ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | Thane DDC Bank Bharti 2025

Thane DCC Bank Bharti 2025Thane DDC Bank Bharti 2025 : बँकिंग क्षेत्रात करियर घडवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ठाणे यांच्या अंतर्गत पात्र उमेदवारांसाठी सुवर्ण संधी चालून आलेली आहे. ज्यु. बँकिंग असिस्टंट या श्रेणीतील 123, शिपाई श्रेणीची 36, सुरक्षारक्षक 5, वाहनचालक 1 असे एकूण 165 रिक्त पदे सरळसेवा पध्दतीने भरणेसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ठाणे ही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक आहे. बँकिंग क्षेत्रातील करिअर हे केवळ नोकरी नाही तर ती प्रतिष्ठेची आणि सुरक्षतेची बाब असल्याने (Thane DDC Bank Bharti 2025 ) ही भरती मोहीम सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग उद्योगात स्थिर आणि फायदेशीर कारकीर्द मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. Pdf स्वरूपात जाहिरात देण्यात खाली देण्यात आली आहे. कृपया अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आलेले आहे ती वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Thane DDC Bank Bharti 2025

अर्ज स्विकारण्याची पद्धत :  ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
एकूण पदसंख्या : 0165
पदाचे नाव : वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. (मूळ जाहिरात pdf स्वरूपात दिलेली आहे.)
शैक्षणिक पात्रता:- 8 वी, 10 वी पदवीधर उमेदवार या भरती साठी अर्ज सादर करू शकतात.

पदांचा तपशील:-

पद क्रं. पदाचे नाव  पद संख्या 
1. ज्यु.बँकिंग असिस्टंट 123
2. शिपाई 036
3. सुरक्षारक्षक 005
4. वाहनचालक 001
TOTAL  0165

महत्त्वाच्या तारखा :

  1. ऑनलाइन अर्ज सुरूः 18 ऑगस्ट 2025 पासून
  2. अर्जाची शेवटची तारीखः  29 सप्टेंबर 2025 पर्यंत संध्याकाळी 5:00 पर्यंत
  3. शुल्क भरण्याची शेवटची तारीख (ऑनलाइन): 29 सप्टेंबर 2025 पर्यंत
  4. ऑनलाईन (CBT)परीक्षेची तारीख :- बँकेच्या अधिकृत संकेतस्थळ कळविण्यात येईल.

भरती विभाग :  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ठाणे अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची संधी.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूप बँकिंग क्षेत्रात नोकरी

(अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

अर्ज शुल्क (Fee) : 

  • ज्यु. बँकींग असिस्टंट : 944 रुपये,
  • शिपाई : 590 रुपये.
  • सुरक्षारक्षक : 590 रुपये.
  • वाहन चालक : 590 रुपये.

मासिक वेतन (Salary ) : दरमहा 15,009 ते 20,000 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
वयोमर्यादा (Age Limit) : 18 ऑगस्ट 2025 रोजी
पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 ते 38 वर्ष दरम्यान असावे

निवड प्रक्रिया (Selection Process) :

  • पहिला टप्पा : संगणक आधारित परीक्षा (CBT)
  • दुसरा टप्पा : मुलाखत (Interview)
  • तिसरा टप्पा : कागदपत्र पडताळणी

नोकरीचे ठिकाण :  ठाणे जिल्हा (Jon In Thane)

ऑनाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 29 ऑगस्ट 2025 पर्यंत

Thane DDC Bank Bharti 2025

अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा 
जाहिरात pdf पहा येथे क्लिक करा

⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मनात घेतली जाणार नाही.
  • बँकेने स्थापन केलेली शॉर्टलिस्टिंग समिती शॉर्टलिस्टिंग पॅरामीटर्स ठरवेल आणि त्यानंतर, बँकेने ठरवल्याप्रमाणे पुरेशा संख्येने उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • मुलाखतीसाठी उमेदवारांना बोलावण्याचा बँकेचा निर्णय अंतिम असेल. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.(Thane DDC Bank Bharti 2025)
  • उमेदवारांच्या  भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही उमेदवाराची उमेदवारी नाकारण्याचा अधिकार बँकेकडे राखून ठेवला आहे, जर अपात्र असल्याचे आढळले किंवा चुकीची  माहिती/प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर केली किंवा कोणतीही ‘भौतिक तथ्ये’ लपवली असतील, आणि अपात्र उमेदवारांनी भरलेले शुल्क जप्त केले जाईल.
  • जाहिरात केलेल्या रिक्त पदांची संख्या तात्पुरती आहे आणि बँकेच्या ‘वास्तविक आवश्यकतांनुसार, योग्य उमेदवाराच्या उपलब्धतेनुसार’ बदलू शकते.
  • बँकेच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांची योग्यता आणि अनुभव यावर आधारित बँक त्यांची पात्रता विचारात घेईल. केवळ किमान पात्रता आणि अनुभव पूर्ण केल्याने मुलाखतीसाठी बोलावण्याचा उमेदवाराला कोणताही अधिकार राहणार नाही.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

हि जाहिरात पण पहा 👇
📢 बँकिंग क्षेत्रात सुवर्णसंधी | पंजाब अँड सिंध बँक भरती 2025
 
हि जाहिरात तुमचे नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा

1 thought on “ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | Thane DDC Bank Bharti 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo