खुशखबर | ठाणे वन विभाग भरती 2025 | Thane Vanvibhag Bharti 2025

Thane Vanvibhag Bharti 2025:वनविभागात करिअर घडव इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ठाणे वन्यजीव विभागा अंतर्गत एक एक नवीन संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यामध्ये तानसा वन्यजीव अभयारण्य, कर्नाळा पक्षी अभयारण्य, फणसाड वन्यजीव अभयारण्य व सुधागड वन्यजीव अभयारण्य इत्यादी 2025-26 कामाची पूर्तता करण्यासाठीया हि भरती मोहीम कंत्राटी पद्धतीने राबवण्यात येत आहे. त्या करिता इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून त्याकरिता अंतिम दिनांक 25 सप्टेंबर 2025 पर्यंत संबंधित पत्त्यावर स्वतः, ईमेल किंवा पोस्टाने सादर करण्याचे उमेदवारांना आवाहन केले आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी  मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Thane Vanvibhag Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : 014
  • पदाचे नाव : वन्यजीव जीवशास्त्रज्ञ, आर्किटेक्ट, कायदेशीर सल्लागार, ग्राफिक डिझायनर, उपजीविका तज्ञ, जलद बचाव पथक सदस्य.
  • शैक्षणिक पात्रता : 10 वी/12 वी/विज्ञान शाखेतील पदवी (मूळ जाहिरात वाचा)

पदांचा तपशील

पद क्रं. पदाचे नाव पद संख्या
1. वन्यजीव जीवशास्त्र अभ्यासक 02
2. वास्तुविशारद 01
3. विधी सल्लागार 01
4. ग्राफिक डिझायनर 01
5. निसर्ग उपजीविका तज्ञ 02
6. रॅपिड रेस्क्यू टीम मेंबर 07
TOTAL 014
  • भरती विभाग : ठाणे वन्यजीव विभागा अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती
  • मासिक वेतन : दरमहा रु. 15,000/- ते रु. 60,000/- पर्यंत (प्रवास भत्ता वगळून).
  • नोकरीचे ठिकाण :  ठाणे (महाराष्ट्र)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2025 रोजी
मुलाखतीची तारीख 30 सप्टेंबर 2025 रोजी

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही ठाणे वन्यजीव विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

वयोमर्यादा (Age Limit)
[ महत्वाचे : कोणत्याही श्रेणीसाठी वरच्या किंवा खालच्या वयोमर्यादे संदर्भात जाहिराती मध्ये उल्लेख केलेला नाही.]

निवड प्रक्रिया (Selection Process)

पहिला टप्पा मुलाखत (Interview)
दुसरा टप्पा कागदपत्र पडताळणी

अर्ज पाठवण्याचा ई-मेल : dcfwlthane@gmail.com
अर्ज सादर करण्याचा पत्ता व मुलाखतीस उपस्थित पत्ता : उपवनसंरक्षक कार्यालय, (वन्यजीव) ठाणे, एल बी एस मार्ग, तीन हाट नाका, नौपाडा, ठाणे (पश्चिम) 400602

महत्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा 

Thane Vanvibhag Bharti 2025

⚠️उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना

  1. कोणतेही कारण न देता नेमणुक नाकारण्याचा पुर्ण अधिकार निवड समितीकडे राहिल त्याबाबत दाद मागता येणार नाही.
  2. Wildlife Biologist व Livelihood Expert यांना ठाणे वन्यजीव विभागातील क्षेत्रिय कामाचे वाटप उप वनसंरक्षक, (वन्यजीव) ठाणे यांचे स्तरावरुन करण्यात येईल. या दोन्ही पदांचे मुख्यालय शहापूर व मजगांव-मुरुड या सहा. वनसंरक्षक यांच्या मुख्यालय स्थळी राहील.
  3. Wildlife Biologist व Livelihood Expert या पदाकरीता अर्ज करणा-या उमेदवारांकडे स्वतःचे दुचाकी वाहन (मोटार सायकल) व वाहन चालक परवाना (Driving License) असणे गरजेचे राहील.
  4. दुचाकी वाहनाने (मोटार सायकल) केलेल्या प्रवासाचा प्रवासभत्ता मुख्यालयाच्या ठिकाणापासून रु. 3.00 प्रती की.मी. या दराने अनुज्ञेय राहील.
    5) शासकीय वाहनाने केलेल्या प्रवासाकरीता प्रवासभत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  5. क्षेत्रिय कामांच्या भेटी बावत व केलेल्या कामांबाबत पंधरवाडी अहवाल दैनंदिनी स्वरुपात संबंधीत नियंत्रण अधिकारी यांच्या शिफारशी सह उप वनसंरक्षक, (वन्यजीव) ठाणे यांचेकडे सादर करणे बंधनकारक राहील.
  6. दैनंदिनीचे अवलोकन करुन मासिक अनुज्ञेय मानधन अदा करण्यात येईल.
  7. साप्ताहीक 01 सुट्टी वगळता, इतर कोणत्याही शासकीय सुट्या अनुज्ञेय राहणार नाहीत. याव्यतिरीक्त अनुपस्थितीचा कालावधी हा विना मानधन म्हणून ग्राह्य धरण्यात येईल व उपस्थितीच्या कालावधीचे मानधन अदा करण्यात येईल.
  8. अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थित राहवयाचे असल्यास संबंधीतांस मुख्यालय सोडतांना नियंत्रण अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहील.
  9. विना परवाना सलग 10 दिवस अनुपस्थित असणे ही बाब संबंधीत पदावरचा हक्क गमावणारी असेल.
  10. एखादया अर्जदाऱ्याच्या बाबतीत निकष शिथील करण्याचा अधिकार निवड समिती अध्यक्षांचा राहील.
  11. Wildlife Biologist, Architect / Legal / Advisor/Graphic Designer, Livelihood Expert/ Rapid Rescue Team Members या पदाकरीता निवड कंत्राटी पध्दतीने 11 महिने इतक्या कालावधीसाठी राहील. तथापि त्यांनी सदर कालावधीमध्ये उत्कृष्ठ काम केल्याचे कामाच्या मुल्यमापनाअंती स्पष्ट झाल्यास त्यांना प्रती वर्ष 10% पर्यन्त मानधन वाढ देवून मुदतवाढ देण्यात येईल. या संबंधी निर्णय घेण्याचे संपुर्ण अधिकारी उप वनसंरक्षक, (वन्यजीव) ठाणे यांना असतील. अशी मुदतवाढ 03 वर्षांपेक्षा अधिक कालावधी करीता नसेल.
  12. प्रशासकीय कारणास्तव नियुक्तीचे आदेश कोणत्याही क्षणी रद्द करण्याचे संपूर्ण अधिकार उप वनसंरक्षक, (वन्यजीव) ठाणे यांना असतील.
  13. सुरवातीचा । महिन्याचा कालावधी हा परीक्षाविधीन कालावधी असेल व सदर परीक्षाविधीन कालावधीतील आपली कामगिरी समाधानकारक दिसून आल्यानंतरच आपली सेवा पुढे चालू ठेवण्यात येईल.(Thane Vanvibhag Bharti 2025)
  14. ही शासकीय नोकरी नसून केवळ कंत्राटी पध्दतीवर 11 महिन्यांच्या करारावर नियुक्ती आहे.
  15. कोणतेही कारण न देता नेमणुक नाकारण्याचा पुर्ण अधिकार निवड समितीकडे राहिल त्याबाबत दाद मागता येणार नाही.
  16. एखादया अर्जदाऱ्याच्या बाबतीत निकष शिथील करण्याचा अधिकार निवड समिती अध्यक्षांचा राहील.
  17. विभाग प्रमुख्य यांचे सुचनांनुसार कामाशी संबंधीत इतर कामकाज पाहणे हे बंधनकारक राहिल.
  18. ठाणे वन्यजीव विभागा अंतर्गत तानसा वन्यजीव अभयारण्य हे ठाणे व पालघर जिल्हा, कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगड जिल्हा, फणसाड वन्यजीव अभयारण्य रायगड जिल्हा व सुधागड वन्यजीव अभयारण्य.
    रायगड व पुणे जिल्हा यांमध्ये विभागलेला असुन, वेळोवेळी आवश्यकतेनुसार सदरहू अभयारण्यांना क्षेत्रभेटी देऊन काम पाहणे गरजेचे आहे. याची पुर्वकल्पना देण्यात येत आहे.
  19. Rapid Rescue Team Members यांचा विमा वन्यजीव विभागाद्वारे काढण्यात येईल. तसेच बचाव कार्याकरीता आवश्यक सुरक्षा साहित्यांचा पुरवठा देखिल वनविभागाद्वारे करण्यात येईल.
  20. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
रिझर्व बँक ऑफ इंडिया नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | Reserve Bank of India Requirement 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

8 thoughts on “खुशखबर | ठाणे वन विभाग भरती 2025 | Thane Vanvibhag Bharti 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo