतो बैंकेचे मुख्य कार्यालय 27, रिंगरोड, जळगाव येथील प्रशासन व व्यवस्थापन विभागात कार्यालयीन वेळेत सादर करावे.
  4. अर्ज सादर करणाऱ्या पात्र उमेदवारांना प्रत्यक्ष तौडी मुलाखतीसाठी त्यांनी अर्जात नमुद केलेल्या भ्रमणध्वनीवर एसएमएस (SMS) व्दारे मुलाखतीचे स्थळ व दिनांक अलाहिदा कळविण्यात येईल. मुलाखतीचे वेळी मुळ (Original) कागदपत्र व त्यांचे झेरॉक्स प्रतीसह स्वखर्चाने उपस्थित रहावयाचे आहे.
  5. निवड झालेल्या उमेदवारास बँकेच्या कोणत्याही शाखेवर नेमणूक देण्यात येईल.
  6. पदसंख्या, निवड प्रक्रिया संबंधीचे, निवड पद्धत इत्यादी बाबतचे सर्व अधिकार बैंकेकडे राखीव असतील.(Jalgaon DCC Banks Bharti 2025)
  7. सदरची पदे पूर्णत तात्पुरत्या स्वरुपाची (कंत्राटी स्वरुपाची) असून, मुदतीनंतर उमेदवारांचा नेमणुकीच्या पदावर कोणत्याही प्रकारचा हक्क राहाणार नाही.
  8. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  9. भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर जर असे आढळून आले की उमेदवार पात्रता निकषांची पूर्तता करत नाही आणि/किंवा त्याने कोणतीही चुकीची/खोटी माहिती/प्रमाणपत्र/कागदपत्रे सादर केली आहेत किंवा कोणतीही महत्त्वाची वस्तुस्थिती लपवली आहे, तर त्याची/तिची उमेदवारी रद्द केली जाईल. बँकेत सामील झाल्यानंतरही, कोणत्याही वेळी अशी कोणतीही विसंगती किंवा कमतरता आढळल्यास, त्याच्या/तिच्या सेवा रद्द केल्या जाऊ शकतात..
  10. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये बँकेकडे  निर्णय अंतिम असेल.
  11. उमेदवारांच्या पात्रतेबाबत, पात्रतेची अशी छाननी कोणत्या टप्प्यात करायची आहे, मुलाखत, निवड आणि भरतीशी संबंधित इतर कोणत्याही बाबींसाठी बँकेचा निर्णय अंतिम आणि उमेदवारावर बंधनकारक असेल. या संदर्भात वैयक्तिक चौकशीसाठी बँकेकडून कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
  12. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  13. आवश्यक असल्यास, निवड प्रक्रियेत बदल करण्याचा/थांबवण्याचा/बदल करण्याचा अधिकार बँकेकडे राखून आहे. जर काही बदल झाले तर, उमेदवारांना कळवले जातील.
  14. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

Jalgaon DCC Banks Bharti 2025

हि जाहिरात पण पहा 👇
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जाहिरात प्रसिद्ध 2025|Shindhudurg DCC Bank Bharti 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

1 thought on “थेट मुलाखत | जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 | Jalgaon DCC Banks Bharti 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo