Arogya Vibhag Bharti Thane 2025:सार्वजनिक आरोग्य विभाग ठाणे महानगरपालिका ठाणे जाहिरात विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील मेट्रोपॉलिटन सव्हेलन्स युनिट (MSL) अंतर्गत उमेदवाराकडून करपद्धतीने करायची असून त्याकरिता पात्रता उमेदवारांकडे ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.(Arogya Vibhag Bharti Thane 2025) अर्जदारानी जाहिरातीत पदापुढे नमूद केलेली शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी.
Arogya Vibhag Bharti Thane 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 023 पदे
- पदाचे नाव : विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.(मूळ जाहिरात pdf स्वरूपात वाचावी.)
- शैक्षणिक पात्रता: पदाच्या पात्रतेनुसार शैक्षणिक पात्रता मागविण्यात आली आहे.(मूळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आलेली आहे ती वाचा.)
मुलाखतीचे ठिकाण: ठाणे महानगरपालिका, मुख्यालय, ४ था मजला, आरोग्य विभाग, ठाणे.
पदांचा तपशील:
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | सीनियर पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट | 01 |
| 2. | पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट IDSP | 01 |
| 3. | असिस्टंट पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट | 02 |
| 4. | मायक्रो बायोलॉजिस्ट | 01 |
| 5. | एंटोमोलोजिस्ट | 02 |
| 6. | व्हेटर्नरी ऑफिसर | 01 |
| 7. | फूड सेफ्टी एक्सपर्ट | 01 |
| 8. | एडमिन ऑफिसर | 01 |
| 9. | टेक्निकल ऑफिसर (फायनान्स) | 01 |
| 10. | रिसर्च असिस्टंट | 02 |
| 11. | टेक्निकल असिस्टंट | 02 |
| 12. | मल्टीपर्पस असिस्टंट | 02 |
| 13. | ट्रेनिंग मॅनेजर | 01 |
| 14. | टेक्निकल ऑफिसर (IT) | 02 |
| 15. | डाटा एनॅलिस्ट | 01 |
| 16. | डाटा मॅनेजर | 01 |
| 17. | कम्युनिकेशन स्पेशलिस्ट | 01 |
| TOTAL | 023 |
- भरती विभाग : सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका ठाणे अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- भरती प्रकार : कंत्राटी पद्धतीवरती भरती प्रक्रिया
- भरती श्रेणी : गट -अ, ब, क, श्रेणीतील पदभरती
(अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही सार्वजानिक आरोग्य विभाग महानगरपालिका थानेच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
Arogya Vibhag Bharti Thane 2025
- अर्ज शुल्क (Fee) : अर्ज शुल्क माफ राहील
- वेतन (Salary ) : दरमहा 25,000 ते 1,50,000 रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
- नोकरीचे ठिकाण : ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्र ठाणे (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया (Selection Process)
- पहिला टप्पा : मुलाखत (Interview)
- दुसरा टप्पा : कागदपत्र पडताळणी Document Verification)
अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रांचा तपशील
- पासपोर्ट साईज फोटो,
- जन्म तारखेकरिता (वयाचा दाखला / दहावीचा टीसी / जन्म प्रमाणपत्र)
- फोटो आयडी / रहिवाशी दाखला
- शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र :-
अ) शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका, ब) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, क) अतिरिक्त शैक्षणिक अर्हतेची MMC नोंदणी प्रमाणपत्र, ड) नोंदणी नूतनीकरण प्रमाणपत्र ई) अनुभव प्रमाणपत्र या अनुषंगाने इतर आवश्यक सत्य प्रती व साक्षांकित प्रती.
अर्ज व मुलाखती साठी अंतिम तारीख : दिनांक 11 सप्टेंबर 2025 ते 12 सप्टेंबर 2025 रोजी ठाणे महानगरपालिका मुख्यालय, 4 था मजला, आरोग्य विभाग, ठाणे येथे दिलेल्या वेळेत जमा करावेत
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| जाहिरात pdf पहा | येथे क्लिक करा |
| अर्ज नमुना | येथे क्लिक करा |
Arogya Vibhag Bharti Thane 2025
उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना
- सदरील पदे कंत्राटी पध्दतीने राहतील, त्याचा ठाणे महानगरपालिका आस्थापनेशी कसल्याही प्रकारचा संबंध राहणार नाही. तसेच सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन, यांनी दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी पारित केलेल्या शासन निर्णय अन्वये लोकसेवा आयोगाच्या कक्षातील पदावर तात्पुरत्या/आस्थायी स्वरुपात नियुक्त केलेला कोणताही कर्मचारी त्या पदावर कितीही वर्ष सेवेत राहिला तरी कायम करण्याचा हक्क सांगू शकत नाही.
- एकूण पदांच्या संख्येमध्ये बदल होऊ शकतो.
- सदरील पदे ६ महिने (१७९ दिवस) कालावधीसाठी भरायचे असून त्यानंतर १ दिवसाचा तांत्रीक खंड देऊन कंत्राट पुन्हा नुतणीकरन करण्यात येईल.
- अनुभव शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा खाजगी अंतर्गत अनुभव ग्राह्य धरण्यात येईल.
- उमेदवारांनी कुठल्याही प्रकारच्या राजकीय दबाव आणल्यास त्यांना नियुक्तीस अपात्र ठरविण्यात येईल.
- निवड / नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्यावर, कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार मा. महापालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका यांनी राखून ठेवले आहेत.
- अनुभवी व उच्च शैक्षणिक अर्हता धारकास प्राधान्य दिले जाईल. परंतु अंतिम निर्णय प्रशासन घेईल.
- अंतिम निवड यादीतील उमेदवारांना मेट्रोपोलिटन सर्वेलन्स युनिट कार्यालयांतर्गत काम करणे बंधनकारक राहिल. अन्यत्र विभागामध्ये कामासाठी नियुक्त करणेकामी उमेदवाराने कोणत्याही दबावतंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल.(Arogya Vibhag Bharti Thane 2025)
- उपरोक्त पदांकरिता निवड प्रक्रिया ही प्राप्त अर्जाच्या संख्येनुसार छाननी करुन गुणानुक्रमे यादी तयार करण्यात येवून गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. निवड समितीचा निर्णय अंतिम राहील.
- अर्जदाराला कंत्राटी कालावधीमध्ये सोयीनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही.
- सदर भरतीची प्रक्रिया पूर्ण झालेनंतर भविष्यात एखाद्या ठिकाणी कर्मचारी यांनी राजीनामा दिलेमुळे जागा रिक्त झालेस प्रतीक्षा यादीतील मेरीटमधील पुढील उमेदवारास नविन भरती प्रक्रिया न करता नियुक्ती आदेश दिले जातील.
- सदर अंतिम यादी ही तयार झालेनंतर पुढील १ वर्षासाठी वैध राहील.
- उमेदवाराची निवड झाल्यास त्याला रु ५००/- च्या बाँड पेपरवर करार सादर करावा लागेल.
- उमेदवाराला लागू निश्चित मोबदला वगळता इतर कोण्तयाही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.
- करार ६ महिन्यांचा विशिष्ट कालावधीसाठी आहे आणि उमेदवाराच्या कामगिरीच्या आधारावर पदाचे नूतनीकरण केले जाईल.
- कराराच्या कालावधीत कंत्राटी उमेदवारांचे असमाधानकाक असल्यास, अशा उमेदवारांची कंत्राटी तत्वावरील नियुक्ती कोणतीही पूर्वसूचना न देता समाप्त केली जाईल.
- कराराच्या कालावधीत निवडलेल्या अमेदवाराना ठाणे महानगरपालिकेचे कोणतेही प्रशासकीय किंवा आर्थिक अधिकार दिले जाणार नाहीत.
- पत्र व्यवहाराचा पत्ता स्पष्ट आणि पूर्ण असावा.
- उमेदवारांनी त्यांच्या स्वखर्चाने निवडीच्या ठिकाणी उपस्थित असणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी चुकीची माहिती/प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर केल्याचे आढळल्यास किंवा निवड प्रक्रिया किंवा नियुक्ती सुरु झाल्यानंतर कोणत्याही वेळी कोणतीही रोखून ठेवल्याचे आढळल्यास त्यांना अपात्र ठरवले जाईल. तसेच, नियुक्ती झाल्यास, त्यांची कंत्राटी नियुक्ती कोणतीही पूर्वसूचना न देता संपुष्टात येईल.
- कंत्राटी पध्दतीने नियुक्त केलेल्या उमेदवारांच्या सेवा पूर्वसूचनेशिवाय समाप्त करण्याचा अधिकार प्रशासनाकडे आहे.
- करार कालावधीत काम करणाऱ्या उमेदवारांची सेवा तात्पुरती असल्याने त्यांची सेवा ज्येष्ठतेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही किंवा सेवेला जेष्ठतेसाठी प्राधान्य दिले जाणार नाही.
- ठाणे महानगरपालिकेने कोणत्याही व्यक्तीला किंवा इतर कोणत्याही संस्थेला अर्ज विकण्याचा किंवा स्वीकारण्याचा अधिकार दिलेला नाही याची नोंद घ्यावी.
- जर उमेदवाराने भरतीच्या कोणत्याही टप्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला किंवा अयोग्य मार्गाचा अवलंब केल्याचे आढळून आले किंवा खोटे बोलणाऱ्यांची व्यवस्था केल्याचे आढळून आहे, तर त्याला निवडीपासून अपात्र ठरवले जाईल.(Arogya Vibhag Bharti Thane 2025)
- उमेदवारांना ठाणे महानगरपालिकेसाठी मध्यस्थ असल्याची बतावणी करणाऱ्या व्यक्तीमार्फत नोकरी मिळवून देण्याच्या आश्वासनापासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
- जर उमेदवाराने विहित वेळेनंतर कोणतीही कागदपत्रे सादर केली तर ती कागदपत्रे वियारात घेतली जाणार नाहीत आणि त्याचा अर्ज अपात्र मानला जाईल.
- उमेदवारांनी त्यांच्या स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित असणे आवश्यक आहे.
हि जाहिरात पण पहा👇
IBPS RRB लिपिक भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025|IBPS Clear Recruitment 2025
हि जाहिरात तुमचे नातेवाईक/मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा