Pimpri Chinchwad Mahanagar Palika Bharti 2025:पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळेमध्ये कला शिक्षक या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे त्या अनुषंगाने पात्र उमेदवारांसाठी हि एक सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. भरती प्रक्रिया हि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या अंतर्गत केवळ कंत्राटी पद्धतीने वर्षे 2025-26 कालावधीसाठी कला हिंदी उर्दू आणि इंग्रजी शाळांमध्ये एकत्रित मानधन तत्वावर हे भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून.(Pimpri Chinchwad Mahanagar Palika Bharti 2025) या भरतीसाठी इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांना अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने मागवण्यात येणार असून त्यासाठी अंतिम दिनांक हा 12 सप्टेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेलाआहे. पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी.
Pimpri Chinchwad Mahanagar Palika Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 038
- पदाचे नाव : कला शिक्षक
- भरती विभाग : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत पदे भरण्यात येत आहेत.
पदांचा तपशील:
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01. | कला शिक्षक | 038 |
📑शैक्षणिक पात्रता: Art Teacher Diploma (ATD) Govt. Diploma (GD) Art of Fine Art Bachelor of Fine Arts (BFA) Master of Fine Arts (MFA) उमेदवारांनी संबंधित कोर्स उत्तीर्ण केलेला असावा
🗓️महत्वाच्या तारखा:
- अर्ज करण्यास सुरुवात: 29 ऑगस्ट 2025 पासून सुरू.
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख: 12 सप्टेंबर 2025 सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज सादर करायचा आहे.
📮अर्ज पाठविण्याचा पत्ता : जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील महानगरपालिका प्राथमिक शाळा, पिंपरीगाव,पिंपरी चिंचवड.
📑आवश्यक कागदपत्रे:
- उमेदवारांचे शैक्षणिक पात्रतेनुसार गुणपत्रके.
- अनुभव प्रमाणपत्र (अनुभव असल्यास)
- बायोडाटा (Resume)
📝निवड प्रक्रिया: शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या कालावधी वरती उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
- अर्ज शुल्क: शुल्क नाही
- निवड कालावधी: कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर निवड केली जाणार आहे.
- नोकरीचे ठिकाण: पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे (महाराष्ट्र)
- वेतनमान (Pay Scale) : मासिक 28,000/- रुपये पर्यंत.
ऑफलाईन पद्धतीने अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक : 12 सप्टेंबर 2025 सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत
(अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| जाहिरात pdf पहा | येथे क्लिक करा |
| अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
Pimpri Chinchwad Mahanagar Palika Bharti 2025
📌उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना:
- उमेदवारांनी आपला अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावरती ऑफलाईन पद्धतीने समक्ष पद्धतीने पोहोचवायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- अर्ज सादर करीत असतांना आवश्यक सर्व शैक्षणिक, अनुभव, जात इ. दाखले, प्रमाणपत्राच्या स्वयंसाक्षांकित सुस्पष्ठ छायांकित प्रती जोडाव्यात.
- अपूर्ण माहिती भरलेले व आवश्यक कागदपत्रे नसलेले अर्ज ग्राहय धरले जाणार नाहीत.
- उमेदवारांस मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यासाठी मराठी लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
- राखीव प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर प्रवर्गातील उमेदवारांना तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात येईल, त्यामुळे सर्व प्रवर्गातील पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत.
- सदर भरतीही केवळ कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर भरण्यात येत आहे. त्यामुळे कामाचा कालावधी संपुष्टात आल्या नंतर उमेदवारांना कोणत्याही त्यापुढे काम सुरू किंवा बंद करायचे हे सर्व निर्णय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला असतील.(Pimpri Chinchwad Mahanagar Palika Bharti 2025)
- दिलेल्या कालावधीत अर्ज न पोहोचल्यास अर्ज बाद करण्यात येतील.
- सदरची निवड ही कला शिक्षक पदासाठी केवळ तात्पुरत्या एकत्रित मानधनावर हंगामी स्वरूपाची आहे. उमेदवारास मनपा सेवेत राहण्याचा अधिकार मागता येणार नाही. सदरचे पद हे शैक्षणिक वर्ष 2025-26 या करीता व आवश्यकतेनुसार राहील.
- तसेच पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक उपलब्ध झाल्यास एकत्रित मानधनावरील नियुक्त्या रद्द करण्याचे अधिकार मा. अति. आयुक्त (1) सो. पिं.चिं.मनपा यांचा राहील.
- नियुक्तीच्या वेळी उमेदवारास रक्कम रूपये 500/- स्टॅम्प पेपरवर (नोटराईज्ड करून) मनपा सेवेत भविष्यात नोकरी बाबतचा कोणताही हक्क राहणार नाही. तसेच न्यायालयात दाद मागणार नाही. याबाबतचे हमीपत्र/करारनामा सादर करणे बंधनकारक आहे.
- सदरची जाहीरात व अर्जाचा नमुना महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेत स्थळावर पाहता येईल. (On line) जाहिरातीनुसार कार्यवाही करणे अथवा प्रक्रिया कोणत्याही स्तरावर रद्द करण्याचा अंतिम निर्णय मा. अति. आयुक्त (1) सो. पिं. चिं. मनपा यांचा राहील.
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Pimpri Chinchwad Mahanagar Palika Bharti 2025
हि जाहिरात पण पहा👇
नाशिक व ठाणे विभाग|आदिवासी विकास विभागा शासकीय आश्रम शाळा कंत्राटी शिक्षक भरती जाहिरात 2025|Government Ashram Schools Recruitment 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा
2 thoughts on “पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | Pimpri Chinchwad Mahanagar Palika Bharti 2025”