Government Ashram Schools Recruitment 2025:महाराष्ट्रातील डी.एड, बी.एड उत्तीर्ण उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग यांच्याकडून नाशिक व ठाणे विभागाअंतर्गत येणाऱ्या सरकारी आश्रम शाळामध्ये ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था लिमिटेड‘ या एजन्सी कडून कंत्राटी पद्धतीने उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम, मराठी माध्यम) या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. जवळपास 695 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. हि पदे केवळ नोकरी नाही तर ते आश्रम शाळांमध्ये शिक्षक म्हणून कामकाजाच्या केंद्रस्थानी राहण्याची कर्तुत्ववान विद्यार्थी घडवण्याची सुवर्ण संधी आहे, या भरती मध्ये तुम्हाला आकर्षक पगार पॅकेज आणि नोकरीची सुरक्षा देणारी भरती आहे. पात्रता धारक उमेदवारांसाठी चांगल्या करिअरचा मार्ग आहे. अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आलेले आहेत.
Government Ashram Schools Recruitment 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 695 पदे
- पदाचे नाव : उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम, मराठी माध्यम).
शैक्षणिक पात्रता: M.A. / M.Sc आणि B.ed किंवा B.A / B.Sc आणि B.ed किंवा बीए, 12 वी उत्तीर्ण आणि D.ed किंवा 12 वी उत्तीर्ण आणि D.ed उमेदवार या भरती साठी अर्ज सादर करू शकतात.
पदांचा तपशील:
| पद क्रं. | आश्रम शाळेचे नाव | पद संख्या |
| 1. | उच्च माध्यमिक शिक्षक (इंग्रजी-4, भौतिकशास्त्र-27, रसायनशास्त्र-2, जीवशास्त्र-1, गणित-33) | 067 |
| 2. | माध्यमिक शिक्षक (गणित-74, इंग्रजी-18 | 092 |
| 3. | पदवीधर प्राथमिक शिक्षक (सर्व-88) | 088 |
| 4. | प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम-52, मराठी माध्यम-396) | 448 |
| TOTAL | 695 |
Government Ashram Schools Recruitment 2025
पदानुसार पात्रता:
- उच्च माध्यमिक शिक्षक: एमए / एमएससी (विशेष विषय – गणित / भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र / जीवशास्त्र) आणि बी.एड (अनिवार्य)
- माध्यमिक शिक्षक: बीए / बीएससी (विशेष विषय – इंग्रजी / गणित / भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र / जीवशास्त्र) आणि बी.एड (अनिवार्य) आणि टीईटी-2 (अनिवार्य)
- पदवीधर प्राथमिक शिक्षक: बीए, एचएससी आणि डी.एड (अनिवार्य) आणि टीईटी-1 (अनिवार्य)
- प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम): एचएससी आणि डी.एड आणि टीईटी-1 / सीटीईटी (अनिवार्य) – इंग्रजी माध्यम
- प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम): एचएससी आणि डी.एड आणि टीईटी-1 / सीटीईटी (अनिवार्य) – मराठी माध्यम
महत्त्वाच्या तारखा :
1) ऑनलाइन अर्ज सुरूः 29 ऑगस्ट 25 पासून
2) अर्जाची शेवटची तारीखः 11 सप्टेंबर 2025 पर्यंत संध्याकाळी 5:00 पर्यंत
- भरती श्रेणी : वर्ग तीन दर्जाची कंत्राटी स्वरूप
- भरती विभाग : कंत्राटी शिक्षक भरती नाशिक व ठाणे विभाग (महाराष्ट्र)
- नोकरीचा प्रकार: कंत्राटी स्वरूपी सरकारी नोकरीची मिळवण्याची चांगली संधी.
- वयोमर्यादा (Age Limit): अधिकृत जाहिरात संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेले आहे (मूळ जाहिरात pdf स्वरूपात पहा)
(अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था लिमिटेड यांच्या अधिकृत संकेतस्थळा वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
Government Ashram Schools Recruitment 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 11 सप्टेंबर 2025 पर्यंत
नियम आणि अटी:
- वरील सर्व पदांसाठी पवित्र पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे.
- पदवीधर प्राथमिक शिक्षकासाठी CTET/TET-1 उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
- प्राथमिक शिक्षक (इंग्रजी / मराठी माध्यम) साठी CTET / TET-1 उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
- आदिवासी भागात शिकवण्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- अनुसूचित जमाती (ST) मधील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- स्थानिक उमेदवारांना किंवा आजूबाजूच्या परिसरातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
Government Ashram Schools Recruitment 2025
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| जाहिरात pdf पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- ऑनलाइन फॉर्म फक्त इंग्रजी भाषेत भरावा. जर दुसरी कोणतीही भाषा वापरली गेली तर तुमचा डेटा पुनर्प्राप्त करू शकणार नाही.
- कृपया तुमच्या आधार कार्ड वरील माहिती नुसार तुमची माहिती ऑनलाइन अर्ज मध्ये भरावी.
- ऑनलाइन अर्ज मध्ये अपूर्ण माहिती आढळल्यास फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.
- उमेदवारांस मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यास मराठी लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध (Valid) ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी (Mobile No.) असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेची तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणार असल्याने, भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणांमध्ये वाढ, घट अथवा बदल होण्याची शक्यता आहे.
- प्रस्तुत जाहीरातीस अनुसरुन अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता / अनुभव धारण करणे आवश्यक आहे.
- अनुभवाच्या कालावधीची गणना प्रस्तूत जाहीरातीस अनुसरुन अर्ज सादर करण्याकरीता विहित केलेल्या अंतिम दिनांकास करण्यात येईल.(Government Ashram Schools Recruitment 2025)
- भरती प्रक्रियेबाबतचे सर्व अधिकार नियुक्ती प्राधिकारी यांना असून कोणत्याही टप्प्यावर भरती स्थगित किंवा रद्द करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांचेकडे राखून ठेवले आहे.
- उमेदवाराने या भरती प्रकियेसंदर्भातील माहिती व सूचना महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनी यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द होणार असल्याने भरती प्रक्रिया पूर्ण हाईपर्यंत https://mvgcompany.in/ वरील संकेतस्थळावर उमेदवारांनी सद्यस्थिती (updates) वेळोवेळी पहावी.
- परीक्षेसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रवास खर्च देय नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील दिलेली जाहिरात pdf सविस्तर वाचवी.
हि जाहिरात पण पहा 👇
नागपूर व अमरावती विभाग आदिवासी विकास विभागा शासकीय आश्रम शाळा कंत्राटी शिक्षक भरती जाहिरात 2025 | Government Ashram Schools Bharti 2025
हि जाहिरात तुमचे नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा
3 thoughts on “नाशिक व ठाणे विभाग|आदिवासी विकास विभागा शासकीय आश्रम शाळा कंत्राटी शिक्षक भरती जाहिरात 2025|Government Ashram Schools Recruitment 2025”