Thane Mahanagarpalika Bharti 2025:ठाणे महानगरपालिका एकात्मिक आरोग्य कुटूंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत 15 व्या वित्त आयोगांतर्गत )राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे) असलेल्या पदांची भरती प्रक्रिया राबविण्या करिता निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात प्रतिमहा ठोक मानधन तत्वावर कंत्राटी पध्दतीने पदे भरावयाची आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन (गूगल फॉर्म) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून यामध्ये 140 रिक्त जागांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत, पात्रताधारक उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. या भरतीचे फॉर्म भरण्यासाठी अंतिम दिनांक 24 ऑक्टोंबर 2025 पर्यंत सादर करण्यास उमेदवारांना आवाहन केले आहे. उमेदवारांची निवड हि थेट मुलाखती द्वारे होणार असून या भरती मोहिमेमध्ये कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा नाही. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी.
Thane Mahanagarpalika Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन (गूगल फॉर्म) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 140 पदे
- पदाचे नाव : स्टाफ नर्स पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी/GNM/ANM/ उत्तीर्ण असणे आवश्यक
पदांचा तपशील
| पद क्रं. | पदाचे नाव | पद क्रं |
| 1. | स्टाफ नर्स (GNM) | 77 |
| 2 | स्टाफ नर्स (ANM) | 63 |
| एकुण | 140 |
- भरती विभाग : ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती
- नोकरीचे ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)
महत्त्वाच्या तारखा
| अर्ज सुरू तारीख | 15 ऑक्टोंबर 2025 पासून |
| अर्जाची अंतिम तारीख | 24 ऑक्टोंबर 2025 पर्यंत |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | गुणांक पद्धत |
| दुसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- वयोमर्यादा (Age Limit) : खुल्या गटातील उमेवारांसाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षे व राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी कमाल 43 वर्षे देण्यात आलेली आहे.
- मासिक वेतन : दरमहा रू. 18,000/- ते रू. 20,000/- पर्यंत वेतन मिळणार आहे.
अर्ज शुल्क
| श्रेणी | शुल्क |
| अमागासवर्गीय उमेदवारांसाठी | 750/- रुपये |
| मागासवर्गीय उमेदवारांसाठी | 500/- रुपये |
अर्ज सादर करण्याचा पत्ता : चौथा मजला, सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका इमारत, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे (प.) 400602
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 ऑक्टोंबर 2025 दुपारी 2:00 वाजेपर्यंत
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF I पहा | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF II पहा | येथे क्लिक करा |
Thane Mahanagarpalika Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- उपलब्ध करुन देण्यात येणा-या नमुन्यामध्ये अर्ज उमेदवारांनी भरणे आवश्यक आहे.
- केंद्र शासनाच्या मंजूरी नुसार कार्यक्रमांतर्गत अथवा अभियान अंतर्गत बदल झाल्यास परिस्थिती अनुरूप पदांची संख्या / आरक्षणात बदल होऊ शकतो.
- पदभरतीकरिता विहित मुदतीत रजिस्टर टपालाने किंवा हस्तदेय अर्ज स्वीकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- सदर कंत्राटी पदभरती प्रक्रियेबाबतच्या सर्व आवश्यक सुचना व माहिती आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरच वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल. या करीता उमेदवारांनी www.thanecity.gov.in या संकेस्थळास भेट देऊन माहिती प्राप्त करुन घेणे अनिवार्य राहील. पदभरतीच्या अनुषंगाने कोणत्याही उमेदवारास वैयक्तिक संपर्क साधण्यात येणार नाही.
- सदरची पदे ही प्रकल्प अंमलबजावणी आराखडयातील मंजूरीनुसार भरण्यात येतात त्यामुळे पीआयपीच्या मंजूरी नुसार पदांची संख्या व आरक्षणात बदल होणे अभिप्रेत असते. त्यामुळे जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त कंत्राटी पदांच्या संख्येत व आरक्षणामध्ये बदल होऊ शकतो.
- जाहिरातीत नमूद केलेली पदे पूर्णतः कंत्राटी स्वरूपाची असून राज्य शासनाची नियमित पदे नाहीत. या पदांचा राज्यशासनाच्या पदांशी काहीही संबंध नसून उमेदवार राज्य शासनाच्या नियमित पदावर समायोजन करण्याची मागणी करू शकणार नाही.(Thane Mahanagarpalika Bharti 2025)
- जाहीरातीत नमूद केलेले कंत्राटी पदाचे मानधन हे एकत्रित मानधन आहे.
- मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- उमेदवारांच्या पदस्थापनेबाबतचे व पदभरतीतील सर्व अधिकार मा. आयुक्त, सो. ठाणे महानगरपालिका ठाणे, यांना राहतील.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख कामकाजाच्या दिवशी दिनांक 24/10/2025 रोजी दुपारी 2:00 वाजेपर्यंत
राहील. त्यानंतर प्राप्त झालेले अर्ज व कागदपत्रे, प्रमाणपत्रे पदभरती करिता ग्राहय धरले जाणार नाही. तसेच कोणत्याही कारणास्तव मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्ज व कागदपत्रे, प्रमाणपत्रे स्विकारण्याकरिता अर्जदारास कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही. - सदर पदभरती प्रक्रियेत आवश्यकतेनुसार बदल करण्याचे व/वा सदर पदभरती अंशतः किंवा पूर्ण रद्द करण्याचे अधिकार मा. आयुक्त सो. ठाणे महानगरपालिका, ठाणे यांनी राखून ठेवले आहेत.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
हि जाहिरात पण पहा 👇
नवी मुंबई महानगरपालिके अंतर्गत स्टाफ नर्स महिला व पुरुष पदांकरिता भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जाहिरात 2025 | Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा